Skip to content Skip to sidebar Skip to footer

पणजोबांची ९२ वर्षांची परंपरा Ranbir Kapoor पुढे चालवणार!

Dhurandhar : The Revenge चित्रपटानंतर लोकांना ज्या चित्रपटाची आतुरता लागली होती त्या रणबीर कपूरच्या Ramayana चित्रपटाची पहिली झलक अखेर हनुमान जयंतीदिनी रिलीज करण्यात आली आहे. चित्रपटातील Ranbir Kapoor याचा प्रभू श्रीराम यांच्या अवतारातील लूक पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. Animal चित्रपटानंतर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन प्रेक्षकांना भावलं आहे. खरं तर याआधी बऱ्याच कलाकारांनी प्रभू रामाची भूमिका साकारली आहेच, पण आपल्या पणजोबांची ९२ वर्षांची परंपरा आता रणबीर कपूर त्याच्या अभिनयातून पुढे नेणार आहे. प्रश्न पडला का नेमकी कोणती परंपरा? चला जाणून घेऊयात… (Bollywood Movie 2026)

हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर ‘रामायणा’वर आधारित बऱ्याच कलाकृती आल्या. त्यापैकी १९३४ साली Seeta हा चित्रपट आला होता जो रामायणावर आधारित हिंदीतील पहिला चित्रपट मानला जातो. महत्वाची बाब म्हणजे यात पहिल्यांदा प्रभू श्रीराम बनले होते रणबीरचे पणजोबा अर्थात Prithviraj Kapoor. आणि यात सीता मातेच्या भूमिकेत होत्या मराठमोळ्या अभिनेत्री Durga Khote. इतकंच नाही तर कपूर कुटुंबातील आणखी एक व्यक्ती यात महत्वाच्या भूमिकेत होती ती म्हणजे पृथ्वीराज कपूर यांचे भाऊ Trilok Kapoor ; त्यांनी या चित्रपटात लव ही भूमिका साकारली होती. या चित्रपटाने जगभरात नाव कमावलं होतं. विशेष म्हणजे हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचा सन्मान १९३४ च्या Venice International Film Festival मध्ये झाला होता. (Prithviraj Kapoor As Rama)

आता तब्बल ९२ वर्षांनंतर आपल्या पणजोबांचा अभिनयातील हा वारसा पुढे नेत रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ४००० कोटींचं बिग बजेट असणाऱ्या या चित्रपटातील रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूर पुन्हा एकदा त्याच्या बेस्ट अॅक्टिंग स्किल्स प्रेक्षकांसमोर दाखवणार यात तिळमात्र शंका नाही. पृथ्वीराज कपूर यांनी वयाच्या २८व्या वर्षी प्रभू श्रीराम साकारले होते आणि रणबीर आता चाळीशीत साकारणार आहे. आता प्रत्यक्ष पृथ्वीराज यांना रामाच्या भूमिकेत पाहणारा प्रेक्षकवर्ग हयात असण्याची शक्यता फार मी आहे; परंतु, ‘सीता’ हा चित्रपट पाहिलेले प्रेक्षक रणबीरच्या अभिनयाची तुलना नक्कीच पणजोबांशी करणार हे फिक्स आहे. (Ramayana Movie 2026)

================================

हे देखील वाचा : Ramayana : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आले भेटीला!

================================

२००७ मध्ये ‘सावरिया’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यु करणाऱ्या रणबीरने त्याच्या प्रत्येक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ग्राफ उंचावत नेला आहे. ‘वेक अप सिड’, ‘बर्फी’, ‘रॉकस्टार’, ‘अंजाना अंजानी’, ‘राजनिती’, ‘रॉय’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘संजू’, ‘Animal’ अशा अनेक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारत कपूर कुटुंबाचं नाव त्याने राखलं आहे. आता Ramayana चित्रपटात त्याचं काम प्रेक्षकांना कितपत आवडणार हे पाहण्यासाठी दिवाळी २०२६ ची वाट पाहावी लागणार आहे. (Ranbir Kapoor Movies)

बॉलिवूडमधलं कपूर कुटुंब हे चित्रपटसृष्टी टिकवण्यासाठी फार महत्वाचं आहे. हे कुटुंब हिंदी चित्रपटसृष्टीत ९० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या घराण्यातील पहिल्या पिढीतील ज्येष्ठ अभिनेते म्हणजे Prithviraj Kapoor. आणि त्यांच्याच अभिनयाचा वारसा कपूर कुटुंबातील प्रत्येक पिढी पुढे नेताना दिसत आहे. कॉलेजमध्येच असताना अभिनयात करिअर करावं असा मनाशी त्यांनी निर्धार केला आणि रंगभूमीपासून सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांनी मुंबईतील इम्पीरियल फिल्म स्टुडिओमध्ये काम केलं. या कंपनीत काम करण्यासाठी त्यांना ७० रुपये मिळत होते. पुढे ‘सिनेमा गर्ल’ या चित्रपटात काम करून त्यांच्या करिअरचा श्रीगणेशा झाला. आणि १९३१ मध्ये पृथ्वीराज कपूर यांनी देशातील पहिल्या साऊड फिल्ममध्ये अर्थात ‘आलम आरा’ या चित्रपटात भूमिका साकारली. पुढे १९४४ मध्ये त्यांनी स्वतःचे व्यावसायिक रंगमंच ‘पृथ्वी थिएटर’ची स्थापना केली आणि नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!