
Prajakta Mali हिने आपल्या ब्रॅण्डमधून राज नाव का हटवलं?
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री Prajakta Mali सध्या तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डमुळे विशेष चर्चेत आहे. ‘प्राजक्त राज‘ असं तिच्या या ज्वेलरी ब्रॅण्डचं नाव असून आपले मराठमोळे पारंपारिक दागिने ट्रेडिशनल आणि जरा आधुनिक पद्धतीने ती लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असते. पण सध्या तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डच्या नावामुळे ती अडचणीत आली आहे. तिने प्राजक्तराज या तिच्या ब्रॅण्डच्या नावात मोठा बदल केल आहे. तो का आणि काय केला आहे जाणून घेऊयात…

प्राजक्ता माळीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत प्राजक्त राज ऐवजी ‘प्राजक्तसाज’असं नाव जाहीर केलं आहे. प्राजक्ताने राजच्या जागी साज असं नाव बदलल्यामुळे लोकांना प्रश्न पडला. नात्र, त्याचे तिने उत्तर देत असं म्हटलंय की ‘प्राजक्तसाज Reviving Maharashtra Legacy’.
तसेच, एक व्हिडिओ पोस्ट करत तिने लोकांच्या शंकाचं निरसन देखील केलं आहे. प्राजक्ताने व्हिडीओत म्हटलं आहे की, “आजचं लाइव्ह अतिशय स्पेशल कारणासाठी आहे. अर्थात हे माझ्या आणि आपल्या ब्रँडसंदर्भात आहे. नव्या आर्थिक वर्षात माझ्या ज्वेलरी ब्रँडचं नाव असणार आहे, ‘प्राजक्तसाज- Reviving Maharashtra Legacy‘”.

“मी तीन सव्वातीन वर्षांपूर्वी हा ब्रँड सुरु केला होता. तेव्हा मला बिझनेस क्षेत्राची मला काहीच कल्पना नव्हती. फक्त आपले मराठमोळे पारंपरिक दागिने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणायचे हाच विचार मी केला होता. पण आता हा बिझनेस इतका मोठा होईल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. दागिन्यांचा खप जेवढा महाराष्ट्रात आहे तेवढाच तो देशात आणि परदेशातही आहे. पण नावामुळे शिपिंग दरम्यान काही अडचणींचा सामना करावा लागत होता. ‘प्राजक्तराज’ या नावामुळे व्यवसायात अनेक तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे येत होते आणि त्या त्रासामुळेच नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे”.

नवीन आर्थिक वर्षाच्या मुहूर्तावर (१ एप्रिलपासून) हा ब्रँड आता नव्या नावाने ओळखला जाईल.महाराष्ट्रातील पारंपरिक आणि लुप्त होत चाललेले जुने दागिने पुन्हा एकदा लोकांसमोर आणणे, हाच या ब्रँडचा मुख्य उद्देश असल्याचे तिने आवर्जून सांगितले आहे. त्यामुळे आता नाव जरी नवं असलं तरी मराठी मातीतला तोच आपलेपणा आपल्याला तिच्याकडून मिळणार अशी शाश्वती तिने दिली आहे.
================================
हे देखील वाचा : Ranbir Kapoor : “मी प्रभू श्री राम यांच्या भूमिकेला न्याय…”
================================
दरम्यान, सध्या प्राजक्ता फारशी चित्रपट किंवा सीरीजमध्ये देखील दिसत नसल्यामुळे तिच्या करिअरला उतरली कळा लागली आहे का असा प्रश्न सध्या सिनेवर्तृळात उपस्थित केला जात आहे. फुलवंती चित्रपटाची निर्माती म्हणून ती उदयास आली पण त्यानंतर तिचा एकही मोठा प्रोजेक्ट आला नसल्यामुळे तिचे चाहते चिंतेत आहेत. मात्र, लवकरच ती कमबॅक करेल अशी तिच्या प्रेक्षकांना आशा आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi