Skip to content Skip to sidebar Skip to footer

Laxmikant Berde : अजरामर नाटक ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!

मराठी चित्रपटांकडे ऑडियन्स आहेच पण मराठी नाटकांना प्रेक्षक जे प्रेम देतात ते जरा वेगळं आहे हे प्रत्येकजण मान्य करणारच… रात्री ८ वाजता नाटकाचा प्रयोग असूदेत किंवा सकाळी ११ वाजता, प्रेक्षक आवर्जून नाटकाला हाऊसफुल्लचा बोर्ड लावतातच… असंच एक मराठीत अजरामर नाटक होऊन गेलं ते म्हणजे ‘शांतेचं कार्टं चालू आहे’. Laxmikant Berde आणि नयनतारा यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या नाटकाला रसिकप्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. आणि आता पुन्हा नव्या ढंगात हे नाटक आपल्याला खळखळून हसवायला येणार आहे…

मराठी रंगभूमीने कलाकालर घडवले आहेत आणि एक सुज्ञ प्रेक्षकही समाजाला दिला आहे… आणि आता त्याच बहुआयामी प्रेक्षकांना ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे गाजलेलं नाटक पुन्हा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर हे नाटक नव्या उत्साहात पुन्हा सादर होणार आहे. अमेय खोपकर नाटकाचे सादरकर्ते असून दिग्दर्शन विजय केंकरे करणार आहेत. पोट धरुन हसायला लावणारं हे नाटक लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण करुन देणार हे मात्र फिक्स आहे…

अमेय विनोद खोपकर सादर करत असलेल्या या नाटकात प्रियदर्शन जाधव, विक्रांत कोळपे, सुकन्या काळण, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, मयुरा रानडे आणि विशाखा सुभेदार यांसारखी लोकप्रिय कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या नाटकातून घेतला जातो. त्यामुळेच हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.

नाटकाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले की, ”रंगभूमी हे जिवंत माध्यम आहे. प्रेक्षकांचा श्वास, त्यांचं हसणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया यामुळे प्रत्येक प्रयोग नव्याने घडतो. ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा सादर करताना आम्ही त्यात आजच्या काळाची झलक आणि अधिक परिपक्वता आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक ”प्रेक्षकांना केवळ हसवणार नाही, तर त्यांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवेल.’

================================

हे देखील वाचा : “Amruta Khanvilkar च्या पोस्टमुळे सगळ्यांना…”; काय म्हणाली मंजिरी?

================================

निर्माते अमेय विनोद खोपकर म्हणतात, ”चांगल्या आशयाला वेळेची मर्यादा नसते. हे नाटक आधी गाजलं कारण त्यात प्रामाणिकपणा होता आणि आजही तो तितकाच जिवंत आहे. नव्या पिढीसाठी आणि जुन्या रसिकांसाठी आम्ही हे नाटक नव्या उर्जेसह सादर करत आहोत. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा रंगभूमीचा आनंद घ्यावा, हीच आमची इच्छा.” एकूणच काय, हास्य आणि भावनांचा समतोल साधणारं ‘शांतेचं कार्टं चालू आहे’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झालं आहे.

बरं, ज्या मराठी नाटकाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं ते ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ हे नाटक संस्कृत भाषेतही सादर केलं गेलं होतं हे तुम्हाला माहित आहे का? २०१३ मध्ये मनस्वी संघ या नाट्यप्रेमी कलाकारांच्या गटाने हे ‘संस्कृतधनुष्य’ खांद्यावर घेतलं होतं… लक्ष्मीकांत बेर्डे आणि नयनतारा यांच्या विनोदाच्या टायमिंगने पोट धरुन हसायला लावणाऱ्या या नाटकाचं संस्कृत नाव होतं ‘विचक्षणोयं शांतासुनू:’ मराठी नाट्यसृष्टी विषय आणि आशयांच्या बाबतीत किती समृद्ध आहे हे अधिकाधिक लोकांपर्यंत वेगवेगळ्या भाषेतून पोहोचवण्याचा या टीमचा उद्देश होता… (Marathi plays translated in sanskrit language)

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!