
‘फिल्टर पाड्याचा बच्चन ‘ Gaurav More अडकला लग्नबंधनात!
महाराष्ट्राच्या घराघरांत महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून पोहोचलेला ‘फिल्टर पा़ड्याचा बच्चन’ Gaurav More लग्नबंधनात अडकला आहे. सोशल मिडियावर अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर कर चाहत्यांना सुखद धक्का दिला. कुठलाही गाजावाजा न करता, मिडियाला न बोलावता गौरवने प्रियांका कारेकर हिच्यासोबत ५ एप्रिल २०२६ रोजी घरच्या घरी लग्न केलं. २०२६ या वर्षाची सुरुवात गौरवने दमदार केली असून आता अभिनेता म्हणून तो काय काय सरप्राईज देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

खरं तर महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या प्रत्येक पहसनात गौरव लग्नासाठी मुलगी पाहायला जातो आणि तिथे त्याचा पोपट होतो किंवा त्याच्या आयुष्यात मुलगी टिकतच नाही असे कॉमेडी स्किट्स आपण पाहिले आहेत. परंतु, खऱ्या आयुष्यात गौरवे बाजी मारत लग्नाचा बार उडवला आहे. गौरवच्या लग्नाचा फोटो Rutuja Bagwe ने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत शेअर केला. त्याला तिने कॅप्शन देत असं लिहिलं होतं की, “मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमच्या या नवीन प्रवासासाठी आणि सुंदर नवीन घरासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन! ‘करू’ आणि ‘बच्ची’, गॉड ब्लेस यू.” दरम्यान, गौरवने केवळ लग्नच नाही, तर आपल्या हक्काच्या नव्या घरात गृहप्रवेशही यावेळी केला आहे. त्यामुळे चाहते त्याच्यावर डबल शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

गेली अनेक वर्ष आपण गौरवला महाराष्ट्राची हास्यजत्रा या हास्याच्या शो मध्ये तर पाहात आहोतच पण त्याशिवाय मराठी चित्रपटांतही त्याने उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत. गौरव प्रमाणे त्याची बायको प्रियांका कारेकर ही देखील इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून काम करतेय. तिने सलमान खान आणि सनी देओल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या Chup या चित्रपटात तिने काम केलं असून त्याचं दिग्दर्शन आर.बाल्की यांनी केलं होतं. तर गौरवने ‘बॉईज ४’, ‘लंडन मिसळ’, ‘अल्याड पल्याड’, ‘वाजवा रे’ अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. (Gaurav More Movies)
================================
हे देखील वाचा : Ramayana : रणवीर किंवा वरुणने प्रभू श्रीराम साकारले असते तर?
================================
दरम्यान, बऱ्याच मुलाखतींमध्ये गौरवने त्याच्या स्ट्रगलबद्दल भाष्य केलं आहे. कॉलेजमधील एकांकिका ते मोठा पडदा असा मोठा पल्ला गाठणारा गौरव त्याच्या चाळीतला पहिला मुलगा होता जो लंडनला गेला. एकपात्री नाटक स्पर्धांमधून स्वत:चं अभिनय कौशल्य सिद्ध करत त्याने एकांकिका गाजवल्या. लहानशा चाळीत राहून मोठी स्वप्न पाहणाऱ्या गौरवने ती पूर्ण करत नवोदित कलाकारांना नवी उमेद दिली आहे हे नक्की…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi