
Ramayana : रणवीर किंवा वरुणने प्रभू श्रीराम साकारले असते तर?
रणबीर कपूरचा Animal चित्रपटानंतर एक वेगळाच अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित Ramayana चित्रपटातील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेतील Ranbir Kapoor चा पहिला लूक हनुमान जयंतीदिनी रिलीज करण्यात आला. प्रेक्षकांना त्याच्या या लूकला पसंती देत रामाच्या भूमिकेत तो परफेक्ट फिट झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. बरं, रणबीरचा ऑफिशिअल लूक तर समोर आलाच पण सध्याच्या Technology च्या जमान्यात लोकांनी AI च्या माध्यमातून बॉलिवूडचे इतर काही कलाकार प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत कसे दिसले असते? याचे फोटो तयार केले आहेत. चला एक नजर टाकूयात… (Bollywood Movie 2026)

सोशल मिडियावर सेलिब्रिटींचे AI च्या माध्यमातून बनवलेले बरेच फोटो व्हायरल होत असतात आणि त्यापैकी काही फोटोंमुळे वादही निर्माण होतो. पण सध्या प्रभू श्रीरामाच्या अवतारातील कलाकारांचे व्हायरल झालेले फोटो लोकांची दाद मिळवताना दिसत आहेत. यात रणवीर सिंग, सलमान खान, विकी कौशल, अक्षय कुमार, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, अजय देवगण, शाहरुख खान, आमिर खान, अशा बॉलिवूडच्या टॉपच्या कलाकारांचे AI Generated फोटो व्हायरल झाले आहेत. अर्थात रणबीर कपूर हाच या भूमिकेसाठी परफेक्ट आहे, पण तरीही प्रेक्षकांनी Ranveer Singh आणि Vicky Kaushal ला या भूमिकेसाठी दुसरी पसंती नक्कीच दिलेली पाहायला मिळते. (AI Generated images of Bollywood celebs as Lord Rama)

दरम्यान, रणबीर कपूर याने प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारण्यासाठी अमाप मेहनत केली आहे. Animal चित्रपटातील Violent पात्र साकारल्यानंतर रणबीर ‘रामायणा’त राम कसे साकारणार यावर बऱ्याच जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. इतकंच नाही तर काही वर्षांपूर्वी त्याने बीफ खाण्याबद्दल केलेलं विधानही या दरम्यान व्हायरल झालं होतं. मात्र, या सगळ्या वाद-विवादाला भेदून त्याने प्रभू श्री रामाची भूमिका मनापासून साकारल्याची प्रचिती फर्स्ट लूकमधून नक्कीच येत आहे. (Ranbir Kapoor Controversy)

मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 4000 Cr चं बजेट असणाऱ्या या चित्रपटासाठी सगळ्या कलाकारांनी मानधन स्वरुपात जबरी रक्कम घेतली आहे. रावणाची भूमिका साकारणाऱ्या Yash याने 100 Cr, सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या Sai Pallavi हिने 12 Cr, हनुमानाच्या भूमिकेतील Sunny Deol याने 20 ते 40 Cr, लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या Ravi Dubey याने 2 ते 4 Cr, शुर्पणखेच्या भूमिकेतील Rakul Preet Singh हिने 1 ते 2 Cr आणि प्रभू रामाची भूमिका साकारणाऱ्या Ranbir Kapoor याने दोन्ही पार्टसाठी 75 Cr घेत एकूण 150 Cr घेतले आहेत. त्यामुळे आता रामायण चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करतो? किती दिवसांत बजेटचा आकडा पार करतो हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. (Ramayana Movie cast & Fees)
आता एक नजर रणबीर कपूरच्या चित्रपटांच्या कलेक्शनवरही टाकूयात… सावरिया वर्ल्डवाईड 40.2 Cr आणि भारतात 23.1 Cr, बचना ए हसिनो वर्ल्डवाईड 62 Cr आणि भारतात 36 Cr, वेक अप सिड वर्ल्डवाईड 47.1 Cr आणि भारतात 28.1 Cr, अजब प्रेम की गजब कहाणी वर्ल्डवाईड 100 Cr आणि भारतात 64.3 Cr, राजनिती वर्ल्डवाईड 146.2 Cr आणि भारतात 94.2 Cr, रॉकस्टार वर्ल्डवाईड 106.4 Cr आणि भारतात 63.8 Cr, बर्फी वर्ल्डवाईड 178.4 Cr आणि भारतात 112.2 Cr, ये जवानी है दिवानी वर्ल्डवाईड 320.3 Cr आणि भारतात 188 Cr, तमाशा वर्ल्डवाईड 135.3 Cr आणि भारतात 67 Cr, ए दिल है मुश्किल वर्ल्डवाईड 240.3 Cr आणि भारतात 113.2 Cr, संजू वर्ल्डवाईड 520.3 Cr आणि भारतात 342.3 Cr, ब्रम्हास्त्र १ वर्ल्डवाईड 430 Cr आणि भारतात 267 Cr, अॅनिमल वर्ल्डवाईड 901.2 Cr आणि भारतात 551.2 Cr. (Ranbir Kapoor all movies box office collection)
================================
हे देखील वाचा : “सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच…”,Ranbir Kapoor स्पष्टच बोलला!
================================
एकूण रणबीरच्या चित्रपटांचं कलेक्शन पाहता अॅनिमल नंतर 1000 Cr कमावणारा Ramayana चित्रपट नक्कीच ठरु शकतो. इतकंच नाही तर या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या करिअरसाठी हा चित्रपट टर्निंग पॉईंट ठरणार हे निश्चित आहे. प्रेक्षक आता आतुरनेते २०२६च्या दिवाळीची वाट पाहात आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित Ramayana हा चित्रपट जगभरात २ भागांमध्ये २०२६ आणि २०२७च्या दिवाळीत रिलीज होणार आहे. (Ramayana movie collection)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi