
Tanvi Kolte हिने प्रभूला दिलेलं ‘ते’ वचन पूर्ण केलंच!
Bigg Boss Marathi Season 6 आता Grand Finale च्या अतिशय जवळ येत चालला आहे. घरात दर आठवड्याला एक-एक सदस्य बाहेर जात आहेत आणि प्रेक्षक त्यांचे फायनलिस्ट कोण असतील याची वाट पाहात आहेत. या घरात पहिल्य दिवसापासून प्रत्येक स्पर्धकांनी एकमेकांशी नातं बनवलं. मग ते मैत्रीचं असो, भावा-बहिणीचं असो किंवा दुश्मनीचं असो.. या सगळ्यात लोकांच्या लक्षात राहिलं ते म्हणजे Tanvi Kolte आणि प्रभू शेळके यांचं भावा-बहिणीचं नातं. आपल्या छोट्या भावासारखी तिने प्रभूची काळजी घेतली आणि त्या ला बिग बॉसच्या घरात केलेलं प्रोमिस तन्वीने प्रभू बाहेर गेल्यानंतरही पूर्ण केलं. काय आहे ते जाणून घेऊयात..
खरं तर बिद बॉसच्या घरातल्यांनी Tanvi Kolte आणि Prabhu Shelke यांच्या नात्याला आणि त्यांना टार्गेट केलं. तन्वीच्या आड प्रभू खेळतोय, त्याचा स्वतंत्र गेम नाही आहे असं सगळेच बोलत होते. परिणाम काय झाला तर प्रभू शेळकेला घराचा निरोप घ्याला लागला. परंतु, तन्वीने त्यांच्या नात्याची जाणीव ठेवत प्रभूला दिलेली २ वचनं पूर्ण केली. त्यापैकी पहिलं म्हणजे फॅमेली वीकमध्ये ज्यावेळी प्रभूची आई घरात आली होती तेव्हा तन्वीने तिची नवी कोरी साडी त्यांना गिफ्ट केली. आणि आता तो बाहेर गेल्यानंतर तन्वीने त्याला टीव्ही गिफ्ट केला आहे.

बिग बॉसच्या घरात एकदा गप्पा मारताना तन्वीने प्रभूला वचन दिलं होतं की, “मी तुला टीव्ही देईन…”. सध्या ती बिग बॉसच्या घरात गेम खेळत असली ती तन्वीच्या कुटंबाने तिचं वचन पूर्ण केंल आहे. त्यांनी प्रभूच्या घरी टीव्ही पाठवला असून सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तन्वीची आजी प्रभूच्या कुटुंबाला भेट देताना दिसते. प्रभूच्या आईनं त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले, तर आजींनीसुद्धा प्रभूच्या आईला साडी भेट दिली.
काटा ग्रुपमधला मेन माणूस प्रभू शेळके एलिमिनेट झाल्यानंतर तन्वी फारच भावूक झाली होती. ती ढसाढसा रडत असताना भाऊ म्हणून प्रभूने तिला सावत डोळ्यांतून एक अश्रूही काढला नव्हता. घरातील सदस्यांसह संपूर्ण महाराष्ट्राने प्रभूच्या या कृतीचं कौतुक केलं होतं. बहिण म्हणून आणि प्रभूच्या घरची आर्थिक परिस्थिती पाहता तन्वीने दिलेला मदतीचा हात कौतुकास्पद नक्कीच आहे. आता घराबाहेर या भावा-बहिणीची भेट कशी असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नक्कीच आतुर आहेत.
================================
हे देखील वाचा : ‘फिल्टर पाड्याचा बच्चन ‘ Gaurav More अडकला लग्नबंधनात!
================================
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ६’च्या या सीझनमध्ये यावेळी Rakhi Sawant, संकेत पाठक, संस्कृती साळूंखे आणि रेवा कौरसे हे ४ वाइल्ड कार्ड स्पर्धक आले होते. त्यापैकी आता राखी आणि रेवा अद्याप घरात टिकून आहेत. इतकंच नाही तर रेवा या सीझनची शेवटची कॅप्टन झाली आहे. आता अंतिम टप्प्यात सध्या तन्वी कोलते, दीपाली सय्यद, रेवा, राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने, सागर कारंडे आणि राखी सावंत हे स्पर्धक शर्यतीत असून या आठवड्यात कोणाचा प्रवास संपणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi