Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dhurandhar : The Revenge : रणवीरने त्याच्याच चित्रपटाचा मोडला रेकॉर्ड!

स्वत:ला कायम चॅलेंज करत राहणं कठीण आहे. आणि त्याहूनही कठीण आहे ते म्हणजे चॅलेंज स्वीकारुन आपल्या प्रत्येक कामातून ते सिद्ध करत राहणं. हे काम सध्या एका अभिनेत्याने करुन दाखवलं आहे आणि तो म्हणजे Ranveer Singh. त्याच्या Dhurandhar : The Revnge चित्रपटाने अख्ख्या बॉलिवूडची झोप उडवली आहे. Salman Khan यानेही त्याचा चित्रपट चक्क पुढे ढकलला. आता भाई सलमानलाही ज्याने दोन पावलं मागे घ्यायला लावली त्या रणवीरमध्ये ‘कुछ तो बात होगी ही ना’… चला तर मग या पठ्ठ्याने स्वत:च्याच कोण-कोणत्या चित्रपटांना कलेक्शनमध्ये मागे टाकलं आहे आणि सध्या १० दिवसांत धुरंधर २ ने किती कमाई केली आहे जाणून घेऊयात… (Dhurandhar 2 News)

Sacnilkच्या रिपोर्टनुसार पेड प्रीव्ह्यु 43 Cr, पहिल्या दिवशी 102.55 Cr, दुसऱ्या दिवशी 80.72 Cr, तिसऱ्या दिवशी 113 Cr, चौथ्या दिवशी 114.85 Cr, पाचव्या दिवशी 65 Cr, सहाव्या दिवशी 56.55 Cr, सातव्या दिवशी 48 Cr, आठव्या दिवशी 49.70 Cr, नवव्या दिवशी 41.75 Cr, दहाव्या दिवशी 62.85 Cr, अकराव्या दिवशी 68.10 Cr कमवत आत्तापर्यंत 846.87 Cr कमावले आहेत. (Dhurandhar 2 Box Office collection day wise)

‘धुरंधर २’ ने जगभरात 1353.95 Cr आणि भारतात 846.87 Cr कमावले आहेत. धुरंधरने जगभरात 1307Cr कमावले होते आणि आता अवघ्या १० दिवसांत आपल्याच चित्रपटाचा रणवीरने रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे. बॉलिवूडमध्ये लूक्स शिवाय एन्ट्री करणाऱ्या रणवीरच्या पहिल्या Band Baaja Baarat (2010) चित्रपटाने अवघे 24 Cr कमावले होते. आणि तिथपासून आज १६ वर्षांनी त्याच्या चित्रपटाने पाचपट, सहापट कमाई करत आजवर बॉलिवूडच्या ३ Khan’s ने ही जी कामगिरी केली नाही ती करुन दाखवली आहे. (Ranveer Singh vs Bollywood’s three Khan’s)

आता एक नजर जरा रणवीर सिंगच्या आधीच्या चित्रपटांवर आणि वर्ल्डवाईड कलेक्शनवर टाकूयात… ‘लेडीज वर्सेस रिकी बेहेल’ 51 Cr, ‘लुटेरा’ 47 Cr, ‘गोलियो की रासलीला-रामलीला’ 212 Cr, ‘गुंडे’ 130 Cr, ‘किल दिल’ 56 Cr, ‘दिल धडकने दो’ 150 Cr, ‘बाजीराव मस्तानी’ 361 Cr, ‘बेफिकरे’ 101 Cr, ‘पद्मावत’ 568 Cr, ‘सिंबा’ 394 Cr, ‘गल्ली बॉय’ 234 Cr, ’83’ -193Cr, ‘सर्कस’ 61 Cr, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ 357 Cr, ‘धुरंधर’ 1305.7 Cr. आत्तापर्यंत रणवीरच्या कोणत्याच चित्रपटाने 600 Cr देखील पार केले नव्हते. पण केवळ Dhurandhar या फ्रेंचायझीने सगळ्या चित्रपटाच्या कमाईपेक्षा दुप्पट कमाई करुन दाखवली आहे.

================================

हे देखील वाचा : Dhurandhar : 2400 Cr कमावणारा पहिला भारतीय चित्रपट!

================================

आनंदाची बाब म्हणजे ‘धुरंधर २’ चित्रपटाने रणबीर कपूरच्या Animal (917 Cr), श्रद्धा कपूरच्या Stree 2 (857 Cr), विकी कौशलच्या Chhaava (807 Cr) ,ऋषभ शेट्टीच्या Kantara : A Legend-Chapter 1 (852 Cr) आणि सलमान खानच्या Bajrangi Bhaijan (918.18 Cr), KGF 2 (1215 Cr) या चित्रपटांच्या एकूण कमाईला फक्त एका आठवड्यात मागे टाकलं आहे. आणि ‘धुरंधर’चा स्पीड पाहता लवकरच हा चित्रपट आमिर खानच्या Dangal (2000 Cr) चित्रपटाला मागे टाकणार असं चित्र दिसतंय.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!