Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dhurandhar : 2400 Cr कमावणारा पहिला भारतीय चित्रपट!

Dhurandhar : The Revenge चित्रपट रिलीज होऊन फक्त ९ दिवस लोटले आहेत आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तबाही केली आहे. रिलीजनंतर ७ दिवसांमध्ये 1000 चा आकडा पार करणारा हा पहिला बॉलिवूडचा चित्रपट ठरला असून दोन्ही भागांची एकत्रित 2400 Cr कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. एकामागून एक नवे रेकॉर्ड ‘धुरंधर’ने करण्याचा सपाटा सुरुच ठेवला आहे. जाणून घेऊयात ९ दिवसांत चित्रपटाने किती कमाई केली आहे आणि Pushpa चित्रपटाच्या सीरीजला अखेर धुरंधरने मागे टाकलं आहे. (Dhurandhar Box Office Collection)

sacnilk च्या आकडेवारीनुसार प्रीव्ह्यूतून 43 Cr, पहिल्या दिवशी 102.55 Cr, दुसऱ्या दिवशी 80.72 Cr, तिसऱ्या दिवशी 113 Cr, चौथ्या दिवशी 114.85 Cr, पाचव्या दिवशी 65 Cr, सहाव्या दिवशी 56.60 Cr, सातव्या दिवशी 48.75 Cr, आठव्या दिवशी 49.70 Cr, नवव्या दिवशी 41.75 Cr कमवत आत्तापर्यंत भारतात एकूण 715.92 Cr ची कमाई केली आहे. तसेच, जगभरात 1141.22 Cr कोटी कमवत नवा रेकॉर्ड केला आहे. अभिमानाची बाब म्हणजे २०२५ मध्ये रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ने जगभरात 1300 Cr कोटी कमावले होते. आणि आता दोन्ही पार्ट्सने मिळून 2400 cr ची कमाई केली आहे. आणि अजून Dhurandhar : The Revenge ला अधिक कमाईसाठी बॉक्स ऑफिसवर आणि थिएटर्समध्ये रान मोकळं आहे.

दरम्यान, रणवीर सिंग याचा धुरंधर अल्लू अर्जूनच्या पुष्पा सीरीजला मागे टाकणार का अशी चर्चा सुरु होती आणि अवघ्या ९ दिवसांमध्येच चित्रपटाने बाजी मारली आहे. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या Pushpa : The Rise चित्रपटाने वर्ल्डवाईड जवळपास 370 Cr कमावले होते. त्यानंतर २०२४ मध्ये आलेल्या Pushpa : The Rule चित्रपटाने वर्ल्डवाईड जवळपास 1800 Cr कमावले होते आणि दोन्ही सीरीजने मिळून 2000 Cr पर्यंतची कमाई केली होती. आणि आता हाच रेकॉर्ड धुरंधरच्या दोन्ही पार्ट्सने मोडला आहे. (Dhurandhar vs Pushpa)

२०२५ मध्ये रिलीज झालेल्या आदित्य धरच्या Dhurandharने वर्ल्डवाईड 1200-1300 Cr कमावले होते. आणि २०२६ मध्ये ‘धुरंधर २’ ने ९ दिवसांत 1100 Cr चा आकडा पार करत एकूण सीरीजची कमाई 2400 च्या पुढे नेऊन ठेवली आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतल सर्वाधिक आणि बजेटच्या चौपट करमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. आता येत्या काळात 2000 Cr ची सिंगल हॅंडेड कमाईचा रेकॉर्ड आपल्या नावे असणाऱ्या Dangal चित्रपटाला ‘धुरंधर २’ मागे टाकणार का आणि वर्ल्डवाईड 2500 Cr क्लबची सुरुवात करणार हा हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे.

================================

हे देखील वाचा : रणवीर सिंग नाही तर हा अभिनेता ठरला खरा Dhurandhar!

================================

बरं, जगभरातून ‘धुरंधर २’ चित्रपटाचं कौतुक सुरु असताना आता दिग्दर्शक करण जोहर यानेही Ranveer Singh आणि त्याच्या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ‘मला 70च्या दशकातील चित्रपटांची आठवण झाली’, अशी भावूक प्रतिक्रिया त्याने दिली आहे. Karan Johar ने सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, ‘टेस्टोस्टेरॉन, कमाल एनर्जी आणि देशभक्तीबद्दलच्या चर्चा सुरूच राहतील आणि त्या तशा व्हायलाच हव्यात… पण #धुरंधर २ यापेक्षा खूप काही आहे. जस्कीरतची हृदयद्रावक कहाणी… आपल्या मातृभूमीसाठी दिलेलं बलिदान… अगदी खलनायकाचं पात्रही बहुआयामी आहे… आदित्य धरचं दिग्दर्शन कमालीचं आहे. तो एक नवीन दिग्दर्शक आहे!!! तो बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडीत काढेल’. (Social media post of karan johar)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar 2 मुळे सलमान खान आणि यश घाबरले?; मराठीचीही उडाली झोप?

================================

पुढे आपल्या रॉकीचं अर्थात रणवीरचं कौतुक करताना करण लिहितो, ‘आणि रणवीर सिंग, तू काय आहेस यार? तुझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काम. प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत कटाक्ष, प्रत्येक क्षण, तुझी चाल, हे सिद्ध करते की तू सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेस!!! तू येणाऱ्या अनेक वर्षांसाठी खरा ‘धुरंधर’ चित्रपट स्टार म्हणून ओळखला जाशील!!!’ बॉलिवूडचं नाव जागतिक पातळीवर अधिक उंचावण्यात आदित्य धर आणि रणवीर सिंग यांनी मोलाचा वाटा दिला आहे हे नाकारता येत नाहीच. (Bollywood Latest News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!