Skip to content Skip to sidebar Skip to footer

Peddi : अजय देवगणसोबत झळकलेला मराठमोळा अभिनेता Ram Charan शी करणार दोन हात!

येत्या काळात फिल्मी जगात बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट रिलीज होणार आहेत. यात Ramayana, Varanasi अशा बऱ्याच बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांची रांग आहे. अशातच राम चरण याची प्रमुख भूमिका असणाऱ्या पेड्डी चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. अभिमानाची बाब म्हणजे या चित्रपटात माठमोळा अभिनेता Ram Charan सोबत दोन हात करताना दिसणार आहे. कोण आहे तो चला जाणून घेऊयात…

साऊथ स्टार राम चरण याने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट दिली. Peddi या त्याच्या आगामी चित्रपटाची खास झलक सोशल मिडियावर त्याने शेअर केली. चित्रपटातील त्याचा पैलवानाचा लूक प्रेक्षकांना विशेष भावला. पण, ‘पेड्डी’ च्या या टीझरमध्ये लक्ष वेधून घेतलं आहे ते एका मराठी अभिनेत्याने. राम चरणच्या ‘पेड्डी’ चित्रपटात मराठी अभिनेता Ankit Mohan याची वर्णी लागली आहे. टीझरमध्ये दिसलेल्या काही सेकंदांच्या सीनमध्ये तो राम चरण सोबत कुस्तीच्या आखाड्यात दोन हात करताना दिसत आहे. (Peddi movie cast)

अंकित प्रभू याने मराठीसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारत त्याने मोठा पडदा गाठला. ‘ससुराल गेंदा फुल’, ‘महाभारत’, ‘कुमकुम भाग्या’ आणि ‘Naagin 3’ या हिंदी मालिकांमधील त्याची कामं विशेष गाजली. MTV roadies (season 4) मधून आपली जर्नी त्याने सुरु केली. त्यानंतर पंकज कपूर यांच्या ‘मौसम’ चित्रपटात त्याने Shahid Kapoor सोबत स्क्रिन शेअर केली. ८०० मुलांमधून त्याचं या रोलसाठी सिलेक्शन झालं होतं हे विशेष.

पुढे ‘घर आजा परदेसी’, ‘बसेरा’, ‘शोभा सोमनाथ की’, ‘अश्वथामा’ अशा अनेक हिंदी सीरीयल्समध्ये तो दिसला. त्यानंतर तो चित्रपटांकडे वळला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘मन फकिरा’, ‘पावनखिंड’, ‘क्रॅक’, Thamma, ‘सिंघम अगेन’, ‘वीर मुरारबाजी’ अशी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांनंतर आता थेट त्याने तेलुगु फिल्म इंडस्ट्री गाठली आहे. (Ankit Mohan Movies)

================================

हे देखील वाचा : ‘धुरंधर’ सोडा Akshaye Khanna याचे ‘हे’ Under Rated चित्रपट पाहिले का?

================================

तसेच, पेड्डी’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर राम चरण प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबत Janhvi Kapoor झळकणार आहे. याशिवाय चित्रपटात शिवा राजकुमार, दिव्येंदु शर्मा आणि जगपति बाबू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. बुची बाबू सना यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली असून वेंकट किलारु यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ३० एप्रिल २०२६ रोजी पेड्डी चित्रपट देशभरात रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे १ मे २०२६ रोजी रितेश देशमुख याचा Raja Shivaji चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट किती कमाई करणार आणि बाजी मारणार याची उत्सुकता अधिक वाढली आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!