Skip to content Skip to sidebar Skip to footer

Randeep Hooda: “महात्मा गांधीवर चित्रपट होऊ शकतो मग सावरकरांवर का नाही?”

भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर महापुरुषांच्या जीवनावर आधारित बरेच Biopics येऊन गेले आणि या पुढेही येत राहतील. यात Gandhi, ‘सरदार’, ‘मैं अटल हू’, ‘इमर्जन्सी’ असे बरेच बायोपिक्स आहेत. बायोपिक्सच्या या यादीत Randeep Hooda दिग्दर्शित-अभिनित Swatantrya Veer Savarkar या चित्रपटाचाही उल्लेख आवर्जून करायला हवाच. याच चित्रपटाच्या अनुषंगाने रणदीप हुड्डा याने एक महत्वाचं विधान केलं आहे. “महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित चित्रपट येऊ शकतो, मग स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर का नाही?”, असा थेट सवालच त्याने केला आहे. नागपूरमध्ये आयोजित नागपूर फिल्म फेस्टिवलच्या (Nagpur Film Festival) उद्घाटन सोहळ्यात त्याने आपलं मत मांडलं. काय म्हणाला आहे तो जाणून घेऊयात… (Biopics In Bollywood)

२०२४ मध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Biopic) हा बायोपिक रिलीज झाला. चित्रपटात सावरकरांची भूमिका रणदीपने उत्कृष्ट साकारली होती. या चित्रपटात तो अक्षरश: सावरकर म्हणून जगला. चित्रपटाबद्दल बोलताना त्याने गांधीजींचा उल्लेख करत फार महत्वपूर्ण भाष्य केलं. रणदीप म्हणाला की, “या देशात जर का महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) जीवनावर आधारित चित्रपट तयार केला जाऊ शकतो, त्यासाठी आपलं सरकार निधी देऊ शकतं तर मग सावरकरांवर बायोपिक का होऊ शकत नाही? तर नक्कीच होऊ शकतो आणि त्यासाठीच आम्ही ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट बनवला”. (Randeep Hudda statement on gandhi’s biopic)

पुढे रणदीप असं म्हणाला की, “सुरुवातीला मी सावरकरांची भूमिका करण्यास नकार दिला होता. कारण इतकं मोठं व्यक्तीमत्व कसं साकारणार हा मोठा प्रश्न होता. परंतु, त्यांच्याविषयी वाचन करुन अधिक माहिती घेतल्यानंतर संपूर्ण जगाला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर माहित व्हावे याकरिता मी चित्रपटात त्यांची भूमिका साकारण्यास होकार दिला”, अशी कबूलीही यावेळी रणदीपने दिली. “सावरकरांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती किंवा त्यांच्याबद्दल अजून थोडं फार लोकांना माहित आहे, पण त्यांचे विचार कसे आणि काय होते, त्याचा परिणाम आजच्या स्थितीत कसा होऊ शकतो हे देखील आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं”, असं देखील रणदीप म्हणाला. (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar : 2400 Cr कमावणारा पहिला भारतीय चित्रपट!

================================

१९८२ साली Richard Attenborough दिग्दर्शित Gandhi हा चित्रपट रिलीज झाला होता. ८ ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती ब्रिटन आणि भारतीय सरकारने मिळून केली होती. लोकांनी आक्षेप घेत हा चित्रपट प्रोपोगंडा असल्याचं म्हटलं होतं. जागतिक पातळीवर यश मिळवूनही गांधी चित्रपटाला लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. आजवर गांधीजींच्या जीवनावर बरेच चरित्रपट आले, परंतु त्यांचा बेस्ट बायोपिक म्हणून गांधी चित्रपटाचं नाव आजही आवर्जून घेतलं जातं. (Biopic on Mahatma Gandhi)

एखाद्या व्यक्तीची भूमिका किंवा इमॅजनरी पात्र रंगवताना फार मेहनत घ्यावी लागते. आणि त्यातही सावरकरांसारखं इतकं मोठं व्यक्तीमत्व साकारणं म्हणजे फार मोठी जबाबदारी खांद्यावर होती आणि Randeep Hooda ने ती लिलया पेलली यात शंकाच नाही. “सावरकर समजणं सोप्प नव्हतं आणि आजही कलावंत म्हणून मी त्यांना समजून घ्यायचा अजूनही प्रयत्न करतोय”, असं देखील कार्यक्रमात रणदीप म्हणाला होता. बायोपिक्स करताना त्या व्यक्तीसारखं दिसणं, वर वर त्यांनी नकल करणं हे कलाकारांना कदाचित जमेलही, परंतु त्या व्यक्तीचे विचार आपल्याच उतरवणं आणि ती भूमिका सादर करणं हे मोठं कसब आहे आणि ते रणदीपने‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बायोपिकमधून उत्तमरित्या लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. (Movies)

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantrya Veer Savarkar Movie Box Office Collection) या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकत बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई केली होती. 20 Cr च्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने देशात 25 Cr आणि जगात 32.18 Cr कमावले. तसेच, अभिमानाची बाब म्हणजे २०२५ मध्ये ऑस्करच्या (Oscar Awards 2025) शर्यतीत या चित्रपटाला स्थान मिळालं होतं. शिवाय, चित्रपटातील अभिनयासाठी रणदीपला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावे पुरस्कार देत त्याचा गौरव करण्यात आला होता. (Swatantrya Veer Savarkar movie & Oscar award) खरं तर, महापुरुषांच्या जीवनावर आधारित बायोपिक्स करण म्हणजे फार जोखमीचं काम असतं. कधी कोणत्या मुद्द्यामुळे वाद होईल किंवा चित्रपटावर आक्षेप येईल काहीच सांगता येत नाही. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात अडकला होता (Swatantrya Veer Savarkar Movie Controversy). परंतु, सगळ्या गोष्टींवर मात करत या चित्रपटाने यश मिळवलं.

================================

हे देखील वाचा : “मराठी चित्रपटात काम करण्यासाठी मी मराठी बोलायलाही शिकेन”; Vijay Sethupati ने जिंकलं महाराष्ट्राचं मन!

================================

२००१ मध्ये Monsoon Wedding या चित्रपटातून रणदीपने त्याच्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ‘D’, ‘डरना जरुरी है’, ‘रंग रसिया’, ‘लव्ह खिचडी’, ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई’, ‘हिरोईन’, ‘Sarabjeet’, ‘मर्डर ३’, ‘मैं और चार्ल्स’, ‘हायवे’, ‘किक’ अशा अनेक चित्रपटात त्याने Versatile भूमिका साकारत प्रेक्षकांना अचंबित केलं. ‘सरबजित’ चित्रपटातील त्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. कुठल्याही भूमिकेसाठी सीजीआय, इतर आधुनिक तंत्रज्ञान किंवा बॉडी डबलचा वापर न करता स्वत: त्या पात्रासाठी Physical Tranformation करण्यावर त्याने कायम भर दिला.

एका मुलाखतीत सावरकरांची भूमिका साकारताना कोण कोणत्या आव्हानांना तो सामोरं गेलं होता ते सांगताना रणदीप म्हाला होता की, “या भूमिकेसाठी मी २५ ते ३० किलो वजन कमी करत ते Maintained केलं होतं. हिंदु धर्मात दसं उपवास करतात किंवा मुस्लिम लोकं रोजा ठेवतात अगदी तसंच मी १६-१७ तास उपवास करायचो. आणि जेवणही फक्त काजू, अंडी किंवा चणे इतकंच खायचो. हे सारं करण्याचा अट्टाहास केवळं इतक्यासाठीच होता की मला विचारांनी आणि शरीरयष्टीनेही सावरकर परिपक्वरित्या साकारायचे होते आणि लोकांना पटवून द्यायचे होते”. आजवर Vicky Kaushal, Pankaj Tripathi, कंगना रणौत यांनी पॉलिटीकल लीडर्सच्या भूमिका साकारल्या. परंतु, या सगळ्यात रणदीपने साकारलेली सावरकरांची भूमिका जरा वरचढ ठरली हे मान्य करायला हवंच. (Randeep Hooda As Swatantrya Veer Savarkar)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!