Skip to content Skip to sidebar Skip to footer

Raja Shivaji : जे मराठीत कुणीच केलं नाही, ते रितेश करतोय!

मराठी चित्रपटांचे बजेट काय असतात… साधारण ५-७ कोटी.. कधीतरीच १०-१२ कोटी ! पण मराठी इंडस्ट्रीत तब्बल १०० कोटींचा सिनेमा करण्याचं धाडस करतोय आपला Riteish Vilasrao Deshmukh! तसं आजपर्यंत १०० कोटी रुपये कमावण्याची किमया एकट्या ‘सैराट’ने करून दाखवली आहे. पण इतक्याच बजेटचा आणि त्यासोबतच तगड्या स्टारकास्टला घेऊन रितेशने बनवला आहे Raja Shivaji चित्रपट, जो येत्या १ मे २०२६ ला थिएटर्समध्ये धडकणार आहे. रितेशचे आधीचे मराठी सिनेमे, म्हणजेच ‘लय भारी’, ‘माउली’ आणि ‘वेड’ हे पैसा वसूल होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित इतका भव्य-दिव्य सिनेमा तेसुद्धा मराठीत… सगळंच जोमात आहे. पण ‘राजा शिवाजी’मधल्या एका गोष्टीची जास्त चर्चा होतेय, ती म्हणजे या चित्रपटाची स्टारकास्ट… बॉलीवूडचे अनेक दिग्गज पहिल्यांदाच मराठीमध्ये डेब्यू करत आहेत. तसं आपल्या सर्वांनाच माहितीये की. रितेश देशमुख शिवरायांची भूमिका साकारतोय. पण इतर कलाकार कोणती ऐतिहासिक भूमिका साकारणार आहेत, हे जाणून घेऊयात…

पहिलं गोष्ट ‘राजा शिवाजी’च्या टीझरमध्ये दिसून येतंय की, चित्रपटाचा कालखंड लखुजीराजे जाधव यांची हत्या ते शिवरायांनी केलेला अफझल खानाचा वध इथपर्यंत आहे. म्हणजे शिवजन्माच्या आधीपासून ते १६५९ पर्यंत… या कालखंडात शिवकाळात अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व घडले आहेत. सर्वप्रथम मांसाहेब जिजाऊ यांचे वडील म्हणजेच लखुजीराजे यांची भूमिका Mahesh Manjrekar साकारणार आहेत. तुम्ही टीझरमध्ये त्यांचा फर्स्ट लुक पाहिलाच असेल. लखुजीराजे हे सिंदखेडराजाचे जहागीरदार होते तसेच दख्खनेतील महत्त्वाचे मराठा सरदार होते. देवगिरी किल्ल्यावर निजामाकडून दगाफटका करून त्यांची आणि त्यांच्या दोन पुत्रांची हत्या करण्यात आली होती. चित्रपटातील आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील आणि दख्खन प्रांतातील महत्त्वाचे मराठा सरदार शहाजीराजे भोसले.. जी भूमिका Sachin Khedekar साकारत आहेत. हिंदवी स्वराज्याची संकल्पना सर्वप्रथम शहाजीराजे यांनीच मांडली होती.

मांसाहेब जिजाऊ यांची भूमिका साकारत आहे अभिनेत्री Bhagyashree Patwardhan ! शिवरायांना शस्त्र आणि शास्त्र याचं शिक्षण देण्यात मांसाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता आई आणि पुत्र यांच्यातील भावनिक नातं रितेश आणि भाग्यश्री कसे उमटवतात, हे चित्रपटातच पाहायला मिळेल. आधी उल्लेख केल्याप्रमाणे हा चित्रपट अफझल खान वधाच्या प्रसंगापर्यंत आहे, तर क्रूर अफझल खान दाखवणं साहजिकच आहे. आणि ही भूमिका साकारतोय संजू बाब अर्थात Sanjay Dutt! त्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे, त्यात इतका महत्त्वाचा रोल संजय दत्तला मिळाला आहे. अफझल खानाची ती क्रूरता संजय दत्तच्या चेहऱ्यावर टीPरमध्येच झळकतेय, म्हणजे मुव्हीमध्ये तो काय राडा घालेल विचार करा.

आणखी एक बॉलीवूडचा तगडा अभिनेता एक ग्रेट भूमिका साकारणार आहे. तो म्हणजे Abhishek Bachchan! अभिषेक आणि रितेश दोघेही जुने मित्र… मैत्रीखातर त्यानेही मराठी इंडस्ट्रीत पाउल ठेवलं आणि तो साकारतोय शिवरायांचे थोरले बंधू संभाजी शहाजीराजे भोसले यांची भूमिका! शिवराय आणि संभाजी दोघेही बंडखोर होते. १६५५ साली कनकगिरीच्या लढाईत अफझल खानाने दगाफटका करून बंधू संभाजी यांची हत्या केली होती. याचाच बदला ४ वर्षांनी शिवरायांनी घेतला होता. तसं, Vidya Balan हिला आपण मराठीत १० वर्षांपूर्वी ‘एक अलबेला’ या चित्रपटात पाहिलं होतं. आता ती पुन्हा १० वर्षांनी मराठीत येतेय आणि ‘राजा शिवाजी’मध्ये ती साकारतेय बडी बेगमची भूमिका ! ही अली आदिलशाहची आई होती आणि शिवरायांना मारण्यासाठी अफझल खानाची नेमणूक हिनेच केली होती. टीझरमध्ये तर विद्या अगदी बेगमसारखी शोभून दिसतेय.

आणखी एक बॉलीवूडमधला चेहरा चित्रपटात झळकणार आहे. तसा तो सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण रितेशची मैत्रीने त्याला डायरेक्ट मराठी डेब्यू करायला भाग पाडलं. तो अभिनेता आहे Fardeen Khan… यामध्ये तो पाचवा मुघल बादशाह शाहजहानची भूमिका सकारत असल्याचं एकंदरीत दिसतंय. टीजरच्या एका सीनमध्ये त्याच्या मागे ताजमहाल बांधतानाचा सीन आहे, त्यावरून आपण हा अंदाज लावू शकतो की फरदीन १०० टक्के शाहजहान असेल. बॉलीवूडचे आणखी एक दिग्गज कलाकार Boman Irani चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारतायत. ते एकतर सुफी बाबा किंवा गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची भूमिका करत असल्याचा अंदाज आहे. पण त्यांचं वय आणि अंगकाठी पाहायचं झालं तर ते बहिर्जी नाईक नसावेत. त्यामुळे शिवकाळातील एका सुफी बाबांची भूमिका त्यांना देण्यात आली आहे.

आपण ‘वेड’ चित्रपटात रितेश आणि Genelia Deshmukh यांची केमिस्ट्री पाहिलीच, आता पुन्हा एकदा ही धमाकेदार जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिनिलीया ही चित्रपटाची प्रोड्युसर तर आहेच, पण यासोबतच ती चित्रपटात शिवरायांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसरकार यांची भूमिका साकारणार आहे. शिवरायांचा भावनिकरित्या सांभाळ करणाऱ्या आणि शंभूराजेंच्या मातोश्री या दोन्ही भूमिका जीनिलीया कशी उमटवते, हे तर १ मे २०२६ लाच पाहायला मिळेल.

आपल्या मराठीतला आणखी एक जबरदस्त अभिनेता Jitendra Joshi हा ‘राजा शिवाजी’मध्ये महत्त्वाची भूमिका करतोय. टीझरमधला त्याचा वेश पाहिला तर तो मोरोपंत पिंगळे यांच्यासारखा भासतोय. पण काही सोर्सेसनुसार जितेंद्र हा शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांची भूमिका साकारत आहे. अफझल खानाच्या भेटीवेळचे सर्व पत्रव्यवहार, अफझल खानाचा जाळ्यात अडकवणं अशी कामं मुत्सद्दी पंताजी यांनीच केली होती. ते शिवरायांचे विश्वासू होते. त्यामुळे जितेंद्र नक्कीच हा रोल सुंदररित्या सादर करेल, यात शंका नाही. चित्रपटात आणखी एक लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेते दिसणार आहेत, ते म्हणजे Amol Gupte ! यामध्ये ते निजामशाहची भूमिका साकारत असल्याचं सांगितलं जात आहे, पण याबद्दल अजून फार माहिती उघड झालेली नाही.

बॉलीवूडचा आणखी एक दिग्गज ‘राजा शिवाजी’मध्ये दिसणार आहे, तो आहे मेगास्टार भाईजान Salman Khan! तसं त्याने आधी दोन मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं, दोन्ही रितेशचे चित्रपट होते. आता ‘राजा शिवाजी’मध्ये सलमान हा शिवरायांचे अंगरक्षक जीवा महाला यांची भूमिका साकारत आहे. सर्वांनाच माहिती आहे की, अफझल खान वधाच्या प्रसंगावेळी जीवा महाला यांनी शिवरायांचा जीव वाचवला होता आणि सय्यद बंडाचा हातच कापला होता. आता मुव्हीमध्ये सलमान कशी Aura Farming करतोय बघूयाच. चित्रपटाची सर्वात पावरफुल बाजू काय माहितीये… Ajay-Atul यांचं संगीत ! टीझरमध्येच त्यांच्या म्युझिकची रेंज कळून येतेय, तर थिएटरमध्ये काय धमाका होईल विचार करा. दुसरीकडे National Award Winner Santosh Sivan यांच्यासारखा इंडस्ट्रीतला मोठा माणूस या चित्रपटाचा सिनेमेटोग्राफर आहे. ‘देवबाभळी’ फेम प्राजक्त देशमुखने चित्रपटाचे डायलॉग्ज लिहिले आहेत. तर सध्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला नवखा इतिहास संशोधक केतन पुरी हा चित्रपटाचा संशोधन सल्लागार आहे.

================================

हे देखील वाचा : रितेशच्या Raja Shivaji या मराठी चित्रपटात बॉलिवूड कलाकारांचा डेब्यु!

================================

रितेशचं डिरेक्शन आपण ‘वेड’मधूनच पाहिलंच. पण आता इतका मोठा प्रोजेक्ट… त्यात Historical Drama, त्यात स्वत:कडे असलेला इतका महत्त्वपूर्ण रोल, या गोष्टींचा प्रेशर तर त्याने झेललंच असेल. पण त्याची मेहनत आपल्याला येत्या महाराष्ट्र दिनीच कळेल. टीझर रीलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्याचा आवाज आणि त्याची चेहरापट्टी महाराजांशी मिळत नाही, असं अनेक नेटकरी म्हणाले होते. पण २ मिनिटांच्या टीजरवरून अडीच तासांचा चित्रपट सध्या ASSUME न केलेलंच उत्तम! बाकी एक कन्फर्म आहे की, मराठीतले सगळे रेकॉर्ड्स 100 टक्के मोडले जाणार. अगदीच फर्स्ट डे कनेक्शन… हायेस्ट GROSSING मराठी मुव्ही, सिंगल डे कलेक्शन… हायेस्ट विकेंड कलेक्शन… सर्व ब्रेक ! इतकंच काय तर मुव्हीमध्ये बॉक्स ऑफिसवर २०० कोटी कमावण्याचं पोटेन्शियल देखील आहे. आता १ मे रोजी बघूयाच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेला आजपर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट काय जादू करतो ते!

-सागर जाधव

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!