
‘जुळून येती रेशीमगाठी’ च्या दुसऱ्या भागाबद्दल Lalit Prabhakar ने दिली हिंट?
आजकालच्या यंग जनरेशनला मालिकांची क्रेझ खरंच समजणार नाही… 90’s च्या जनरेशनसाठी मालिका म्हणजे रोज उत्सव नात्यांचा सोहळाच असायचा… सीरीयलमधले प्रत्येक कॅरेक्टर्स आपल्या घरात आहेत किंवा आपण प्रेक्षक नसून त्यांच्याच घरातला एक भाग आहोत याच भावनेने सीरीयल्स पाहिल्या गेल्या… अशीच एक मालिका फार गाजली होती ती म्हणजे जुळून येती रेशीमगाठी… Lalit Prabhakar आणि लाजरी बुरजी Prajakta Mali ही फ्रेश जोडी मालिकेतून आपल्यासमोर आली होती.. प्रेक्षकांनी मालिका आणि आदित्य-मेघनाच्या जोडीला अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं… आता जर का १३ वर्षांनी या मालिकेचा दुसरा भाग आला तर? याबद्दल स्वत: ललित काय म्हणाला आहे जाणून घेऊयात..
तर, झी मराठीवर २०१३ साली ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका प्रसार झाली होती… या मालिकेतून ललित आणि प्राजक्ता ही individual नावं लोकांना समजली आणि त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांनी पुन्हा एकत्र काम करावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. अशातच ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेच्या दुसऱ्या भागाबद्दल बोलताना ललित म्हणाला की, “मालिकेचा दुसरा भाग यावा असं मला वाटत नाही. कारण, ती जादू तेव्हाच तयार झाली. त्या-त्या वेळेस ती एनर्जी असते. त्याला पुढे आता कोणी हात लावायला नको असं मला वाटतं. ती जपून राहिली पाहिजे”.. (Julun Yeti Reshimgathi marathi daily soap on zee marathi)

पुढे ललित म्हणाला की,”ती एक छान मालिका तयार झाली होती, तो काळही तसा होता, दिग्दर्शक आणि लेखक तसे होते, त्यामुळे मालिका तशी जुळून आली. ते तेव्हाच होऊ शकलं. त्यावेळच्या मालिकांमध्ये आजच्यापेक्षा खूप फरक होता. आमच्या मालिकेत कोणी व्हिलन नव्हतं. नकारात्मक भूमिका नव्हती. एकत्र कुटुंबाची गोष्ट असलेली ती मालिका होती. त्यातला खरेपणा टिकून होता. हेच त्या मालिकेचं वैशिष्ट्य होतं”…
१३ वर्षांनी मालिकेची लोकप्रियता अजूनही टिकून आहे हे सांगताना ललित म्हणाला की, “अर्थात त्याचं लिखाण, दिग्दर्शन आणि त्यातील सगळे कलाकार यांनी त्या भूमिका जिवंत केल्या. मला आजही लोक आदित्य या नावानेच आधी हाक मारतात. आदित्य या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आणि अजूनही करत आहेत. अजूनही आदित्य-मेघना जोडीचे इन्स्टाग्रामवर फॅन पेजेस आहेत. अजूनही लोकांना आम्हाला एकत्र बघायचं आहे. आजही यूट्यूबवर अनेक प्रेक्षक ती मालिका बघतात. रोज मेसेजेस येतात की, आम्ही सात ते आठ वेळा ही मालिका पाहिली. हे प्रेम खूप जास्त आहे”…

हेमंत देवधर यांचं दिग्दर्शन असलेल्या या मालिकेची कथा लिहिली होती विनय आपटे यांनी… आता विनय काका म्हणजे कथेचा बादशाह… प्रेक्षकांना कसं खिळवून ठेवायचं हा त्यांच्या डाव्या हाताचा खेळ आणि अगदी त्याप्रमाणे प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांनी लोकांची उत्सुकता अधिक वाढवत एक सोफ्ट, प्रत्येकाच्या घरात घडणारी प्रेमकथा मांडली होती… या मालिकेत ललित आणि प्राजक्तासोबतच गिरीश ओक, सुकन्या मोने, लोकेश गुप्ते, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, उदय टिकेकर, योगिनी चौक, सायली देवधर अशा अनेक कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या…
================================
हे देखील वाचा : Bhushan Pradhan ने सिक्रेटली केला साखरपूडा; अनुषाचं आहे का गौराई?
================================
झी मराठी या वाहिनीनने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी काहीतरी खास कायम भेटीला आणलं.. ‘भटकंती’, ‘आम्ही सारे खवय्ये’, ‘वादळवाट’, ‘पिंजरा’, ‘कुंकू’, ‘असंभव’, ‘फु बाई फु’, ‘हसा चकट फू’, ‘१०० डेज’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘लागीरं झालं जी’, ‘होणार सून मी या घरची’, ‘सारे कळत नकळतच घडते’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘अगंबाई सूनबाई’, ‘देवमाणूस’, ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ अशा अनेक अजरामर मालिका, हास्य शो आणि बरंच काही प्रेक्षकांना दिलं… मात्र, सध्या चॅनलवर सुरु असणाऱ्या मालिकांच्या कथेचा प्लॉट प्रेक्षकांच्या फारसा पचणी पडत नाही असं दिसून येतं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi