Skip to content Skip to sidebar Skip to footer

“मालवणी असल्यामुळे Dashavatar चित्रपटात हवाच होतो”; नाईकांची खंत

गेल्या काही दिवसांपासून Digambar Naik मालवणी भाषेमुळे विशेष चर्चेत आहेत… निर्माते Aadesh Bandekar यांनी मालवणी असूनही त्यांना मालिकेतून बाहेर काढलं असा आरोप नाईक यांनी केला होता.. आणि आता दशावतार या मराठीतील गाजलेल्या आणि लोकप्रिय चित्रपटाचा उल्लेख करत मालवणी असूनही त्या चित्रपटात कास्ट न केल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे… नेमकं काय म्हणाले आहेत दिगंबर नाईक जाणून घेऊयात… (Marathi Entertainment News)

दिगंबर नाईक मुलाखतीत म्हणाले की, “मी जरी मोठेपणा सांगितला ना की,सगळे निर्माते मालवणी आहेत त्यांना मालवणी माणूस नको असतो. आणि जर हवा असता तर त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो दिसला असता. दिसणाऱ्यासारखा जो फेम लागतो, जो चेहरा लागतो तो माझ्याकडे आहे, माझ्यासारख्या काही लोकांकडे आहे. हे एक दुःख आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की, माझं मालवणी भाषेवर प्रेम आहे, तर ते आहेच ना. मनापासून असावं लागतं, खोटं असेल तर ते दिसून येतं”…

पुढे ‘दशावतार’बद्दल बोलताना दिगंबर म्हणाले की, “बहुतेक चित्रपट कोकणात होतात. त्यात काही छोटीशी भूमिका असेल तर तिथली लोकं करतात. पण आता कोकणावर चित्रपट आहे, तर त्याच्यात तुम्हाला कोकणी कलाकार दिसत नाही. त्यात मालवणी नाही तर दुसरे भाषिक लोक असतात.माझेच मित्र अशा चित्रपटात काम करतात. त्या भाषेवर प्रेम असणारी लोकं पाहिजे, असं नाही राहिलं आता. नाहीतर, ‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक असायला पाहिजे होता ना. माझं दशावतारावर खूप प्रेम आहे, मी जेवढं दशावतार पाहिलं तेवढं कोणीच त्या चित्रपटातल्या कलाकारांनी पाहिलं नसेल“… आपल्या मनातील भावना पुढे व्यक्त करत असताना ते असं देखील म्हणाले की “मला फोन येतात लोकांचे, ‘तू का नाहीस चित्रपटात’ मी सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. माझा कोणावर राग नसतो, मी स्पष्टच विचारतो. एवढं सगळं करून घेतलं नाही किंवा विचारलं नाही, ही खंत वाटते”…

“बांदेकर मालवणी असूनही मला मालिकेतून बाहेर काढलं”!

दरम्यान, आदेश बांदेकर यांच्याबद्दल दिगंबर नाईक काय म्हणाले होते ते जाणून घेऊयात… “मालवणी निर्मात्याला किंवा मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो. सध्या जितक्या मालिका सुरु आहेत त्यांचे निर्माते मालवणी आहेत. जर त्या मालवण्याला या मालवण्याचा अभिमान वाटला असता किंवा आत्मियता वाटत असती तर मी आज बिझी असतो. बरं आदेश बांदेकर जो माझा मित्र आहे, त्यानेच मला ‘लक्ष्य’ मालिकेतून रात्री पावणे बारा वाजता काढलं. तेव्हा चॅनल हेडचं मत होतं की हा कॉमेडी करतो तर सिरीयस भूमिका कशी करेल? आता त्यांचं मतं असू शकतं पण बांदेकरांना असं नाही वाटलं की हा मालवणी मुलगा आहे, आपल्या मालिकेत घेऊयात. मालवणी मालिकेत किंवा सिनेमात मालवणी लोकं नको असतात हेच खरं आहे“. (Marathi Entertainment News)

पुढे नाईक असं देखील म्हणाले की, ‘माझ्या कोकणातल्या प्रेक्षकांना वाईट वाटेल, पण मालवणी अभिनेता म्हणून माझा सन्मान झाला नाही. म्हणजे मी ‘फू बाई फू’ शो करत होतो तेव्हा तिथे राकेश सारंग होते, ते कोकणातले होते, परीक्षक निर्मिती सावंत सुद्धा कोकणातल्याच. पण त्यांच्यापेक्षा जास्त कौतुक माझं Swapnil Joshiने केलं होतं. वाईट वाटेल, पण मी स्पष्ट बोलणारा आहे. मला हे बोलताना काही फरक पडत नाही. मला आता ‘वस्त्रहरण’ नाटक केल्यानंतरच प्रेक्षकांनी मालवणी अभिनेता म्हणून स्वीकारलं आहे”.

================================

हे देखील वाचा : Raja Shivaji : जे मराठीत कुणीच केलं नाही, ते रितेश करतोय!

================================

“दिगंबर यांना आत्मपरिक्षणाची गरज”; आदेश बांदेकर स्पष्टच म्हणाले

सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आंदेश बांदेकरांनी दिगंबर यांच्या प्रत्येक विधानाला खोडून काढलं आहे. बांदेकर व्हिडिओत असं म्हणतात, “मालवणी माणसाला मालवणी माणूस नको असं म्हणत असताना हे नम्रपणे सांगावंसं वाटतं की त्या ‘लक्ष्य’ मालिकेतल्या पाच जणांच्या टीममधील पोलीस Kamesh Sawant हा देवगडचा…मालवणीच. ज्याने आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. आणि आता दृश्यमच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. असे कितीतरी मालवणी आहेत जे इमाने इतबारे रंगदेवतेची सेवा करत आहेत“.

पुढे त्यांनी असं म्हटलं की, “सोहम प्रोडक्शनची ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेतील ऋतुजा बागवे ही नायिका…ही मालवणीच. त्याच मालिकेतील आजी रागिनी सावंत काय सुंदर मालवणी बोलतात…कारण त्या मालवणीच आहेत. शाब्बास सुनबाईमधल्या शकुंतला ताई नरे या देखील मालवणीच…यादीच काढायची झाली तर खूप नावं काढता येतील. मी मालिकेचा निर्माता कुडाळचाच मालवणी आहे. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या मातीला कधीही विसरता येत नाही. त्यामुळे जे केलं ते प्रामाणिकपणे केलं”. (Entertainment News in Marathi)

================================

हे देखील वाचा : Dashavatar ऑस्कर गाजवणार! मुख्य चित्रपटांच्या स्पर्धेत ‘या’ श्रेणीत पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची झेप

================================

तसेच, नाईक यांना टोला लगावत ते असं देखील म्हणाले की, “लक्ष्य या मालिकेत जवळपास ५ हजारांपेक्षा जास्त कलाकारांनी काम केलं. त्यातले कितीतरी मालवणीच आहेत. पण मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो. आपण भारताचे नागरिक आहोत. आपण प्रत्येक भागाचा, प्रांताचा आदर केला पाहिजे. मी इतकी वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे, मेहनतीने मनोरंजनाची सेवा करतोय. त्यामुळे उगाच असं काहीतरी विधान करणं, त्या विधानातून मालवणी माणसाला मालवणी माणूस नको…मला याच्यातून काढलं. मला याने घेतलं नाही. त्याने घेतलं नाही. असं म्हणण्यापैक्षा आपण काम करूया. आपल्या कामाचा ठसा उमटवूया. एक बोट समोरच्याकडे दाखवताना चार बोटं स्वत:कडे असतात. हे कधीच विसरू नये. आत्मपरिक्षण करावं…आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सेवा करावी”, असं चोख प्रत्युत्तर बांदेकरांनी दिलं आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!