
Swapnasundari: अखेर भूषण प्रधानच्या ‘त्या’ फोटोमागची स्वप्नसुंदरी आली समोर…
काही दिवसांपूर्वी अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) याने सोशल मीडियावर “Save the Date” अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण केलं होतं. रोमँटिक फोटो आणि एंगेजमेंट रिंग पाहून अनेकांनी त्याच्या लग्नाच्या चर्चाही सुरू केल्या होत्या. मात्र आता या चर्चेचा खुलासा झाला असून, ही पोस्ट त्याच्या नव्या चित्रपटासाठी असल्याचं समोर आलं आहे.स्वप्नसुंदरी (Swapnasundari) हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, तरुणाईमध्ये याबाबत खास उत्सुकता निर्माण झाली आहे.(Swapnasundari Marathi Movie)

नुकतंच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आणि सायली पाटील (Sayali Patil) यांची सुंदर आणि फ्रेश केमिस्ट्री पाहायला मिळते. निसर्गाच्या सान्निध्यात, शांत आणि रम्य वातावरणात बसलेली ही जोडी एकमेकांमध्ये हरवलेली दिसते. सायलीचा पारंपरिक आणि मोहक लूक, तर भूषणचा भावनिक आणि प्रेमळ अंदाज पोस्टरला एक वेगळीच उंची देतो. संपूर्ण मांडणी पाहता हा चित्रपट केवळ प्रेमकथा नसून, भावना आणि नात्यांचा प्रवास असणार असल्याचं जाणवतं. भूषण प्रधान (Bhushan Pradhan) हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि versatile अभिनेता मानला जातो. टाइमपास (Timepass), कॉफी बरच काही (Coffee Ani Barach Kahi) यांसारख्या चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्याच्या नैसर्गिक अभिनयशैलीमुळे आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे तो तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. रोमँटिक भूमिकांमध्ये त्याची खास पकड असल्यामुळे ‘स्वप्नसुंदरी’मधील त्याचा हा अवतार प्रेक्षकांसाठी अधिकच खास ठरणार आहे.

रेडबेल मीडिया निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन अक्षय जयसिंगराव शिंदे (Akshay Jaysingrao Shinde) यांनी केलं आहे. चित्रपटाच्या नावावरूनच ही कथा एका “स्वप्नातील व्यक्ती”च्या शोधाभोवती फिरणारी असल्याचं स्पष्ट होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते, जिच्यामुळे आयुष्याला अर्थ मिळतो याच भावनेला या कथेतून स्पर्श करण्यात आला आहे. या प्रवासात नायकाला कोणकोणत्या परिस्थितींना सामोरं जावं लागेल, त्याच्या आयुष्यात कोणते भावनिक चढ-उतार येतील आणि शेवटी त्याला त्याची “स्वप्नसुंदरी” खरंच मिळेल का? याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. येत्या २४ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यादिवशीच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.(Swapnasundari Marathi Movie)
================================
================================
दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे (Akshay Jaysingrao Shinde) म्हणतात, “प्रत्येकाच्या मनात काही न बोललेली स्वप्नं आणि भावना दडलेल्या असतात. ‘स्वप्नसुंदरी’ ही त्या भावनांना पडद्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. ही कथा प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून देईल.” एकूणच, प्रेम, स्वप्नं आणि भावनांचा नाजूक संगम असलेला ‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक हळवा, रोमँटिक आणि मनाला भिडणारा अनुभव ठरणार आहे.