Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘आली लग्नघटिका समीप’! मराठी कलाविश्वातील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात…

मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नसराईचा माहोल पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात करत आहेत. काहींची लग्नं नुकतीच पार पडली आहेत, तर काही जण लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री रूमानी खरे (Rumani Khare) हिचा साखरपुडा डिसेंबर २०२५ मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला होता. तिचा होणारा नवरा स्तवन शिंदे हा देखील मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असलेला अभिनेता आहे. सध्या या दोघांच्या घरी लग्नाआधीचे विविध विधी सुरू झाले आहेत. रूमानीने सोशल मीडियावर तिच्या ग्रहमुख सोहळ्याचे फोटो शेअर केले असून चाहत्यांकडून त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Marathi Celebrity Wedding)

Actress Rumani Khare wedding
Actress Apurva gore wedding

या सोहळ्यात अभिनेत्रीच्या हातावर स्तवनच्या नावाची सुंदर मेहंदीही काढण्यात आली होती. रूमानीने “तू तेव्हा तशी” या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तर स्तवन शिंदे “तुमचं आमचं सेम असतं” या मालिकेत झळकला होता. याशिवाय त्याने Party Class of 83 या चित्रपटातही काम केले आहे. त्यामुळे या जोडीच्या लग्नाची चर्चा सध्या चाहत्यांमध्ये रंगली आहे. दरम्यान, आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीही लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. “आई कुठे काय करते” या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अपूर्वा गोरे (Apurva Gore) हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. ती लवकरच अभिनेता अंशुमन जोशी (AndhumanJoshi) सोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

Actress Rumani Khare Wedding
Actress Apurva Gore Wedding

अपूर्वाच्या घरीही लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. तिने ग्रहमुख सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली. या खास प्रसंगी तिने आईच्या लग्नातील तब्बल ४० वर्षे जुना शालू नेसला होता. हा शालू परिधान केल्यानंतर आईच्या डोळ्यात आलेले आनंदाश्रू आणि त्या क्षणातील भावनिक वातावरण तिने शब्दांत व्यक्त केले. (Marathi Celebrity Wedding)

==================================

हे  देखील वाचा: Virosh Wedding: Rashmika-Vijay च्या रिसेप्शनला प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची हजेरी; समोर आलं खास कनेक्शन!

==================================

अपूर्वाने तिच्या पोस्टमध्ये या आठवणी आयुष्यभर जपून ठेवणार असल्याचंही सांगितलं आहे. आता चाहत्यांना या दोन्ही जोडप्यांच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता लागली आहे. लवकरच या कलाकारांच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होणार असल्याने मराठी कलाविश्वात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. 

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!