
Dhurandhar 2 चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज!
२०२५ या वर्षात ग्लोबली भारतीय चित्रपटसृष्टीचा आणखी एक झेंडा अभिमानाने रोवणाऱ्या ‘धुरंधर’ चित्रपटाने कमालच केली. बॉलिवूडमध्ये तर ८५० कोटींचा टप्पा पार करणारा आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) हा पहिला चित्रपट ठरला. इतकंच नाही तर रणवीर सिंगच्या करिअरमधील हा सर्वात अधिक कमाई करणारा आणि केवळ ५०० कोटी नाही तर ८५० कोटींचा कल्ब बॉलिवूडसाठी खुला करणारा हा पहिला चित्रपट ठरला. आता १९ मार्च २०२६ ‘धुरंधर २’ (Dhurandhar 2 : The Revenge)) आपल्या भेटीला येणार असून अखेर चित्रपटाचा ट्रेलर नेमकी कधी रिलीज होणार ती तारीख समोर आली आहे.
रणवीर सिंग याची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. परतुं, ट्रेलर कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. आता ती प्रतिक्षा संपली असून ७ मार्च २०२६ रोजी धुरंधर २ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज होणार आहे. आधी चित्रपटाचा ट्रेलर ३ मार्च २०२६ ला होळीच्या दिवशी येणार अशी चर्चा होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आणि आता ७ मार्च रोजी सकाळी ११.०१ वाजता ट्रेलर आउट होणार आहे. रणवीरने ट्रेलरच्या अनाऊसमेंटचं पोस्टर शेअर करत ही आनंदाचा बातमी दिली आहे. (Dhurandhar 2 trailer)

आता प्रेक्षकांना हमजाची कहाणी पाहण्यासाठी अधिकच आतुरता लागली आहे. यामध्ये रणवीरचा भूतकाळ प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे. आता रेहमान डकैतचा मृत्यू झाल्यामुळे अक्षय खन्ना दुसऱ्या भागात दिसणार का आणि दिसला तर काय स्टोरीलाईन असणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. (Akshaye Khanna)
================================
हे देखील वाचा : रॉकिंग स्टार यशच्या Toxic ची रिलीज डेट बदलली; ‘धुरंधर २’ला रान मोकळं मिळणार?
================================
दरम्यान, १९ मार्च २०२६ रोजीच यश याचा ‘टॉक्सिक’ (Yash’s Movie) चित्रपटही रिलीज होणार होता. त्यामुळे एकाच दिवशी २ बिग बजेट चित्रपट रिलीज होणार असल्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ झाली होती. मात्र, सध्या जगभरात सुरु असलेल्या युद्धामुळे ‘टॉक्सिक’ (Toxic : A Fairytale for Grown ups) चित्रपटाच्या टीमने रिलीज डेट १९ मार्च ऐवजी आता ४ जून २०२६ केली आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर १९ मार्च २०२६ला फक्त धुरंधर २ चित्रपटाचंच राज्य असणार आहे. ‘धुरंधर २’ मध्ये रणवीर सिंह, राकेश बेदी, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन यांच्याशिवाय आणखी कोण कलाकार दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi