Skip to content Skip to sidebar Skip to footer

निखिल बने नंतर Maharashtrachi Hasyajatra मधील आणखी एका अभिनेत्याचा मोठा अपघात; तातडीने करावी लागली शस्त्रक्रिया

काही दिवसांपूर्वी लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम निखिल बने याचा अपघात झाला होता आणि पुन्हा एकदा याच शो मधील प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारा अभिनेता विराज जगताप (Viraj Jagtap) सध्या एका अपघातामुळे चर्चेत आला आहे. या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट्स जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.(Viraj Jagtap Accident)

Maharashtrachi Hasyajatra Viraj Jagtap Accident
Viraj Jagtap Accident

मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्च रोजी बदलापूरमधील आदर्श मंदिर परिसरात हा अपघात घडला. विराज एका कार्यक्रमानिमित्त मित्राकडे गेला होता आणि रात्री परतताना त्याच्यासोबत ही दुर्घटना घडली. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास तो घरी परतत असताना रस्त्यातील गतीरोधकाचा अंदाज त्याला आला नाही. विशेष म्हणजे त्या गतीरोधकावर कोणतेही पांढरे पट्टे नसल्याने तो लक्षात न आल्याचं सांगितलं जात आहे. परिणामी गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला.

Maharashtrachi Hasyajtar Viraj Jagtap Accident
Viraj Jagtap Accident

या अपघातात विराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या मनगटावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सुदैवाने तो सध्या सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच निखिल बने (Nikhil Bane) याचाही अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता विराजच्या अपघातामुळे पुन्हा एकदा कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Maharshtrachi Hasyajatra Viraj Jagtap Accident
Viraj Jagtap Accident

या घटनेनंतर बदलापूरमधील स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यांची दुरवस्था, अनधिकृत गतीरोधक आणि योग्य मार्किंगचा अभाव यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटलं आहे, “बदलापूर शहरात एका बाजूला कोट्यवधींच्या विकासकामांसाठी भूमिपूजन आणि सुशोभीकरणाच्या घोषणा होत आहेत; मात्र दुसरीकडे मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था खूपच खराब आहे आणि गतिरोधकांची देखभालही नीट होत नाही. अनेक ठिकाणी नियमबाह्य आणि अनधिकृत गतिरोधक उभारण्यात आले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.”(Viraj Jagtap Accident)

=================================

हे देखील वाचा: Madhuri Dixit ने लोअर परेलमध्ये घेतलं ऑफिस; भाडं ऐकून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का !

==================================

सध्या विराजच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत असली, तरी या अपघातामुळे स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जातील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!