
आलिया-शर्वरीच्या अॅक्शन थ्रिलर Alpha चित्रपटाची रिलीज डेट जाहीर!
स्पाय अॅक्शन (Spy Universe Of Bollywood) चित्रपट पाहणारा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. आणि त्यामुळेच यशराज फिल्म्सने स्पाय युनिवर्स तयार केलं. आणि या युनिवर्समधला पहिला चित्रपट होता ‘एक था टायगर’ (Ek Tha Tiger) जो २०१२ मध्ये रिलीज झाला. त्यानंतर एकामागून एक सुपरहिट चित्रपट दिले. आणि आता पहिल्यांदाच या मेल स्पाय युनिवर्समध्ये फिमेल स्पाय एन्ट्री करणार आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्या चित्रपटाची चर्चा सुरु होती तो ‘अल्फा’ (Alpha Movie) आता लवकरच रिलीज होणार आहे. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या अल्फा चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. (Bollywoo)
यश राज फिल्म्सने स्पाय अॅक्शन चित्रपट ‘अल्फा’ (Alpha) च्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा करून चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. ‘अल्फा’ हा चित्रपट १० जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. खरं तर आधी हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता. मात्र, सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle Of Galwan) आणि ‘धमाल ४’ (Dhamaal 4) हे चित्रपट रिलीज होणार असल्यामुळे क्लॅश होऊ नये यासाठी टीमने रिलीज डेट बदलली.

दरम्यान, ‘अल्फा’ या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा दमदार आणि आक्रमक अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. शिवाय, तिच्यासोबत मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) देखील महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे अल्फामध्ये अनिल कपूर आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. त्यामुळे आलियाला हटके अंदाजात पाहण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उस्तुक आहेत. तसेच, अल्फा नंतर आलिया संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह एण्ड वॉर’ (Love & War) या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत दिसणार आहे. (Alia Bhatt Movies)
================================
हे देखील वाचा : बॉलिवूडचं Spy Universe!
================================
दरम्यान, ‘अल्फा’ हा YRF स्पाय युनिव्हर्समधील ७ वा चित्रपट आहे. या आधी ‘एक था टायगर’, ‘वॉर’, ‘पठाण’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर २’ हे स्पाय चित्रपट आपल्या भेटीला आले होते. आता अल्फा हा पहिला फिमेल स्पाय चित्रपट या युनिवर्सचा भाग होणार असून याचं दिग्दर्शन शिव रवैल यांनी केले आहे. (YRF Spy Universe Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi