Skip to content Skip to sidebar Skip to footer

“आवाज कहां तक जानी चाहिए?”; Border 2 चा अंगावर काटा आणणारा टीझर रिलीज

१९९७ मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ (Border) चित्रपटाची आठवण आजही आपल्या मनात कायम आहे.. आणि अशातच तब्बल २९ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल ‘बॉर्डर २’ (Border 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे… १९७१ च्या युद्धातील भारताच्या विजयाची आठवण करून देणाऱ्या ऐतिहासिक दिनी म्हणजेच १६ डिसेंबरला ‘बॉर्डर २’चा टीझर झाला. यातील सनी देओलचा आवाज, युद्धाची दृश्ये आणि पार्श्वसंगीत अंगावर काटा आणणारा आहे.  (Border 2 movie)

‘बॉर्डर २’ च्या टीझरची सुरुवात होते १९७१ चं भारत-पाकिस्तान युद्ध.. या शब्दाने… त्यानंतर युद्धाचा सायरन आणि सनी देओलच्या पोलादी आवाजातील डायलॉग ऐकू येतो. “तुम जहां से भी घुसने की कोशिश करोगे, आसमान से, जमीन से, समंदर से, सामने एक हिंदुस्तानी फौजी खड़ा पाओगे, जो आंखों में आंखें डालकर सीना ठोककर कहेगा, हिम्मत है तो आ ये खड़ा है हिंदुस्तान,” असा हा डायलॉग आहे. या डायलॉगसोबतच वरुण, दिलजित आणि अहान यांच्या भूमिकांची झलक पहायला मिळते. एका दृश्यात सनी देओल सैन्याला विचारतो, “आवाज कहां तक जानी चाहिए?” त्यावर सैनिकांचं एकमुखी उत्तर ऐकू येतं, “लाहोरपर्यंत”… देशभक्तीवर चित्रपटांच्या यादीतील बॉर्डर २ प्रेक्षकांची मनं जिंकेल का? आणि २०२६ ची सुरुवात दमदार करणारा हा चित्रपट ठरणार का हे पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत… (Sunny Deol Movie)

‘बॉर्डर 2’ या सीक्वेलमध्ये सनी देओल शीख व्यक्तीरेखेत आहे. तर दिलजितने भूमिका भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर आणि परमवीर चक्र विजेते निर्मलजीत सिंग सेखों यांची साकारली आहे… वरुण धवनची भूमिका भारतीय लष्कराचे परमवीर चक्र विजेते कर्नल होशियार सिंग दहिया यांच्यापासून प्रेरित आहे. जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’ हा चित्रपट 1971 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान लोंगेवाला पोस्टवर झालेल्या लढाईवर आधारित होता.

================================

हे देखील वाचा : “अमिताभ बच्चन आमच्यासोबत जेवायचे नाहीत, कारण…”; Suneil Shetty ने सांगितला ‘तो’ किस्सा!

================================

सनी देओल, दिलजित दोसांझ, वरुण धवन (Varun Dhawan) आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बॉर्डर २’ चित्रपट २६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज होणार आहे… मुख्य म्हणजे बॉर्डरमध्ये सुनील शेट्टी यांनी सनी देओलसोबत स्क्रिन शेअर केली होती आणि बॉर्डर २ मध्ये त्याचा मुलगा अहान शेट्टी सनीपाजींसोबत दिसणार आहे… (Border 2 Release Date)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!