Skip to content Skip to sidebar Skip to footer

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही गाजवणार; पाहा कुठे आणि कधी पाहू शकाल?

या वर्षीच्या म्हणजेच २०२६ च्या सुरुवातीलाच मराठी चित्रपटसृष्टीला मोठी भेट मिळाली. ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam) हा सिनेमा १ जानेवारीला प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यापासून बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला. आशयघन विषय, भावनिक मांडणी आणि प्रभावी अभिनयामुळे चित्रपटाने कोट्यवधींची कमाई करत चर्चेचा विषय ठरला. आता हा गाजलेला सिनेमा २७ फेब्रुवारी रोजी, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने, ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा डिजिटल प्रीमियर ZEE5 वर होणार असून त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे. मातृभाषेतून शिक्षण घेण्याचं मूल्य आणि मराठी शाळांचं सांस्कृतिक योगदान या चित्रपटातून ठळकपणे मांडण्यात आलं आहे. (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release)


Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Full Movie
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Marathi Movie

या चित्रपटात सचिन खेडेकर (Sachin Khedekar), अमेय वाघ (Amey Wagh), प्राजक्ता कोळी (Prajakta Koli), क्षिती जोग (Kshitee Jog) , सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) , हरीश दुधाड़े (Harish Dudhadhe), Pushkaraj Chirputkar आणि Kadambari Kadam यांसारख्या कलाकारांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. आणि त्यांच्या अभिनयामुळे कथेला वेगळंच वजन प्राप्त झालं.

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Marathi Movie
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Full Movie

दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं की, हा सिनेमा म्हणजे मराठी माध्यम शाळांचा आणि त्या शाळांशी जोडलेल्या आठवणींचा उत्सव आहे. आपल्या भाषेचा अभिमान आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटगृहांमध्ये मिळालेलं प्रेम अविस्मरणीय असल्याचं त्यांनी नमूद केलं आणि आता ओटीटीच्या माध्यमातून अधिकाधिक घरांपर्यंत पोहोचण्याचा आनंद व्यक्त केला.तर प्राजक्ता कोळी हिनेही आपल्या मराठी चित्रपटातील पदार्पणाबद्दल भावना व्यक्त करत सांगितलं की, हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत खास आणि समाधान देणारा ठरला. (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release)

==============================

हे देखील वाचा: ज्याने खळखळून हसवलं, तोच मराठी अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावर पोस्ट लिहीत व्यक्त केल्या भावना…

==============================

एकूणच, ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam)हा सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून मराठी भाषेचा सन्मान आणि मातृभाषेतील शिक्षणाची जाणीव करून देणारा ठरतो. आता ओटीटीवरच्या प्रदर्शनानंतर तो आणखी व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!