Skip to content Skip to sidebar Skip to footer

Mughal-E-Azam : एका गाण्यासाठी उस्ताद बडे गुलाम अली खां यांनी तब्बल २५ हजार रुपये घेतले होते!

भारतीय सिनेमाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षराने नोंदवलेला ‘मुगल ए आजम’ हा चित्रपट आज देखील कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो.  ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईच्या मराठा मंदिरमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने संपूर्ण सिने दुनियेत मोठी हलचल निर्माण केली होती. के आसिफ या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. अतिशय तब्येतीने बनवलेला हा चित्रपट त्यातील प्रत्येक गोष्टीसाठी आजही आठवला जातो.  के असिफ यांनी प्रत्येक शॉटसाठी घेतलेली मेहनत, चित्रपटातील प्रत्येक फ्रेम कशी सक्षम होईल यासाठी केलेले प्रयत्न त्यांच्या कार्य कर्तृत्वाची साक्ष देण्यासाठी पुरेसे आहेत.  या चित्रपटाला संगीतकार नौशाद यांचे संगीत होते.  या चित्रपटातील दोन गाणी उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी गायलेली होती. बडे गुलाम अली खान हे त्या काळातील शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च असं नाव होतं. ठुमरी गायनात त्यांच्या तोंडीचा दुसरा गायक नव्हता, शास्त्रीय संगीतात मुशाफिरी करणारे कलावंत चित्रपटात सहसा गात नसत. ‘बैजू बावरा’ या चित्रपटासाठी संगीतकार नौशाद यांनी बडे गुलाम अली खान यांना विचारले होते परंतु त्यांनी चित्रपटासाठी गायला नकार दिला होता.  

‘मुगल ए आजम’ या चित्रपटात सलीम अनारकली यांचा एक प्रणय प्रसंग होता. मध्यरात्री अनारकली सलीमला बागेत भेटायला येते.  दोघांमध्ये निशब्द संवाद होतो. अनारकली सलीमच्या मांडीवर डोके ठेवून त्याच्याकडे बघत असते त्या वेळी सलीम तिच्या गालावरून एक मोरपीस फिरवतो, खूप रोमॅंटिक असा हा प्रसंग होता. राजघराण्यातील शालिनतेचा तो उच्च कोटीचे प्रेम प्रसंग होता. त्या पार्श्वभूमीवर दरबारातील प्रमुख गायक पं .तानसेन गात असतो. ते गाणे त्या प्रसंगाचे कलटमक मूल्य वाढवते.  आता या सिच्युएशनसाठी गायक म्हणून कोणाला निवडायचे हा मोठा प्रश्न होता. के असिफ यांनी संगीतकार नौशाद यांना विचारले,” या गाण्यासाठी आपण गायक म्हणून कुणाला घ्यायचे?”  त्यावेळी नौशाद म्हणाले,”कायदे से हमे उसी आवाज को चुनना चाहीए जिसे आज की दुनिया आज का तानसेन कहती है!”  आसिफ यांनी विचारले ,”ते कोण आहेत?” . तेव्हा नौशाद अली म्हणाले,”उस्ताद बडे गुलाम अली खान साहब! “.  

================================

हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!

================================

परंतु त्यांनी त्याच वेळेला त्यानी बैजू बावराच्या वेळेस दिलेला नकार देखील सांगितला.  त्यावर के आसिफ त्यांचे म्हणणं होतं,” तुम्ही फक्त उस्ताद जी ची  अपॉइंटमेंट घ्या मी पुढचे बघतो!” त्या पद्धतीने नौशाद यांनी उस्ताद बडे गुलाम अली खान यांची वेळ घेतली आणि त्यांना भेटायला के असिफ यांच्यासोबत ते गेले. सुरुवातीच्या जुजबी चर्चेनंतर नौशाद यांनी मुद्द्याला हात घातला आणि ते म्हणाले,” मुगल-ए-आजम नावाचा एक चित्रपट बनत आहे. अतिशय भव्य दिव्य असा हा सिनेमा आहे. या सिनेमात पं.तानसेन यांच्यावर एक गाणं चित्रीत होणार आहे. हे गाणे आपण गावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे”. त्यावर उस्ताद बडे गुलाम अली खान म्हणाले ,”नौशाद साहेब, तुम्हाला यापूर्वी देखील मी सांगितला आहे. आम्ही संगीत मैफलमध्ये सलग दोन डॉन तास गाणारे कलाकार आहोत.  चित्रपटातील  दोन-तीन मिनिटाचे गाणे आम्ही जाऊ शकत नाही!” त्यावर इतक्या वेळ शांत बसलेले आसिफ म्हणाले,” खां  साहब , गाना तो आप ही गायेंगे!”. उस्ताद जी नी नौशाद यांना विचारले,” ये जनाब कौन है?” त्यावर नौशाद म्हणाले,”  हेच चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत के आसिफ.” त्यावर खा साहेब म्हणाले,”काय अजब माणूस आहे मी साफ इन्कार करतो आहे आणि हे मला म्हणतात आप ही गायेंगे! अब क्या जबरदस्ती गवाएंगे क्या?”.

पुढे त्यावर के आसिफ म्हणाले,” गुस्ता खी माफ साहब. पर गाना आप ही गायेंगे. आपको गाने की मुंह मांगी किंमत दी जायेगी!”  खा साहेब नौशाद यांच्या  कानात म्हणाले,” कुठून याला पकडून आणला आहे?  माझ्याकडून हे काय जबरदस्ती गाणं गाऊन घेणार आहेत का?” असे म्हणून खा साहेब नौशाद यांन बाल्कनी मध्ये घेवून गेले आणि त्यांना म्हणाले,” मी त्यांना अशी रक्कम सांगतो की ती ऐकून जागच्या जागी ते उडतील आणि उलट्या पावलाने निघून जातील !”  नौशाद आणि खा साहेब पुन्हा हॉलमध्ये आले आणि के  असिफ यांना म्हणाले,” मी गाणं गायला तयार आहे पण एका गाण्याचे मला 25 हजार रुपये द्यावे लागतील!”  ही रक्कम अर्थातच खूप मोठी होती . कारण त्याकाळी पार्श्वगायकाला एका गाण्याचे तीनशे ते पाचशे रुपये मिळत असायचे असे असताना एका गाण्यासाठी पंचवीस हजार रुपये म्हणजे प्रचंड मोठी किंमत होती.  खान साहेबांना वाटले ही रक्कम ऐकून की असिफ सॉरी म्हणून निघून जातील पण झाले उलटेच ते म्हणाले,” खां साहेब,  केवल पच्चीस हजार आपकी किंमत तो इससे कई गुणा  अधिक है.  ठीक है. शुक्रिया “ असे म्हणून त्यांनी दहा हजाराच्या  करकरीत नोटा काढून त्यांच्यासमोर ठेवल्या आणि म्हणाले” ये रख लो  ॲडव्हान्स.” नंतर उस्ताद बडे गुलाम अली खान गाण्याच्या रिहर्सल ला आले.  

================================

हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

=================================

संगीतकार नौशाद यांनी या गाण्याची चाल सोहनी रागामध्ये बांधली.  हा राग मध्यरात्री नंतर गायला जातो.  ‘प्रेम जोगनबनके…’  हे ते गाणे होते. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी उस्ताद साहेबांची इच्छा नुसार गादी तक्या लोड ची सोय करण्यात आली. त्यांच्यासमोर हार्मोनियम ठेवण्यात आला आणि गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. आणि सिनेमातील सर्वाधिक रोमॅंटिक गाण्याची निर्मिती झाली.  यानंतर या चित्रपटातील आणखी एका गाण्यासाठी उस्ताद बडे गुलाम अली खान यांना प्राचारण करण्यात आले हे गाणं होतं ‘शुभ दिन आयो राज दुलारा..’ (जे सलीम च्या जन्माच्या वेळी टाकले होते.)  या गाण्यासाठी देखील आसिफ  यांनी पंचवीस हजार रुपये उस्ताद जी यांना  दिले म्हणजे एका चित्रपटातील दोन गाण्यासाठी तब्बल 50 हजार रुपये देण्यात आले.चित्रपटात पं . तानसेन यांची भूमिका जुन्या काळातील अभिनेते सुरेन्द्र यांनी केली होती. 

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी 

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!