Skip to content Skip to sidebar Skip to footer

जेव्हा पाकिस्तानी सैनिकानी Raj Kapoor बॉर्डरवर जलेबी आणि पकोडे खिलवले!

हा किस्सा 1972 सालचा आहे तेव्हा आर के फिल्म्सचा ‘बॉबी’ हा चित्रपट फ्लोअरवर होता.  या सिनेमाचे बरेचसे चित्रीकरण काश्मीरमध्ये झाले होते.  या शूटिंगच्या दरम्यानचा हा बेफाम किस्सा आहे. राजकपूर यांची लोकप्रियता केवढी प्रचंड होती हे त्यावरून कळते. या शूटिंगच्या दरम्यान एकदा राजकपूर आणि त्यांची टीम शूटिंग लोकेशन पाहण्यासाठी बॉर्डरच्या दिशेने जात होते त्यांना ऍक्च्युअल तिकडे शूट करायचे नव्हते पण काही निसर्गाचे शॉट्स त्यांना तिथे घ्यायचे होते.  जेव्हा चेक पोस्ट पर्यंत ही लोकं पोहोचली तेव्हा भारतीय सैनिकाच्या एका टीमने त्यांना तिथे थांबवले. 

राजकपूर आपल्या कारमधून खाली उतरले आणि त्या सैनिकाला म्हणाले,” जयहिंद, मी राजकपूर आहे मला माझ्या सिनेमासाठी काही निसर्गाचे शॉट्स घ्यायचे आहेत” त्यावर तो सैनिक म्हणाला,” सर, तुम्हाला कोण ओळखत नाही? पण तुम्हाला हे शूट करण्यासाठी आमच्या कमांडरची परवानगी लागेल!”  त्या सैनिकाने वायरलेसवरुन कमांडर यांच्याकडे निरोप पाठवला. थोड्या वेळात कमांडर स्वतः तिथे आले. राज कपूर यांना भेटले आणि त्यांना परवानगी दिली.  सीमेवरील सैनिकांना राज कपूर यांना भेटून खूप आनंद झाला होता. राज  कपूरने विचारलं,” आम्ही लाईन ऑफ कंट्रोल पर्यंत जाऊ शकतो का?”  कमांडरने सांगितले,” का नाही?”  कमांडर साहेबांनी लगेच आपल्या दोन खास जीप आणि सैनिक त्यांच्यासोबत दिले आणि ही सर्व मंडळी लाईन ऑफ कंट्रोलकडे गेली. राज यांना ते लोकेशन खूप आवडले त्यांच्या क्रू ने तिथली काही निसर्गदृश्ये घेतली. पुढे  तिथे नो मॅन्स लँड होती.  राज कपूरने तिथे देखील थोडेफार चित्रीकरण केले. 

भारतीय सैनिकांना राज कपूर आणि टीम आल्याचा खूप आनंद झाला. त्यांनी त्यांच्यासाठी पकोडे, समोसे आणि गरमागरम चहाची सोय केली. सर्वांनी आनंदात डान्स केला. ‘आवारा हूं..’ गाण्यावर सैनिकांनी जल्लोष केला. राजकपूरने आपल्या टीमसोबत सर्वांचे सोबत फोटो काढले.  राज कपूर जेव्हा सर्वांचा निरोप घेऊन  जायला निघाले तेव्हा सैनिकांनी सांगितले “थांबा थांबा…!” राजने  विचारले,” आता काय?”  तेव्हा ते सैनिक म्हणाले की,”तुम्ही इथे आलेले आहात हे आम्ही वायरलेस रेडिओवरून पाकिस्तानी सैनिकांना देखील सांगितले आहे ते देखील तुम्हाला भेटू इच्छितात!”  राजकपूरला खूप आनंद झाला. काही वेळात पाकिस्तानचे  सैनिक नो मॅन्स लँड वर तिथे आले आणि त्यांनी राज कपूरसाठी जिलेबी आणि खूप मिठाई आणली होती!  राजकपूरला भेटल्याचा सर्वांना खूप आनंद झाला. राजने सर्वांसोबत फोटो काढले. 

================================

हे देखील वाचा : Shashi Kapoor यांना राज कपूर यांनी कोणता मोलाचा सल्ला दिला होता?

================================

कला हा असा विषय आहे जो दुसऱ्या कुठल्याही भावनांच्या खूप  पुढे असतो.  जिथे धर्म, देश, जात याच्या भिंती कलेला अडवू शकत नाहीत। हा किस्सा राज कपूर यांचे तत्कालीन सहाय्यक राहुल रवैल यांनी त्यांच्या Raj Kapoor : The master at work या पुस्तकात लिहिला आहे!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!