
‘या’ गाण्यात Pancham Da ने दोन रागांचा कल्पकतेने वापर केला होता!
संगीतकार आर डी बर्मन हे खऱ्या अर्थाने जीनियस संगीतकार होते. गाण्यांमधील भावना ओळखून ते गाणे कोणत्या रागामध्ये स्वरबद्ध करायचे हे ठरवायचे . आणि हे ठरवताना गाण्याच्या शब्दाला कुठेही बाधा न येऊ देता त्यातील भाव छटा योग्य रीतीने रसिकांपर्यंत पोहोचाव्यात याची काळजी घेत. विशेषतः आर डी बर्मन जेव्हा शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित रचना बनवायचे त्या वेळेला याचा विशेष अनुभव यायचा. आर डी बर्मन यांनी पाश्चात्य संगीतावर आधारित अनेक गाणी त्यांनी दिली त्या प्रांतातले ते खऱ्या अर्थाने बॉस होते. पण भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित त्यांच्या रचना या कल्ट क्लासिक ठरल्या.
१९७२ साली सुपरस्टार राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांना घेऊन दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी ‘अमर प्रेम’ हा चित्रपट बनवला होता. एक शुद्ध प्रेम कहानी यात दाखवली होती. या चित्रपटात ‘रैना बीती जाये श्याम ना आये….’ ही आनंद बक्षी यांनी लिहिलेली अप्रतिम रचना लता मंगेशकर यांनी गाऊन अजरामर केली होती. या गाण्यांमध्ये आर डी बर्मन यांनी दोन रागांचा अतिशय मार्मिक पणे उपयोग केला आहे आणि हे जे दोन राग त्यांनी निवडले ते देखील अतिशय कल्पकतेने आणि गीतातील भावना लक्षात घेऊन निवडले होते.

या गाण्याच्या आधी चित्रपटात आनंद बाबू म्हणजे राजेश खन्ना आणि पुष्पा म्हणजे शर्मिला परस्परांना भेटलेले नसतात किंबहुना त्यांनी एकमेकांना पाहीलेले देखील नसते. यात शर्मिला टागोर कोठीवर गाणे गाणारी दाखवली आहे. राजेश खन्ना तिचे सूर ऐकून , त्या सूरांवर मोहित होऊन खेचल्यागत त्या दिशेने जावू लागतो. या स्वरामध्ये आर डी बर्मन यांना आर्तता हवी होती. दुःख हवं होतं. चित्रपटात आनंद बाबू आणि पुष्पा हे दोघे दुःखाने व्यतीत आहेत. शर्मिला चे लग्न झाले आहे पण तिला तिच्या नवऱ्याने टाकले आहे आणि तिची रवानगी कोठीत झाली आहे तर दुसरीकडे आनंद बाबू तथा राजेश खन्ना चे देखील लग्न झाले आहे पण तो त्याच्या वैवाहिक जीवनात सुखी नाही. सुखाच्या शोधात तो इथे आलेला असतो. हे दोघे पीडित आहेत. सम दु:खी आहेत.

यासाठी या गाण्यातील सुरुवातीचा आलाप आणि सुरुवातीच्या ओळी पंचम यांनी राग तोडी मध्ये घेतल्या आहेत. तोडी राग हा दुःख , वेदना मांडणारा राग आहे. या गाण्याचा आलाप ऐकून आनंद बाबू कोठीवरील माडीच्या शिडी चढू लागतो जो तो जेव्हा माडीवर येतो तेव्हा मदनपुरी त्याला बघून आश्चर्यचकित होतो आणि जोरजोराने बोलू लागतो (आइये आइये आनंद बाबू आप और इस मंदिरमे ?”) परंतु आनंद बाबू चे संपूर्ण लक्ष पुष्पाच्या गाण्याकडे असते तो मदनपुरील चूप करून पुष्पा ला म्हणतो ,” गाईये ना ,आप रूक क्यू गयी?” इथे दोघांचे नजरा नजर होते. एकमेकांच्या दुःखांची देवाणघेवाण होते. परस्परांचे दुःख समजलं जातं. काहीही न बोलता पुष्पा अंतरा गायला सुरुवात करते,’ शाम को भुला श्याम का वादा..’ आता पंचम दा ने इथे खमाज राग वापरला आहे. खमाज राग हा शृंगार प्रधान रंग आहे. इथे आनंद आहे तृप्ती आहे. त्या मुळेच पंचम ने अंतऱ्याला खमाज रंग वापरला तर सुरुवातीला रंग तोंडी वापरला.
================================
हे देखील वाचा : प्लेबॅकसाठी Kishore Kumar यांच्याच नावाचा आग्रह पंचम यांनी का धरला होता?
================================
या सिनेमातील किशोरकुमार यांनी गायलेली तीन गाणी बेहद खूबसूरत बनली होती . ये क्या हुआ कैसे हुआ (रंग- किरवाणी ) कुछ तो लोंग कहेंगे लोगो का काम है कहना(राग -खमाज ) चिंगारी कोई भडके (राग – भैरवी ) अमर प्रेम भारतीय सिनेमाच्या इतिहासातील अजरामर चित्रपट आहे. विशुद्ध प्रेमाची भावस्पर्शी कहाणी यात मांडली होती. ‘अमर प्रेम’ हा चित्रपट निशी पद्म (१९७०) या बंगाली सिनेमाचा रिमेक होता. बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या ‘हिंगेर कचौरी’ या कलाकृतीवर हा सिनेमा आधारीत होता. २८ जानेवारी १९७२ या दिवशी ‘अमर प्रेम’ प्रदर्शित झाला.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी