Skip to content Skip to sidebar Skip to footer

Rohan Gujar Wife Baby shower: अभिनेता रोहन गुजर होणार बाबा, खास व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना दिली गोड बातमी

मराठी मनोरंजनविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘होणार सून मी या घरची’ (Honar Sun Mi Ya Gharachi)  या लोकप्रिय मालिकेत ‘पिंट्या’च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता रोहन गुजर (Rohan Gujar) लवकरच बाबा होणार आहे. लग्नाच्या तब्बल आठ वर्षांनंतर त्याच्या आणि पत्नी स्नेहलच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याने कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे.ही गोड बातमी रोहनने आपल्या सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत शेअर केली. नुकतंच स्नेहलचं डोहाळेजेवण पार पडले असून त्या सोहळ्यातील काही सुंदर क्षण त्याने चाहत्यांना दाखवले. पारंपरिक वेशभूषेत सजलेले रोहन आणि स्नेहल दोघेही अतिशय आनंदी आणि भावूक दिसत होते. स्नेहलने ऑफ-व्हाईट साडीला हिरव्या काठाची नाजूक जोड देत फुलांचे दागिने परिधान केले होते, तर रोहनने साध्या पण देखण्या कुर्त्यात तिची साथ दिली. (Rohan Gujar wife Baby shower)

Actor Rohan Gujar
Rohan Gujar wife

व्हिडिओसोबत रोहनने भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत हा दिवस अधिक खास बनवल्याबद्दल आप्तेष्टांचे आभार मानले. या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकार मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.रोहन आणि स्नेहल यांनी २०१७ साली विवाहबंधनात अडकत नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. विशेषतः कोरोना काळात स्नेहलने आरोग्याशी संबंधित गंभीर आव्हानांचा सामना केला होता आणि कॅन्सरविरुद्ध लढा दिला. त्या कठीण प्रवासात रोहन तिच्यासोबत ठामपणे उभा राहिला. आता या सगळ्या संघर्षानंतर त्यांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवणार आहे.

Actor Rohan Gujar
Rohan Gujar wife

रोहनच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, Honar Sun Mi Hya Gharchi या मालिकेतून त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘लव्ह लग्न लोचा’, ‘सांग तू आहेस ना’, ‘नवी जन्मेन मी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने विविध भूमिका साकारल्या. एकांकिका, मालिका आणि चित्रपट असा बहुआयामी प्रवास करणारा हा अभिनेता सध्या ‘आमने सामने’ या नाटकातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  (Rohan Gujar wife Baby shower)

=============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरातली स्पर्धक Tanvi Kolte चं इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब…

=============================

आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या घरी येणाऱ्या या चिमुकल्या पाहुण्यामुळे गुजर दांपत्याच्या आयुष्यात नवा आनंद फुलणार आहे. चाहते आता या नव्या अध्यायासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देत आहेत.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!