Skip to content Skip to sidebar Skip to footer

नव्या वर्षात स्टार प्रवाहवर मनोरंजनाचा महासोहळा; प्रेक्षकांसाठी तीन भव्य मालिकांची मेजवानी !

दर्जेदार कथा, दमदार कलाकार आणि वैविध्यपूर्ण विषय यामुळे स्टार प्रवाहच्या मालिकांना नेहमीच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. याच परंपरेला पुढे नेत, २०२6 च्या सुरुवातीलाच वाहिनी तीन खास कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.दोन मालिका आणि एक लोकप्रिय गायन रिअ‍ॅलिटी शो.महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचं पर्व छोट्या पडद्यावर उलगडणार आहे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ( Mi Savitribai Jotirao Phule) या मालिकेच्या माध्यमातून. ५ जानेवारीपासून सायंकाळी ७.३० वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ही मालिका समाजपरिवर्तनाच्या लढ्याची साक्ष देणार आहे. या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) तर महात्मा जोतीराव फुले यांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe) झळकणार आहेत. त्या काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी समाजाच्या विरोधात उभं राहत केलेला संघर्ष, विचारांची क्रांती आणि मूल्यांची जपणूक या सगळ्यांचं सशक्त चित्रण या मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका केवळ ऐतिहासिक नाही, तर आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी ठरणारी आहे.( Star Pravah New Serials)

Mi Savitribai Jotirao Phule
Mi Savitribai Jotirao Phule Serial

इतिहासाच्या भव्य कथेसोबतच स्टार प्रवाह आणत आहे एक हळुवार, भावनिक आणि समकालीन प्रेमकथा‘तुझ्या सोबतीने’ (Tujhya Sobtine) . ही मालिका १२ जानेवारीपासून रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.कथेच्या केंद्रस्थानी आहेत दोन पूर्णपणे वेगळ्या विश्वातले व्यक्तिमत्त्व. मुंबईतील चाळीत राहून कुटुंबाचा आधारस्तंभ असलेली, साधेपणात समाधान मानणारी नुपूर आणि दुसरीकडे इव्हेंट मॅनेजमेंटच्या झगमगत्या दुनियेत वावरणारा, परिपूर्णतेवर विश्वास ठेवणारा मल्हार. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतानाही, एकमेकांच्या सहवासातून ते कसं बदलतात आणि एकत्र प्रवास करतात, याची गोष्ट म्हणजे ‘तुझ्या सोबतीने’. एतशा संझगिरी (Aetashaa Sansgiri) आणि अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) यांची नवी जोडी या मालिकेचं खास आकर्षण ठरणार आहे.

Tujhya Sobtine
Tujhya Sobtine Serial

मनोरंजनाचा हा उत्सव अधिक रंगतदार करण्यासाठी परत येत आहे प्रेक्षकांचा लाडका गायन रिअ‍ॅलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ (Mi Honar Superstar -Chhote Ustaad 4) चौथ्या पर्वासह. ३ जानेवारीपासून रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Mi Honar Superstar -Chhote Ustaad 4
Mi Honar Superstar -Chhote Ustaad 4

महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले गुणी बालगायक या मंचावर आपल्या आवाजाची जादू दाखवणार आहेत. हा मंच केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नसून, नवोदित कलाकारांना घडवणारा, त्यांच्यातील सूर आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. ( Star Pravah New Serials)

=============================

हे देखील वाचा: Mi Savitribai Jotirao Phule मालिकेच्या सेटचा भव्य अनावरण सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न!

=============================

यंदाही परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) , वैशाली सामंत (Vaishali Samant) आणि आदर्श शिंदे (Adarsh Shinde) . कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साजिरी जोशी करणार असून तिच्या उत्साही आणि आपुलकीच्या शैलीमुळे शोला आणखी रंगत येणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!