Skip to content Skip to sidebar Skip to footer

Lahore 1947 चित्रपट आता नव्या नावाने होणार रिलीज!

देशभक्तीपर चित्रपट बनवले तरी गेल्या काही काळात बॉलिवूडचे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेले पाहायला मिळाले. कधी एखादा सीन आक्षेपार्ह वाटतो, तरी कधी चित्रपटाचं नावं. आता अशाच एका चित्रपटाने वाद निर्माण होऊ नये म्हणून त्याआधीच चित्रपटाचं नाव बदललं आहे. आणि तो चित्रपट आहे आमिर खान, सनी देओल आणि प्रिती झिंटा यांचा ‘लाहौर १९४७‘ चित्रपट.(Bollywood News)

सनी देओल आणि आमिर खान यांची प्रमुख भूमिका असणारा ‘लाहौर १९४७’ हा चित्रपट बऱ्याचच महिन्यांपासून चर्चेत होता. आता या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. राजकीय संवेदनशीलता आणि भारत-पाकिस्तानमधील सद्यस्थिती लक्षात घेत निर्मात्यांनी या चित्रपटाचं नाव बदलून आता ‘बटवारा १९४७’ करण्याचामोठा निर्णय घेतला आहे. (Lahore 1947)

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या नावात ‘लाहौर’ या शहराचा उल्लेख असल्यामुळे चित्रपट जेव्हा रिलीज होईल त्यावेळी कदाचित वाद निर्माण होण्याची शक्यता निर्मात्यांना वाटत होती.  शिवाय, सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध पाहता, चित्रपटाच्या नावात एका विशिष्ट शहराचा उल्लेख करण्यापेक्षा चित्रपटाची जी मुख्य कथा आहे त्या फाळणीची शोकांतिका मांडणारं नाव योग्य वाटेल असं देखील मेकर्सना वाटलं. आणि त्यामुळेच लाहौर १९४७ ऐवजी आता चित्रपटाचं नाव ‘बटवारा १९४७’ असं करण्यात आलं. ‘बटवारा १९४७’ (Batwara 1947) या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती आमिर खान याची आहे. चित्रपटात सनी देओल (Sunny Deol), आमिर खान (Amir Khan), प्रिती झिंटा Preity Zinta) प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

================================

हे देखील वाचा : Big Boss Marathi 6  : रुचिता घराबाहेर गेल्यानंतर विशाल घरच्यांवर भारी पडणार? राखीच्या ‘त्या’ कृतीने किंचाळली तन्वी

================================

तसेच, दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल यांनी यापूर्वी ‘घायल’ (Ghayal), ‘दामिनी’ आणि ‘घातक’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही जोडी पाहायला मिळणार आहे. ‘बटवारा १९४७’ चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट असगर वजाहत यांच्या ‘जिस लाहोर नई देख्या, ओ जम्याई नई’ या प्रसिद्ध नाटकावर आधारित आहे. फाळणीच्या वेळी लाहोरमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध हिंदू महिलेची आणि तिथल्या विस्थापित कुटुंबाची ही हृदयद्रावक कथा देशभरात १३ ऑगस्ट २०२६ रोजी रिलीज होणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!