Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6: ‘हो, मला रुचिता आवडते’, अखेर विशालने दिली प्रेमाची कबुली, पण दिपालीच्या टोमण्याने रुचिता भडकली!

‘बिग बॉस मराठी ६’ ( Bigg Boss Marathi 6) च्या घरात सध्या वातावरण पूर्णपणे बदललेलं दिसत आहे. एका बाजूला नॉमिनेशनची टांगती तलवार, रणनीती आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसऱ्या बाजूला एक वेगळीच भावना हळूच डोकावताना दिसते आहे. रुचिता जामदार (RuchitaJ amdar) आणि विशाल कोटियन (Vishal Kotian ) यांच्यातील वाढती जवळीक आता उघडपणे चर्चेचा विषय ठरली आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कला ‘नॉमिनेशनची बादली’ असं वेगळं स्वरूप देण्यात आलं. ज्याला नॉमिनेट करायचं, त्याला बादलीखाली बसवून स्पष्ट कारण द्यायचं आणि शेवटी पाण्याचा वर्षाव – असा या टास्कचा नियम. टास्कने घरातील समीकरणं ढवळून काढली, पण सर्वाधिक चर्चेत राहिला तो विशालचा खुलासा. दिपालीला नॉमिनेट करताना विशालने थेट सर्वांसमोर कबुली दिली की त्याला रुचिता आवडते. हा क्षण घरासाठी अनपेक्षित होता. खेळाच्या रणांगणात अचानक भावना व्यक्त झाल्याने काही स्पर्धक अवाक् झाले, तर काहींनी त्याकडे रणनीती म्हणून पाहिलं.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

विशालच्या वक्तव्यानंतर दिपालीने “हे नातं घराबाहेरही टिकावं” असा टोमणा मारत वातावरणात आणखी रंग भरला. मात्र रुचिताने यावर शांत न बसता ठाम शब्दांत प्रतिक्रिया दिली. तिला स्वतःच्या भावना आणि निर्णयांबद्दल कोणी शिकवण देऊ नये, अशी तिची स्पष्ट भूमिका होती. याआधीही रुचिताने घरातील जवळच्या मैत्रिणीशी बोलताना विशालच्या सहवासाबद्दल आपुलकी व्यक्त केली होती. त्यामुळे आता ही केवळ मैत्री राहिली नसून काहीतरी अधिक असल्याची चाहूल प्रेक्षकांना लागली आहे. दुसरीकडे वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात दाखल झालेल्या राखी सावंतने (Rakhi Sawant)  ल्पावधीतच सगळ्यांचं लक्ष वेधलं. तिच्या बिनधास्त स्वभावामुळे घरात सतत काही ना काही घडत राहिलं. काहींना तिची स्टाइल मनोरंजक वाटली, तर काहींना ती त्रासदायक.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

आता मात्र चर्चांनुसार, आठवडा पूर्ण होण्याआधीच तिला घराबाहेर जावं लागल्याची माहिती समोर येत आहे. ताज्या प्रोमोमध्ये तिची अनुपस्थिती लक्षात येत असून, यामुळे चाहत्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अधिकृत घोषणा नसली तरी तिच्या वागण्यामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे.(Bigg Boss Marathi 6)

================================

हे देखील वाचा: Apurva Nemlekar Wedding: अपूर्वा नेमळेकरचा जीवनसाथी तनुज गोवळकर नेमका आहे तरी कोण?

================================

सध्या घरात दोन वेगवेगळे प्रवाह स्पष्ट दिसतात. एक म्हणजे स्पर्धा, नॉमिनेशन आणि रणनीती; आणि दुसरा म्हणजे नव्याने फुलत असलेलं नातं. विशाल-रुचिता यांचं नातं केवळ घरापुरतं मर्यादित राहील की ते पुढे अधिक दृढ होईल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस मराठी ६’चा खेळ आता अधिकच रंजक वळणावर येऊन ठेपला आहे. येत्या भागांत आणखी कोणती नाट्यमय घडामोड घडते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!