Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’ विशालने चक्क रुचितालाच फटकारलं

बिग बॉस मराठीचा सहावा सीझन दिवसागणिक इंटपेस्टिंग होत चालला आहे. दर आठवड्याला सदस्य नॉमिनेट होत असून या आठवड्यातही धमाल नॉमिनेशन टास्क झाला. या टास्कमध्ये विशाल कोटियन, राखी सावंत आणि तन्वी कोलते सोडून घरातील सगळेच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. विशेष म्हणजे टोळीतला फक्त विशाल सेफ असून बाकीचे सगळेच सदस्य नॉमिनेट झाल्यामुळे विशालचा जळफळाट झाला आहे. याबद्दल चर्चा करत असताना रुचिता आणि विशालमध्ये जरा नोकझोक झाली आणि यावरुन विशालने अक्षरश: रुचिताला फटकारलं. (Big Boss Marathi Season 6)

याबद्दल विशाल आणि रुचितामध्ये बोलणं सुरु असताना रुचिता म्हणाली की, मला आला टोळी व्यतिरिक्त माझा गेम दाखवायचा आहे. यावर विशाल तिल असं म्हणतो की घरातल्या सगळ्या लोकांनी तुमच्या डोक्यात काहीबाही भरवलं आहे त्यामुळे तुम्ही असे वागत आहात. आणि त्यामुळेच आज मी एकटा सेफ आहे आणि तुम्ही सगळे म्हणजे अनुश्री तू आणि रोशन नॉमिनेट झाला आहात. (Vishal Kotian and Ruchita Jamdar)

पुढे अनुश्री आणि रुचिता ऐकत नाही, म्हणून विशाल खंत व्यक्त करतो. तन्वीला नॉमिनेट न केल्यामुळे विशाल रुचिताला सुनावतो. टोळीमधले तिघं नॉमिनेट असल्यामुळे विशाल चिडचिड करतो. पुढे, रुचिता म्हणते, ‘आता मी एकटी खेळणार’ त्यावर विशाल म्हणतो, ‘टोळीची जास्त गरज तुम्हाला तिघांना आहे’ यावर रुचिता आणि विशालमध्ये शाब्दिक चकमक होते. विशाल म्हणतो, ‘उद्यापासून मी माझं खेळणार, तुम्ही तुमचं खेळा. आता मला काही फरक नाही पडत.’ (Big Boss Marathi)

================================

हे देखील वाचा : हमाली करणाऱ्या Roshan Bhajankarने कष्टाचे दिवस काढले; नशीबाने थेट उघडलं बिग बॉसच्या घराचं दार

================================

आता विशाल आणि रुचितामध्ये झालेल्या या नोकझोकीचा परिणाम पुढे त्यांच्या खेळामध्ये दिसणार का? आणि दोघांमध्ये दुरावा येणार की हा त्यांचा गेम प्लॅन असणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. तसेच, या आठवड्यात घरातून टोळीचा सदस्य बाहेर जाणार की अजून कोणी हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!