Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने पालटला गेम, प्राजक्ता शुक्रेची पॉवर चोरी करत केली बोलती बंद

बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरु होऊन आता एक महिला उलटला आहे. या महिन्याभरात घरातील सदस्यांचा गेम, त्यांच्या स्ट्रेटजी प्रेक्षक म्हणून काही अंशी नक्कीच आपल्याला समजत आहेत. परंतु, घरातील सदस्यांनाच एकमेकांच्या खेळीचा अजून हवा तसा अंदाज आला नाही असं दिसतंय. वयाने लहान असणारा प्रभू दिवसागणिक उत्तम खेत असून आता त्याने चालाखीने प्राजक्ता शुक्रेला मिळालेली पॉवर की चोरली आहे. आणि आता त्याचं हे पितळ उघडं पडलं असून प्राजक्ताला तिचा चावी तोर सापडला आहे. यावरु घरात काय राडे झाले आहेत जाणून घेऊयात…(Big Boss Marathi Season 6)

तर, घरात पुढच्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी घरात एक टास्क झाला होता. ज्यात टॉप २ आणि फ्लॉप २ अशा स्पर्धकांची निवड करायची होती. २ टीम्सने निवड केली खरी पण बिग बॉसने या टास्कमध्येही ट्विस्ट आणत गेम पालटला. आणि त्यामुळे प्राजक्ताला कॅप्टन्सीची उमेदवारी मिळाली आणि पॉवर की देखील मिळाली. पण त्यानंतर प्रभूला राग अनावर झाल्यामुळे त्याने प्राजक्ताची चावी चोरली आणि लपवून ठेवली. (Prajakta Shukre)

दुसऱ्या दिवशी प्राजक्ताला लक्षात आले की पॉवर की चोरीला गेलीये तेव्हा तिने सग्यांना विचारलं पण कुणीच कबूल केलं नाही. आणि आता नव्या प्रोमोवरुन प्रभूनेच चावी चोरल्याचं समोर आलं असून दोघांमध्ये भांडण झालं. यावर बिग बॉस म्हणाले की, ज्यांनी कोणी प्राजक्ता तुमची पॉवर की चोरली असेल त्यांना सगळे पॉवर की चे अधिकार मिळतील. हे ऐकल्यावर प्रभू ती चावी बाहेर काढतो. प्राजक्ता रागाच्या भरात त्याला सतत तू चोर आहेस म्हणून हिणवत असते. यादरम्यान प्रभूचे रोशन सोबत सुद्धा खटके उडताना दिसतात. प्रभू म्हणतो की हो मी चोरली चावी काय करायचंय ते करा.. (Prabhu Shelke)

================================

हे देखील वाचा : Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक करायचं…”; सदस्याने सांगितला ‘तो’ किस्सा

================================

या आधी करण आणि रुचिता यांच्यामध्ये पॉवर की वरुन भांडण झालं होतं. गमतीत रुचिताने करणला चावी दिली होती आणि त्याचं गांभीर्य रुचिताने न समजून घेता पॉवर्स गमावल्या होत्या. आणि आता तसंच काहीसं प्राजक्ता सोबत घडलं आहे. आता प्रभू ने चावी चोरल्यामुळे घरात काय राडे होणार? हे लवकरच समजणार आहे. तसेच, तन्वीनंतर आता घरातला कॅप्टन कोण होणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. (Big Boss Marathi)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!