Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि दिपालीमध्ये जोरदार जुंपणार !

‘Bigg Boss Marathi 6’ चा रंग आता खऱ्या अर्थाने चढला आहे. सहा आठवड्यांनंतर घरात अनेक स्पर्धक बाहेर गेले आहेत आणि नुकत्याच झालेल्या इविक्शनमध्ये सचिन कुमावत घराबाहेर झाला. मात्र घरातील वातावरण अजूनही शांत नाही. पुन्हा एकदा घरात तणाव निर्माण झाला आणि यावेळी कारण ठरलं… एक साधासा चहा. सकाळी अनुश्रीने (Anushree Mane) दीपालीला म्हटलं, “माझ्यासाठी चहा बनवलेला हवाय मला”. दीपालीने शांतपणे उत्तर दिलं, “माझी ड्युटी संपली आहे”. पण अनुश्रीने तिथेच थांबायला नकार दिला आणि जोरदार आग्रह केला, “तू बनवलं होतं ना त्यांच्यासाठी मग परत कर”. (Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

या आग्रहानंतर दीपालीचा (Deepali sayyad) संयम सुटला. तिने स्पष्ट केलं, “ही वेळ आहे का ब्रेकफास्टची? आवाज खाली”. अनुश्रीने प्रत्युत्तर दिलं, “मी तुला फक्त चहा बनवायला सांगतेय”, पण दीपालीने ठाम राहून म्हटलं, “नाही करणार जा” आणि तिथून निघून गेली. या दोघींचा वाद यावरच संपला नाही. तर अनुश्रीने संताप व्यक्त करत म्हटलं, “ठीक आहे, मी सगळं खराब करून टाकते टॉयलेट, बाथरूम. बघूया कोण युझ करतंय”.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

यानंतर ती बाथरूममध्ये जाऊन अस्वच्छता निर्माण करताना दिसली, ज्यामुळे घरातील इतर सदस्यही हैराण झाले. दीपालीने मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहून प्रत्युत्तर दिलं, “जा कर”. साध्या चहाच्या कारणावरून इतका मोठा वाद होईल, हे कुणालाही अपेक्षित नव्हतं. बिग बॉसच्या घरात छोट्या कारणांवरही मोठे वाद रंगतात, आणि अनुश्री-दीपालीचा हा प्रकार त्याचं एक स्पष्ट उदाहरण ठरला.घरात जेथे सर्व स्पर्धक एकत्र जेवतात आणि राहतात, अशा किचनमध्ये हा वाद अधिक तापला. अनुश्री आणि दीपाली यांच्यातील हा तणाव पुढे आणखी वाढेल की दोघी शांतपणे तो मिटवतील, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6)

==============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat यांची भावनिक पोस्ट…

==============================

या वादामुळे घरातील इतर सदस्यांच्या मानसिकतेवरही परिणाम झाला असून, लहान कारणांवर घरातील धोरण, सामंजस्य आणि संयम किती महत्वाचं आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. बिग बॉसच्या घरात नेहमीच अशा छोट्या-छोट्या कारणांवर मोठ्या वादाची झळक दिसते, ज्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजन आणि ड्रामा सतत टिकत असतो. या भागात अनुश्री आणि दीपाली यांच्यातील संघर्षाचा पुढचा रंग, घरातील इतर स्पर्धकांचा प्रतिसाद आणि घरातील सामंजस्य टिकवण्यासाठी होणारे प्रयत्न पाहणं प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!