Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6 च्या घरात राखीने विशाल ला डिवचलं; संतापाच्या भरात अंथरुणावर ओतलं पाणी…

‘बिग बॉस मराठी’ ( Bigg Boss Marathi 6) च्या घरात दररोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातील समीकरणे सतत बदलत असून आता स्पर्धकांमधील तणावही वाढताना दिसत आहे. अलीकडेच समोर आलेल्या प्रोमोमुळे पुन्हा एकदा घरातील वातावरण तापल्याचं स्पष्ट झालं आहे. घरातील अनेक सदस्य एकामागोमाग बाहेर पडल्यानंतर विशाल कोटियन जवळजवळ एकटाच पडल्याचं चित्र दिसत आहे. सुरुवातीला घरात त्याची एक मजबूत टोळी होती, मात्र आता त्या गटातील सदस्य कमी होत गेले. तरीही विशाल घरात टिकून राहिला कारण तो स्वतःच्या बळावर खेळताना दिसला.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6 Rakhi Vishal Fight
Bigg Boss Marathi 6 Update

दरम्यान, या गटातील माजी सदस्य अनुश्रीने (Anushree Mane) योग्य वेळी गटापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं अनेक प्रेक्षकांचं मत आहे. तिच्या या निर्णयामुळे तिला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळताना दिसतो आहे. अशातच शोच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आलेल्या नव्या प्रोमोमध्ये राखी सावंत आणि विशाल कोटियन यांच्यात जोरदार वाद रंगताना दिसत आहे. रुचिता जामदार घराबाहेर गेल्यानंतर विशाल काहीसा एकटा आणि शांत दिसत आहे. तो फारसं कोणाशी बोलत नसल्याचंही पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 6 Rakhi Vishal Fight
Bigg Boss Marathi 6 Update

प्रोमोमध्ये दाखविल्यानुसार, एका टास्कदरम्यान किंवा घरातील नियमांवरून हा वाद सुरू झाल्याचं दिसतं. राखी ( Rakhi Sawant) विशालला सांगते की तो ज्या बेडवर बसला आहे तो सर्वांसाठी आहे आणि तिथे सगळ्यांनी बसायचं आहे. त्यावर विशाल नाराज होतो आणि तो बाहेर असताना हा नियम का लावला गेला नाही, असा सवाल करतो. या चर्चेत संस्कृतीही सहभागी होते आणि ती विशालला त्याची जागा विस्कटलेली होती असं सांगते. यानंतर वातावरण अधिकच तापतं. राखी विशालला इशारा देते की तो उठला नाही तर ती त्याच्यावर पाणी ओतेल. त्यावर विशालही प्रत्युत्तर देत म्हणतो की तू पाणी टाक, मग मी सगळ्यांच्या बेडवर पाणी ओततो.(Bigg Boss Marathi 6)

============================

हे देखील वाचा: ‘Maharashtrachi Hasyajatra’फेम Isha Dey लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत; विधींचे फोटो झाले व्हायरल !

=============================

यानंतर राखी खरंच पाण्याची बादली घेऊन येते आणि विशालच्या अंथरुणावर पाणी ओतते. त्यामुळे घरात मोठा वाद निर्माण झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. हा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण विशाल एकटा पडल्यामुळे त्याला सहानुभूती देत आहेत, तर काहींना राखीची आक्रमक भूमिका योग्य वाटत आहे. पुढील भागात या वादाचं नेमकं काय रूप धारण होतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!