Skip to content Skip to sidebar Skip to footer

पद्मश्री Ashok Saraf यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

पद्मश्री Ashok Saraf हे नाव म्हणजे स्वत:मध्येच एक विद्यापीठ आहे. त्यांनी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. विनोदी अभिनय असो किंवा सिरीयस, मालिका, नाटक असो किंवा चित्रपट प्रत्येक माध्यमात विविधांगी भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहेच. त्यांच्या या अभूतपूर्व कार्यासाठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर- जीवनगौरव हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ यांना हा पुरस्कार देण्यात आला. (Ashok Saraf Awards)

अशोक सराफ यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की, “धन्यवाद, आता पुन्हा मला आणखी एक जीवनगौरव मिळाला. हा नुसता पुरस्कार नाही तर माझी काम करण्यासाठी हिंमत वाढवणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळवण्यासाठी मी एकटा जबाबदार नाही तर माझे प्रेक्षक, माझ्यासोबतचे सहकलाकार आहेत”, असे म्हणत अशोक मामांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अशोक सराफ यांनी आपल्या संवाद फेकीच्या अचूक टायमिंगने खरं तर हे जग जिंकलं आहे. लोकांना हसवायचं हे काही खायचं काम नाही हे बऱ्याचदा अशोक मामांनी त्यांच्या मुलाखतीत बोलून दाखवलं आहे. परंतु, मराठी चित्रपटसृष्टी जेव्हा जरा डगमगली होती त्यावेळी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) या जोडगोळीने आपल्या विनोदाने अख्खं महाराष्ट्र व्यापून टाकलं होतं. एका मागून एक त्यांचे कॉमेडी चित्रपट जरी रिलीज होत असले तरी प्रत्येक चित्रपटातील त्यांनी विनोदी भूमिका ही वेगळीच असली पाहिजे यावर अशोक मामांनी विशेष भर दिला होता. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘चंगू मंगू’, ‘धुम धडाका’, ‘माझा पती करोडपती’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी एक कसलेला अभिनेता म्हणून कॉमेडीचे विविध पैलू दिसले. (Ashok Saraf Movies)

रंगभूमीपासून अशोक सराफ यांच्या कामाची सुरुवात झाली. त्यांचे मामा नाटकाचे दिग्दर्शक, निर्माते होते. त्यामुळे मामाचं बोट पकडून त्य़ांनी स्टेजवर पाय ठेवला. पण अभिनय क्षेत्रात त्यांनी येऊ नये हे मामांचं आणि सराफांच्या आई-वडिलांचं मत होतं. त्यामुळे घरच्यांचं मन राखण्यासाठी अशोक सराफ यांनी काही वर्ष बॅंकेत नोकरी केली. पण काही केल्या अभिनय सुटत नव्हताच. शेवटी बॅकेंला राम राम करत इंडस्ट्रीची वाट त्यांनी धरली ती कायमचीच. १९७५ साली दादा कोंडकेंसोबत (Dada Kondke) ‘पांडू हवालदार’ या चित्रपट अशोक सराफ झळकले आणि पुढे त्यांचं नाव मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं. (Ashok Saraf Debut Movie)

बरीच मोठी नट मंडळी कायम म्हणतात की हिंदी चित्रपटसृष्टीत हिरो आहेत किंवा स्टार आहेत, पण मराठी चित्रपटसृष्टीत कलाकार आहेत आणि चित्रपटाची किंवा नाटकाची कथा हीच हिरो आहे. अशोक सराफ यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपट आणि मालिकाविश्वातही आपलं नाव कमावलं. ‘हम पांच’ (Hum Paanch Serial) या हिंदीतील कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड वालं होतं. याव्यतिरिक्त ‘ये छोटी बडी बाते’, ‘डोंटवरी हो जायेगा’ या मालिकेतही ते दिसले होते. तसेच, ‘अशोक मा.मा’ या कलर्स मराठीवरील मालिकेतही त्यांनी काम केलं होतं.

चित्रपटांनी जरी जगभरात ओळख मिळवून दिली असली तरी जिथून आपल्या अभिनयाची सुरुवात झाली होती त्या रंगभूमीला अशोक सराफ कधीच विसरले नाही. ‘व्हॅक्युम क्लीनर’, ‘सवाई हवालदार’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘डार्लिंग डार्लिंग’ अशा अनेक अजरामर नाटकांत त्यांनी कामं केली आहेत. एकदा एका मुलाखतीत अशोक मामांनी नाटकाचा प्रयोग सुरु असतानाचा एक खास किस्सा सांगतला होता. तो असा की, “आमच्या ‘मदनाची मंजिरी’ नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान देखील असंच झालं होतं. नांदेडला आम्ही एक प्रयोग केला होता. एका कॉन्ट्रॅक्टरने तो प्रयोग घेतला होता. ते कॉमेडी नाटक होतो. पण प्रयोगादरम्यान एकही माणूस हसत नव्हता. कॉन्ट्रॅक्टरला आमच्या नाटकाच्या टीममधील लोकांनी विचारलं, प्रेक्षक हसत का नाहीत? त्यावर तो म्हणाला, एकेकाला सांगून ठेवलं आहे की, कोणी हसायचं नाही.” तर अशा गमती जमती किंवा प्रेक्षकांच्या टॅंट्रम्सचा सामना करत त्यांनी रंगभूमी देखील गाजवली आहे. (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : रॉकिंग स्टार यशचा Toxic चित्रपट ‘धुरंधर २’ला घाबरला?

================================

‘सिंघम’, ‘कोयला’, ‘करण अर्जून’, ‘गुप्त’, ‘जोरु का गुलाम’, ‘येस बॉस’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘बेटा’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटात काम करत त्यांनी शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण सोबत स्क्रिन शेअर केली आहे. मात्र, ते रमले मराठीतच! आपल्या मायबोली मराठी भाषेला त्यांनी कायम पहिलं प्राधान्य दिलं. नुकताच त्यांचा ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ (Punha Ekda Saade Maade 3) हा चित्रपट रिलीज झाला. वय वर्ष ७८ असूनही अगदी आजच्या तरुण कलाकारांना लाजवेल असा जोश त्यांच्यात आहे. मराठीतील ते अमिताभ बच्चन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आजही त्यांच्यासाठी आणि त्यांच्याभोवती फिरणारं कथानक लिहिलं जातं हे विशेष. महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ यांच्या कारकिर्दिला कलाकृती मिडियाचा मानाचा मुजरा!

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!