Skip to content Skip to sidebar Skip to footer

मासे खाऊन Ranveer Singh-Deepika Padukone ने यश साजरं केलं

फिल्मवाले म्हटलं की सगळं कसं हायफाय, पंचतारांकित संस्कृती, त्यात ‘पिक्चरबिक्चर सुपर डुपर हिट‌ है’ तो चिअर्स हवंच, शॅम्पेन पिऊन चिकन मटण खावून सेलिब्रेशन करावं हा अनेक वर्षांपासूनचा अलिखित नियम. आणि तो नियम चित्रपट गल्ला पेटीवर धो धो विक्रम करत असतानाच पाळला पाहिजे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर २’ चा ट्रेलर आला तोच आगाऊ तिकीट विक्रीसाठीची ऑनलाईन बुकिंग भराभर सुरु झाली. चित्रपट प्रदर्शित होतोय तोच कमाईचे आकडे एकावर एक वाढत वाढत गेले देखिल. आता या चित्रपटाचे निर्माते जेव्हा कधी सेलिब्रेशन करायचंय तेव्हा करतीलच. पण चित्रपट प्रदर्शित होऊन तीन चार दिवसच झालेत तर जाऊयात की जवळच्या एखाद्या छानशा रेस्टॉरंटमध्ये!

कल्पना अतिशय चांगली आणि ती पटकन अंमलातही आणायला हवी. प्रभादेवीचे रहिवासी असलेल्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांना वरळी अगदी जवळ. त्यात आला रविवार. मासे खाण्यासाठी छान मूड. गेले लगेचच मासोळी रेस्टॉरंटमध्ये. त्याने साधाच पेहराव केला, कॅप घातली, टी शर्ट आणि ब्लू जिन्स. तिनेही टी शर्ट आणि जिन्स. असे अगदी कॅज्युअल गेले. आपण जवळच्या रेस्टॉरंटमध्ये चाललोय याचं भान त्यांनी ठेवलं. या सेलिब्रिटी दाम्पत्याला असं अचानक आलेलं पाहून हॉटेलमधील अख्ख्या स्टाफला काय बरं वाटलं असेल, त्यांची फ्राय पापलेट सुरमईची ऑर्डर घेण्यासाठी आणि मग ते सर्व्ह करण्यासाठी स्टाफमध्ये काही चढाओढ सुरु झाली का, त्यांच्यासोबत सेल्फी काढतानाची घाई आणि घालमेल कशी होती? पेमेंट ऑनलाईनच केले असणार, तरी टीप किती दिली? दोघांची मिळून एक की दोघांची एकत्र टीप?

सगळ्या स्टाफने या दोघांसोबत एक छानसा सेल्फी काढला. दीपिका पदुकोणच्या स्टाफने तो सोशल मीडियात पोस्टही केला. हे कोलंबी खात असताना ते आत आहेत ही खबर बाहेर वेगाने पोहचली आणि हाॅटेलबाहेर गर्दी वाढली. ते अगदी स्वाभाविक आहे. पडद्यावर दिसणारे स्टार प्रत्यक्षात पाहायला गर्दी होतेच होते. त्या गर्दीतून त्यांना वाट सापडावी म्हणून बाऊन्सर होतेच. या व्हिडिओचे व्हिज्यु भरभर वाढत वाढत गेले. कमेंट्सही आल्या. सेलिब्रिटीजना मोकळेपणाने कुठे जावून भेळ पाणीपुरी रगडा पॅटीस खाता येत नाही, वडापावही खायचे वांदे होतात. तरी बरं एकदा पुणे शहरातून मुंबईला येत असताना शिल्पा शेट्टीला वडापाव खायची इच्छा होताच तिने खोपोलीला येताच जुन्या मुंबई पुणे रस्त्याने जात एका ठिकाणी थांबून वडापावचा आनंद घेतला. अर्थात याची बातमी झाली (अथवा केली म्हणूया).

ऑनलाइन पद्धतीने आज आपण बरेच काही घरी मागवू शकतो. पण घराबाहेर पडावं, बाहेरच्या मोकळ्या हवेत यावं (तरी बरं, दीपिकाने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर एक पोस्ट केली होती), चारचौघात बसावे, त्यातून काही अनुभव घ्यावा असे वाटणारच. मासोळीत जावं ही दीपिकाचीच कल्पना असणार आणि रणवीरला बायकोची मर्जी सांभाळावी लागली असणार. आता या दाम्पत्याचा हा आनंद पाहून रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर, विकी कौशल आणि कैतरिना कैफ ही सेलिब्रिटी दाम्पत्य असेच कुठे तरी थाळी सेवनाला गेले अथवा आले तर त्यात कसलेही आश्चर्य ते नको.‌

================================

हे देखील वाचा : नवीन रुपडे, मराठी चित्रपटाच्या हक्काचे Bharatmata Theatre

================================

सर्वसामान्य माणसात जाल तर वेगळे चेहरे दिसतील, नवीन माणसे भेटतील.‌ त्यातूनच काही लहान मोठ्या गोष्टी शिकता येतील, त्याचा थोडासा का होईना पण अभिनयात फायदा होईल. पण असे एखाद्या रेस्टॉरंट अथवा फूड पॉईंटला तुम्ही प्रमोशनसाठी जावू नका. अशाने चव बदलेल. एक खाद्यप्रिय म्हणून जा. मनमोकळेपणाने जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जा. पडद्यावरच्या जगातून प्रत्यक्षातील जगात या… बघा, नेहमी वेगळ्या स्पॉटवर जाल…

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!