Skip to content Skip to sidebar Skip to footer

Nandita Patkar ने गुपचूप उरकल दूसर लग्न; दिग्दर्शक विपुल महागावकरशी बांधली लग्नगाठ…

मराठी मनोरंजनविश्वात सध्या एका आनंददायी बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकप्रिय अभिनेत्री नंदिता पाटकर (Nandita Patkar) हिने आयुष्यातील नवा अध्याय सुरू करत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्दर्शक विपुल महागावकरशी (Vipul Mahagaonkar) यांच्यासोबत तिने नव्या आयुष्याची सुरुवात केली असून, त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. अनेकांनी नंदिताला शुभेच्छा देत तिच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.(Nandita Patkar Second Marriage)

Nandita Patkar Husband
Nandita Patkar Second Marriage

नंदिता पाटकर ही मराठी चित्रपट आणि मालिकांमधील एक ओळखीचं नाव आहे. एलिझाबेथ एकादशी (Elizabeth Ekadashi) आणि सहकुटुंब सहपरिवार (Sahkutumb Sahaparivar) यांसारख्या प्रोजेक्टमधून तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. साधेपणा आणि सहज अभिनयशैलीमुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार केला तर, नंदिताचं हे दुसरं लग्न आहे. काही वर्षांपूर्वी तिचा पहिला विवाह तुटला होता. त्या काळाबद्दल बोलताना तिने अनेक मुलाखतींमध्ये आपले अनुभव मोकळेपणाने शेअर केले होते. इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकतानाच वैयक्तिक आयुष्यात आलेल्या या बदलामुळे तिच्यासमोर अनेक आव्हानं उभी राहिली होती.

Nandita Patkar Husband
Nandita Patkar Second Marriage

एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, त्या काळात ती पूर्णपणे एकटी होती आणि सर्व जबाबदाऱ्या स्वतः सांभाळत होती. एकटेपणा आणि भावनिक संघर्षातून जात असतानाही तिने स्वतःला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. “घटस्फोट” हा शब्द आजही तिला अस्वस्थ करतो, असंही तिने स्पष्टपणे नमूद केलं होतं.दुसरीकडे, विपुल महागावकर यांचा प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून केली होती. आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धांमधून त्यांनी रंगभूमीचे बारकावे शिकत स्वतःची ओळख निर्माण केली. पुढे ‘पै पैशाची गोष्ट’ आणि ‘उध्वस्त धर्मशाळा’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी दिग्दर्शक म्हणून स्वतःची छाप उमटवली. स्वभावाने अंतर्मुख असलेल्या विपुल यांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी नाटक या माध्यमाची निवड केली आणि त्यातच आपला वेगळा मार्ग तयार केला. आज ते मराठी रंगभूमीवरील नव्या पिढीतील महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी एक मानले जातात. (Nandita Patkar Second Marriage)

==================================

हे देखील वाचा: Maharashtrachi Hasyajatra च्या मंचावर हास्याचा जबरदस्त डोस घेऊन येणार Nirmiti Sawant…

==================================

आता नंदिता आणि विपुल या दोघांनी आयुष्याच्या नव्या टप्प्यात एकत्र पाऊल ठेवले आहे. दोघांचाही संघर्ष, अनुभव आणि कलेप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांचा हा प्रवास अधिक खास ठरणार आहे.एकंदरीत, नंदिता पाटकरच्या आयुष्यात आलेला हा नवा आनंदाचा क्षण तिच्या चाहत्यांसाठीही तितकाच खास आहे. आता तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील पुढील वाटचाल कशी घडते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!