Skip to content Skip to sidebar Skip to footer

“दारु पिऊन मुलींना फोन करायचो”; काय म्हणाले Piyush Mishra

हिंदी चित्रपटसृष्टीतील Method Artist आणि Versatile Artist अशी ओळख असणारे अभिनेते म्हणजे Piyush Mishra. नाटक ते मोठा पडदा असा प्रवास करुनही रंगभूमीला पीयूष कधीही विसरले नाहीत. अभिनेते, गायक, लेखक अशा वेगवेगळ्या मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी कायम संवाद साधरणारे पीयूष सध्या त्यांच्या एका ज्वलंत मुलाखतीमुळे विशेष चर्चेत आहेत. ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी स्वत:च्या करिअर आणि वैयक्तिक जीवनातील काही गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यापैकी एक आहे ती म्हणजे दारुच्या आहारी पीयूष इतके गेले होते की पिऊन ते मुलींना फोन करायचे…. आता नेमकं ते काय म्हणाले आहेत आणि तो काय प्रसंग होता जाणून घेऊयात… (Piyush Mishra Autobiography)

दारु पिऊन मुलींना फोन करुन अश्लील विषयांवर…

आता कलाकार म्हटलं की त्याला कसलं ना कसलं व्यसन हे असणारचं… आणि त्याचप्रमाणे पीयूष दारुच्या व्यसनाधीन झाले होते… या सवयीमुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम देखील झालेला. त्यांच्यावर हावी झालेल्या दारुच्या व्यसनाबद्दल बोलताना पीयूष म्हणाले की, “एक वेळ अशी येते की तुम्हाला असं वाटतं की दारू पिणं कसं आवश्यक आहे. त्याचा परिणाम असा होतो की माणूस अधिकाधिक पिण्याकडे वळतो. दारूचे व्यसन ही जीवघेणी सवय आहे… एक वेळ अशी येते की तुम्ही पिण्याची इच्छा असो वा नसो, शरीराला दारूची गरज भासते. मी स्वतः हे अनुभवलं आहे. दारू प्यायल्यानंतर मी अनेक अशा गोष्टी केल्या, ज्या नंतर मला स्वतःलाच पटल्या नव्हत्या. माझे आईसोबतचे संबंध खूपच बिघडले होते. नशेत मी तिला खूप दुखावणाऱ्या गोष्टी बोललो होतो… इतकंच नाही तर मी अनेक महिलांसोबत फोनवर चुकीच्या आणि अश्लील गोष्टी बोललो होतो आणि दुसऱ्या दिवशी मला त्याबद्दल काहीही आठवत नव्हतं. त्या वेळी माझ्यावर माझाच ताबा नव्हता. मी जे करत होतो, ते मला करायचं नव्हतं.” (Bollywood News)

दारुमुळे करिअरवरही परिणाम….

पुढे पीयूष असं म्हणाले की, “मी कधीही दारू पिऊन अभिनय केला नाही किंवा नशेत सेटवर गेलो नाही. पण दारूने माझ्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम नक्कीच केला. माझ्या डोक्यात सतत दारूच असायची. ‘गुलाल’वर काम करतानाही माझ्या मनात दारूच होती. पण त्या वेळी मी प्रत्यक्षात दारू प्यायलेली नव्हती. मी फक्त क्रेविंगमुळे पित होतो, आणि ती आवरता येत नव्हती.” वैयक्तिक जीवनासोबत करिअरवरी त्याचा परिणाम काही अंशी झाला.. त्यांच्यासोबत काही Co-Stars ना काम करणं कठिण होऊ लागलं… पण नंतर ब्रेन स्ट्रोक आला आणि ते व्यसन कंट्रोल करणं गरजेचं झालं आणि पीयूष यांनी स्वत:ला त्यातून सावरत पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात केली. (Piyush Mishra Controversy)

सातवीत असताना एका महिलेने केलेलं शारीरिक शोषण

बरं, आत्मचरित्रात पीयूष यांनी दारुच्या व्यसनाबद्दल बोलताना त्यांच्यासोबत शाळेत असताना घडलेला एक गैरप्रकारही सांगितला आहे… जवळपास ५० वर्षांपूर्वी सातवीत असताना शाळेत त्यांचं शारीरिक शोषण झालं होतं असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला. पियूष म्हणाले की, ‘त्या घटनेनं मला हादरवून टाकलं होतं. शारीरिक संबंध ही एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी गोष्ट आहे, त्यामुळं तुमचा पहिला अनुभव चांगला असणं गरजेचं असते. अन्यथा, तो तुम्हाला आयुष्यभरासाठी विचलित करतो. त्या घटनेमुळं माझ्यात आयुष्यभर एक न्यूनगंड निर्माण झाला होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला बराच काळ गेला”..

पीयूष यांनी त्यात शाळेतला किस्सा सांगितला आहे… त्यांनी लिहिलं आहे की, दहावीत असताना ‘मिस जिंजर’ नावाच्या शिक्षिकेच्या प्रेमात पडले होते. त्या शिक्षिका मूळच्या केरळच्या होत्या आणि अतिशय सुंदर होत्या. पीयूष यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि गायन कौशल्यामुळं त्या शिक्षिकाही त्यांच्याकडे आकर्षित झाल्या होत्या. शाळेत एकदा विद्यार्थ्यांची गर्दी कमी असताना पीयूष आणि त्या शिक्षिका एकांतात होते. पीयूष त्यांना गाणं ऐकवत होते. गाणे संपल्यानंतर दोघेही भावूक झाले आणि त्या भावनिक भरात त्यांनी एकमेकांना ओठांवर चुंबन दिलं होतं. शाळेतील एका व्यक्तीनं हा प्रकार पाहिला होता घटनेचे गंभीर पडसाद उमटले होते…

================================

हे देखील वाचा : रितेशच्या Raja Shivaji या मराठी चित्रपटात बॉलिवूड कलाकारांचा डेब्यु!

================================

दरम्यान, पीयूष यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलेल्या घटना खरंच अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत… एखाद्या क्षेत्रात नावलौकिक असताना स्वत:बद्दल काही गोष्टी थेट सांगणं ही फार मोठी रिस्क आहे आणि ती पीयूष यांनी घेतली आहे… त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘इंडियन २’, ‘जहांगीर नॅशनल युनिर्वसिटी’, ‘मैं अटल हूं’, ‘पिंक’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. (Piyush Mishra Movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!