Skip to content Skip to sidebar Skip to footer

Pournimecha Phera 3: थरार आणि रहस्याचा नवा खेळ पुन्हा सुरू; अनुत्तरित प्रश्नांचा उलगडा होणार?

मराठी वेब सिरीजच्या जगात सध्या सस्पेन्स आणि थ्रिलरचा ट्रेंड जोरात आहे, आणि अशाच प्रकारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी ‘पौर्णिमेचा फेरा’ (Pournimecha Phera) ही सिरीज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पहिल्या दोन सीझनना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता तिचा तिसरा भाग प्रेक्षकांसमोर आला असून, चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. शुभम प्रोडक्शन फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर नुकताच ‘पौर्णिमेचा फेरा सीझन ३’ प्रदर्शित करण्यात आला आहे. या नव्या सीझनमध्ये रहस्य अधिक गडद झालं असून, कथानकात अनेक अनपेक्षित वळणं पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावरही या सिरीजची जोरदार चर्चा रंगली असून, प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत.(Pournimecha Phera 3)

Pournimecha Phera 3
Pournimecha Phera 3

या सिरीजची खासियत म्हणजे तिची वेगळी कथा आणि सादरीकरणाची शैली. पहिल्या सीझनमध्ये एका साध्या प्रवासातून सुरू झालेली गोष्ट हळूहळू गूढ घटनांमध्ये अडकत गेली. दुसऱ्या भागात हा थरार अधिक तीव्र झाला आणि अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. आता तिसऱ्या सीझनमध्ये त्याच रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जात असून, प्रेक्षकांना अधिक गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न दिसून येतो. कलाकारांच्या बाबतीतही या सिरीजने वेगळेपण जपलं आहे. हास्यप्रधान भूमिकांमुळे ओळख असलेले निखील बने (Nikhil Bane) आणि मंदार मांडवकर (Mandar Mandavkar) या सिरीजमध्ये गंभीर आणि थरारक भूमिकांमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत सिद्धेश नागवेकर ( Siddhesh Nagvekar), संदीप रेडकर, दीपा माळकर, प्राची केळुस्कर, निकिता बंदावणे, चंदन जमदाडे, संजय वैद्य आणि स्नेहल आयरे यांसारख्या कलाकारांनीही दमदार साथ दिली आहे.

Pournimecha Phera 3
Pournimecha Phera 3

या वेब सिरीजची निर्मिती पायल गणेश कदम (Payal Ganesh Kadam) यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सचिन गोताड (Sachin Gotad ) यांनी सांभाळली आहे. कथा, पटकथा आणि संवाद संदेश लोकेगावकर (Sandesh Lokegaonkar ) यांनी लिहिले असून, छायाचित्रण कुणाल महादेव परडकर यांनी केलं आहे. संगीत अनिरुद्ध निमकर यांनी दिलं असून, संकलन शिलंत कदम यांनी केलं आहे. (Pournimecha Phera 3)

================================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi चा दबदबा कायम; महाराष्ट्रातील नंबर 1 रिअॅलिटी शो ठरला !

================================

एकंदरीत, ‘पौर्णिमेचा फेरा सीझन ३’ हा सस्पेन्स, थ्रिल आणि गूढतेचा जबरदस्त मिलाफ घेऊन आला आहे. मागील सीझनमधील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रवास या भागात अधिक रोमहर्षक बनला आहे. त्यामुळेच ही सिरीज पुन्हा एकदा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!