Skip to content Skip to sidebar Skip to footer

1000 Cr चा Dhurandhar ‘या’ चित्रपटापुढेही फिका

Ranveer Singh याच्या Dhurandhar : The Revenge चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे… भारतात 900 Cr पार करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे… आदित्य धर याने यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्सला टक्कर देणारा चित्रपट तर तयार केला आहेच; पण तुम्हाला माहित आहे का भारतीय चित्रपटसृष्टीत एक असा चित्रपट होऊन गेला होता ज्याने सर्वात आधी १ कोटींची कमाई करत जगभरात नाव केलं होतं… कोणता आहे तो चित्रपट जाणून घेऊयात…(Spy Movies)

हिंदी चित्रपटसृष्टीला जवळपास १०० वर्षांचा इतिहास आहे… एकीकडे धुरंधर २ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असताना स्वातंत्र्यापूर्वी रिलीज झालेल्या अशा चित्रपटाचा किस्सा जाणून घेऊयात ज्याने पहिल्यांदा १ कोटी कमवण्याचा मान मिळवला आहे….ज्या काळी अगदी तुटपूंज्या बजेटमध्ये चित्रपट तयार केले जात होते, त्या काळी Kismat या चित्रपटाने १ कोटी कमावले होते.. १९४३ मध्ये रिलीज झालेल्य़ा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं ज्ञान मुखर्जी यांनी… २ लाखांच्या बजेटमध्ये हा संपूर्ण चित्रपट तयार केला गेला होता. बरं १ कोटी कमावणारा पहिला चित्रपट तर होताच पण त्यासोबतच भारतीय चित्रपटसृष्टीत काही बोल्ड सिन्स introduce करणारा देखील हाच पहिला चित्रपट होता…(first blockbuster of Indian cinema)

Ashok Kumar, मुमताज शांती आणि शाह नवाज या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या… बोल्ड सीन्स, लग्न न करता आई होणं, Anti Hero अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स चित्रपटाने Introduce केल्या… या व्यतिरिक्त त्याकाळातील सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये किस्मत चित्रपट सलग ३ वर्ष सुरु होता… बॉम्बे टॉकीजचा हा Massive Success मिळवणारा हा पहिला चित्रपट होता…(Indian Cinema History)

‘धुरंधर’ चित्रपटाची कथा जितकी खास आहे तितकीच त्याची रिलीजची Timeline देखील विशेष आहे… अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धादरम्यान Dhurandhar 2 रिलीज झाला. त्याचप्रमाणे ‘किस्मत’ हा चित्रपटसुद्धा दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान रिलीज झाला होता… भारतासह जगभरात प्रेक्षकांचं प्रेम आणि १ कोटी कमावणाऱ्या किस्मत चित्रपटाचा तमिळ आणि तेलुगू भाषेत रीमेक बनवण्यात आला होता. १९५६ साली तमिळ भाषेत ‘प्रेमा पासम’ आणि तेलुगू भाषेत ‘भले रामुडू’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. (Indian Cinema Blockbuster Movies)

दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटाच्या घवघलीत यशाबद्दल बोलायचं झालं तर रिलीजच्या २० व्या दिवशी या चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा वर्ल्डवाईड पार केला आहे… भारतात केवळ हिंदी भाषेत या चित्रपटाने ९०० कोटींचा टप्पा पार केला असून लवकरच १००० कोटी कमावणारा हा पहिला भारतीय आणि हिंदी चित्रपट ठरेल यात तिळमात्र शंका नाही… तसेच, रणवीर सिंग याच्या फिल्मी करिअररमधला Dhurandhar चित्रपट माईलस्टोन ठरला आहे हे फिक्स… (Dhurandhar 2 box office collection)

================================

हे देखील वाचा : लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल Chhaava 2 घेऊन येणार!

================================

एकीकेड बॉलिवूडमध्ये ‘धुरंधर’ची हवा आहे तर दुसरीकडे मराठी चित्रपटसृष्टीत धुरंधर २ ला टक्कर द्यायला रितेश देशमुखचा Raja Shivaji चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे… १ मे २०२६ महाराष्ट्र दिनी हा चित्रपट देशभरात रिलीज होणार असून मराठीसह हिंदी आणि तमिळ भाषेतही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहता येणार आहे… मराठीतील १०० कोटींचं बजेट असणारा हा पहिला चित्रपट ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडत २०० कोटींचा टप्पा गाठणार हे रिलीज आधीच फिक्स झालं आहे…(Raja Shivaji Movie Release)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!