
“दिगंबर यांना आत्मपरिक्षणाची गरज”; Aadesh Bandekar स्पष्टच म्हणाले
“मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो” असं विधान अभिनेते दिगंबर नाईक यांनी नुकत्याच एका मुलाखतीत केलं होतं. तसेच, Aadesh Bandekar यांनी रातोरात त्यांना लक्ष्य या मालिकेतून काढून टाकल्याचं देखील ते म्हणाले होते. आता यावर आदेश बांदेकरंनीच एका व्हिडिओतून प्रत्युत्तर दिलं आहे. “हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे…सुबुद्धी दे…आनंद दे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मालिकेत त्या कलावंतांमध्ये जी व्यक्ती कधी नव्हतीच…तर त्या मालिकेतून काढलं, असं कसं म्हणता येईल?”, असं बांदेकरांनी म्हटलं आहे. नेमकं ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात… (Digambar Naik)
सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत आंदेश बांदेकरांनी दिगंबर यांच्या प्रत्येक विधानाला खोडून काढलं आहे. बांदेकर व्हिडिओत असं म्हणतात, “मालवणी माणसाला मालवणी माणूस नको असं म्हणत असताना हे नम्रपणे सांगावंसं वाटतं की त्या ‘लक्ष्य’ मालिकेतल्या पाच जणांच्या टीममधील पोलीस Kamesh Sawant हा देवगडचा…मालवणीच. ज्याने आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. आणि आता दृश्यमच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. असे कितीतरी मालवणी आहेत जे इमाने इतबारे रंगदेवतेची सेवा करत आहेत“.

पुढे त्यांनी असं म्हटलं की, “सोहम प्रोडक्शनची ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेतील ऋतुजा बागवे ही नायिका…ही मालवणीच. त्याच मालिकेतील आजी रागिनी सावंत काय सुंदर मालवणी बोलतात…कारण त्या मालवणीच आहेत. शाब्बास सुनबाईमधल्या शकुंतला ताई नरे या देखील मालवणीच…यादीच काढायची झाली तर खूप नावं काढता येतील. मी मालिकेचा निर्माता कुडाळचाच मालवणी आहे. आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. त्या मातीला कधीही विसरता येत नाही. त्यामुळे जे केलं ते प्रामाणिकपणे केलं”. (Entertainment News in Marathi)

तसेच, नाईक यांना टोला लगावत ते असं देखील म्हणाले की, “लक्ष्य या मालिकेत जवळपास ५ हजारांपेक्षा जास्त कलाकारांनी काम केलं. त्यातले कितीतरी मालवणीच आहेत. पण मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो. आपण भारताचे नागरिक आहोत. आपण प्रत्येक भागाचा, प्रांताचा आदर केला पाहिजे. मी इतकी वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे, मेहनतीने मनोरंजनाची सेवा करतोय. त्यामुळे उगाच असं काहीतरी विधान करणं, त्या विधानातून मालवणी माणसाला मालवणी माणूस नको…मला याच्यातून काढलं. मला याने घेतलं नाही. त्याने घेतलं नाही. असं म्हणण्यापैक्षा आपण काम करूया. आपल्या कामाचा ठसा उमटवूया. एक बोट समोरच्याकडे दाखवताना चार बोटं स्वत:कडे असतात. हे कधीच विसरू नये. आत्मपरिक्षण करावं…आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सेवा करावी”, असं चोख प्रत्युत्तर बांदेकरांनी दिलं आहे.
================================
हे देखील वाचा : Digambar Naik : “बांदेकर मालवणी असूनही मला मालिकेतून बाहेर काढलं”!
================================
काय म्हणाले होते दिगंबर नाईक?
“मालवणी निर्मात्याला किंवा मालवणी माणसालाच मालवणी माणूस नको असतो. सध्या जितक्या मालिका सुरु आहेत त्यांचे निर्माते मालवणी आहेत. जर त्या मालवण्याला या मालवण्याचा अभिमान वाटला असता किंवा आत्मियता वाटत असती तर मी आज बिझी असतो. बरं आदेश बांदेकर जो माझा मित्र आहे, त्यानेच मला ‘लक्ष्य’ मालिकेतून रात्री पावणे बारा वाजता काढलं. तेव्हा चॅनल हेडचं मत होतं की हा कॉमेडी करतो तर सिरीयस भूमिका कशी करेल? आता त्यांचं मतं असू शकतं पण बांदेकरांना असं नाही वाटलं की हा मालवणी मुलगा आहे, आपल्या मालिकेत घेऊयात. मालवणी मालिकेत किंवा सिनेमात मालवणी लोकं नको असतात हेच खरं आहे”. आता मराठी कलाकार यावर काही प्रतिक्रिया नोंदवणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi