Skip to content Skip to sidebar Skip to footer

Big Boss Marathi 6 :  टोळीचा काटा काढत ‘ही’ स्पर्धक झाली फायनलिस्ट!

महाराष्ट्राचा नंबर १ Reality Show ठरलेला Big Boss Marathi Season 6 आता अंतिम टप्प्यात येईन ठेपला आहे. कठिण टास्क, आव्हानं, इमोशनल ब्रेकडाऊन या सगळ्यांचा सामना करत घरात सध्या टॉप ७ सदस्य उरले आहेत. गेल्याच आठवड्यात सागर कारंडे याने घरातून एक्झिट घेतली. आणि काल या घरात रंगला होता सीझन ६ चा Ticket To Finale टास्क… बिग बॉसच्या घरात कोर्ट उभारुन त्यातील सदस्यांनी स्वत:ला सिद्ध केलं. आणि त्यापैकी तन्वी कोलते, राकेश बापट आणि अनुश्री माने हे Ticket To Finale साठी उमेदवार ठरले.

तसं तर फायनलिस्ट म्हणून सदस्य आणि प्रेक्षक Tanvi Kolte आणि Vishal Kotian यांना पाहात आहेत. परंतु, राकेश आणि विशालमध्ये झालेल्या भांडणामुळे हा सीझन संपेपर्यंत विशाल नॉमिनेट झाला असून कोणत्याही टास्कमध्ये तो सहभागी होऊ शकणार नाही आहे. त्यामुळे तन्वीसह अनुश्री आणि राकेश यांच्यात Ticket To Finale चा चुरशीचा सामना रंगला होता.. तिघांनी अगदी जीवाची बाजी लावून हा टास्क पूर्ण केला…

बिग बॉस मराठी सीझन ६ चा पहिला फायनलिस्ट होण्यासाठी उमेदवारांना कोळ्याचं जाळं पार करुन ७ प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. हा टास्क करण्यासाठी पहिला गेला राकेश. त्याने हा टास्क पूर्ण करण्यासाठी १९ मिनिटं घेतली, नंतर गेली तन्वी, तिने हा टास्क अवघ्या ६.३० मिनिटांत पूर्ण केला आणि शेवटी अनुश्रीने ८.३० मिनिटं घेतली. सर्वात कमी वेळात हा टास्क पूर्ण करत आणि कही चुकीचं उत्तर न देत तन्वी कोलते मराठी बिग बॉस सीझन ६ ची पहिली फायनलिस्ट ठरली आहे. (Ticket To Finale Task)

तंटा क्वीन असा टॅग मिळवणाऱ्या तन्वीला सुरुवातीला घरातील सगळ्याच सदस्यांनी टार्गेट केलं होतं. मात्र, कायम आपल्या मतांवर ठाम राहात, आपली गेम स्ट्रेटजी दर आठवड्याला इम्प्रुव्ह करत तन्वीने प्रेक्षकांची मनं जिंकली. केवळ बुद्धीचाच नाही तर चपळता, चौकस नजर आणि इमोशनल कंट्रोल या सगळ्यांवर प्रभूत्व मिळवत तन्वीने आपली जागा Finale मध्ये फिक्स केली आहे.

================================

हे देखील वाचा : “दिगंबर यांना आत्मपरिक्षणाची गरज”; Aadesh Bandekar स्पष्टच म्हणाले

================================

आता २ आठवड्यांत ग्रॅन्ड फिनाले असून टॉप ५ आणि टॉप २ स्पर्धक कोण असणार याकडे सगळ्यांचीच नजर लागली आहे. तसेच, या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी विशाल कोटियन, राकेश बापट, अनुश्री माने, Rakhi Sawant आणि दिपाली सय्यद नॉमिनेट झाले आहेत. तन्वी फायनलिस्ट असल्यामुळे आणि रेवा या आठवड्यात कॅप्टन असल्यामुळे नॉमिनेशनपासून वाचल्या आहेत. आता या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहावं लागेल.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!