
८३ वर्षांपूर्वी Asha Bhosle यांनी गायलेलं ‘ते’ गाणं आजंही आहे लोकप्रिय!
भारतीय संगीतसृष्टीतील ग्रेटेस्ट आणि Most Versatile गायिका Asha Bhosle यांनी जवळपास ८० वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे… सांगितिक वारसा असणाऱ्याच घरातून आलेल्या आशा भोसले यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासूनच गाणं गायला सुरुवात केली… त्यांनी गायलेलं पहिलं गाणं हे कोणत्या हिंदी नाही तर एका मराठी चित्रपटासाठी होतं.. आणि आज ८३ वर्ष उलटून गेली तरी लोकप्रिय आहे… कोणतं आहे ते गाणं चला जाणून घेऊयात.. (Asha Bhosle first recorded song)
आशा भोसले यांनी १९४३ साली आलेल्या‘माझं बाळ’ या चित्रपटातील ‘चला चला नव बाळा’ हे पहिलं वहिलं गाणं पार्श्वगायिका म्हणून गायलं होतं… आजही हे मराठी गाणं लोकप्रिय आहे… त्यानंतर १९४८ साली त्यांनी ‘चुनरिया’ या चित्रपटातील सावन आया हे गाणं गाय हिंदीत एन्ट्री केली.. आणि १९४९ मध्ये ‘रात की रानी’ चित्रपटात पहिलं सोलो गाणं गात त्यांनी स्वत:चा ऑरा निर्माण करण्यास सुरुवात केली… आशा ताईंना खरी ओळख १९५३ साली आलेल्या‘परिणीता’ चित्रपटातील गाण्यामुळे मिळाली ती आजवर अबाधित आहे…(Asha Bhosle Songs)

वयाच्या प्रत्येक टप्प्यात आशा भोसले यांनी गाणी गात प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं… ९१व्या वर्षी सैया बिना हे गाणं रेकॉर्ड करत त्यांनी नवा रेकॉर्डच आपल्या नावे केला होता… Age Is Just A Number ही म्हण तंतोतंत आशा भोसले यांच्यासाठीच तयार केली आहे हे त्यांनी प्रत्येकवेळी सिद्ध केलं आहे… नव्वदीतही आपल्या चिरतरुण आवाजाची मोहीनी लोकांवर त्या कायमच करत राहिल्या…
================================
हे देखील वाचा : रंगीला चित्रपटातील ‘ते’ गाणं Asha Bhosle यांनी वादक नसतानाही गायलं होतं!
================================
बरं, आशाताई या केवळ लोकप्रिय गायिका नसून एक यशस्वी बिझनेस वुमन देखील होत्या… त्यांचा स्वत:चा रेस्टॉरंटचा व्यवसाय होता आणि कर्ली टेल्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या रेस्टॉरंटची सैर प्रेक्षकांना करण्याची संधी मिळाली होती… दुबई आणि कुवेतमध्ये आशाझ या नावे त्यांचे रेस्टॉरंट असून तिथे पारंपारिक उत्तर-पश्चिम भारतीय खाद्यपदार्थ मिळतात… तसेच, अबुधाबी, दोहा, बहरीन इथेही त्यांच्या फुडचेन्स आहेत…
आशाताईंच्या ‘भोसले’ आडनावाचा खास किस्सा…
आशा भोसले यांचं जीवन अनेक चढ उतारांनी भरलेलं होतं… कमी वयात केलेलं लन्, त्यात आलेल्या अनेक अडचणी, गरोदरपणात आत्महत्या करण्याचा केलेला प्रयत्न आणि पुन्हा या सगळ्या मानसिक त्रासातून बाहेर येत संगीतकार आर.डी.बर्मन (R D Burman) यांच्यासाथीने थाटलेला दुसरा संसार… परंतु, दुसरं लग्न झाल्यावरही आशाताईंनी पहिल्या लग्नाचं आडनाव का लावलं होतं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.. (Asha Bhosle & R D Burman Marriage)

तर, झालं असं की पहिल्या लग्नानंतर घरगुती हिंसाचार आणि अनेक अडचणींचा सामना करत पुन्हा एकदा आशाताई खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला… मात्र, दुसरं लग्नही फाप सोप्पं नव्हतं कारण इथे आर.डी बर्मन यांच्या आईचा लग्नाला विरोध होता, पण सगळ्या विरोधांना न जुमानता आशाताई आणि बर्मन यांनी लग्न केलं… लग्नानंतर साहजिकच स्त्रीचं आडनाव बदलतं पण आशाताईंनी पहिल्या लग्नानंतरचंच आडनाव आपल्या नावापुढे लावलं… त्याची दोन प्रमुख कारणं होती.. पहिलं म्हणजे संपू्ण मनोरंजनक्षेत्रात आशा भोसले या नावाने आशाताईंना ओळख मिळाली होती. आणि दुसरं कारण म्हणजे त्यांची मुलं भोसले हेच आडनाव लावत होते. मुलांचं आणि माझं आडनाव वेगळं नसावं हा विचार आशाताईंनी केला आणि आजन्म भोसले हेच आडनाव त्यांनी नावापुढे लावलं… (Asha Bhosle Surname’s intresting story)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi