Skip to content Skip to sidebar Skip to footer

“चले तो गये हो पर..”; बॉलिवूडकरांनी वाहिली Asha Bhosle यांना आदरांजली

स्वरसम्राज्ञी Asha Bhosle यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्व शोकाकूल झालं आहे… त्यांच्या जाण्याने एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे… असंख्य Melodies, मूड किंवा प्रसंगांप्रमाणे गाणी गायली आणि अजरामर केली ती आशाताईंनीच… प्रेमगीत असो किंवा उडत्या चालीचं गीत असो आपल्या सुमधूर आवाजाच्या जादूची छडी त्यांनी अशी फिरवली की सारं वातावरण सुरमय झालं… आशा ताईंच्या जाण्याने संगीतक्षेत्रात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहेच आणि त्यांच्या आठवणीत आता बॉलिवूडकरही भावूक झाले आहेत…

आशाताई आमच्यासारख्या कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहेत

गायक Sonu Nigam याने सोशल मिडियावर आशाताईंचे पाय धुतानाचा फोटो शेअर कर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिलं आहे की, “एका महान गायिकेचे निधन झाले. भारतीय चित्रपटसंगीतातील त्या शेवटच्या योद्धा होत्यात्या एक परिपूर्ण आयुष्य जगल्या. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अनेक आव्हाने आली, पण त्या काम करत राहिल्या. त्यातून त्यांना महानता मिळाली. गेल्या अनेक दशकांमध्ये त्यांनी त्यांच्या गाण्यातून अब्जावधी लोकांच्या आयुष्यात स्थान मिळवले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत त्या रियाज करत होत्या. त्या आमच्यासारख्या कलाकारांसाठी प्रेरणास्थान आहेत.”

पुढे सोनू निगमने लिहिले की, “आशाजी, १९९४ मध्ये तुम्हाला भेटल्यापासूनचा प्रवास मी कायम लक्षात ठेवीन. २०२४ मध्ये आपला शेवटचा कॉन्सर्ट होता. गेल्या वर्षी दोन गाणी आपण एकत्र गायली. हा संपूर्ण प्रवास मी आनंदाने आणि अभिमानाने लक्षात ठेवेन. मी एवढंच म्हणू शकतो, “चले तो गये हो पर, दिल अभी भरा नहीं. पुन्हा भेटू, ॐ शांती.” तर, गायक, संगीतकार आणि गीतकार Shankar Mahadevan यांनी पोस्ट करत लिहिलं आहे की, “सर्वांसाठी आजचा दिवस खूप दुःखद आहे. आशा भोसले आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाहीये. संगीतक्षेत्रातील त्यांचं योगदान शब्दात मांडूच शकत नाही. आशाताई त्यांच्या आवाजातून आणि गाण्यातून कायम आपल्यासोबत असतील’

आई, तुमच्या प्रेमासाठी आणि मला खास असल्याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद

अभिनेता-दिग्दर्शक Riteish Deshmukh याने आशाताईंना आई अशी साद घातली आहे. “आशा ताई – (मी त्यांना प्रेमाने ‘आई’ म्हणायचो) – एक असं व्यक्तिमत्त्व होतं की, ज्यांच्या सहवासातून बाहेर पडल्यावरही त्यांची ऊब आणि प्रेम कायम जाणवत राहायचं. त्यांना अनेकदा भेटण्याचं भाग्य मला लाभलं आणि प्रत्येक वेळी मला आपल्या घरी आल्यासारखं वाटायचं. त्या खूप प्रेमळ आणि शांतपणे प्रेम व्यक्त करणाऱ्या होत्या. माझ्या मनाच्या अत्यंत जवळ असलेली एक आठवण म्हणजे, ज्या दिवशी त्यांनी स्वतःच्या हाताने माझा आवडता पदार्थ बनवला आणि मला जेवायला बोलावलं. त्यांच्याबरोबर टेबलावर बसून जेवताना मला खरोखर सन्मानित झाल्यासारखं वाटलं आणि आपुलकी वाटली”.

“सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे अचानक येणारे फोन — जेव्हा कधी त्यांना माझं काम चांगलं वाटायचं, तेव्हा त्या मला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःहून फोन करायच्या. आई, तुमच्या प्रेमासाठी आणि मला खास असल्याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं प्रेम आणि तुमचा आवाज मी माझ्या हृदयात सदैव जपून ठेवेन. तुमच्या आत्म्यास शांती लाभो,” असं रितेश देशमुखने लिहिलं.

अनेक पिढ्यांच्या पलीकडेही टिकून राहणारी एक अलौकिक प्रतिभा

तर, बॉलिवूडच्या किंग खानने (Shah Rukh Khan) आशा भोसलेंसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “आशाताईंच्या निधनाबद्दल समजताच दुःख झाले. त्यांचा आवाज हा भारतीय चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ राहिला आहे आणि येणाऱ्या कित्येक शतकांपर्यंत तो जगभर निनादत राहील. अनेक पिढ्यांच्या पलीकडेही टिकून राहणारी एक अलौकिक प्रतिभा. त्यांनी माझ्यावर सदैव आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव केला; मला तुमची नक्कीच उणीव भासेल. तुमच्या आत्म्यास शांती लाभो, आशाताई… तुमच्यावर खूप प्रेम आहे.”

आशाजींशी माझे एक भावनिक नाते जोडलेले आहे

ज्येष्ठ अभिनेत्री Hema Malini यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, “आशाताई आता राहिल्या नाहीत! जी व्यक्ती इतकी चैतन्यमय होती—जिने आपल्या गाण्यांमध्ये जिवंतपणा आणि वैशिष्ट्य बहाल केले होते—तीच आज आपल्याला शोकात लोटून गेली आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही. माझ्यासाठी हे विशेषतः कठीण आहे, कारण आशाजींशी माझे एक भावनिक नाते जोडलेले आहे. त्यांनी आपल्या आवाजाने आणि शैलीने माझी अनेक गाणी अत्यंत लोकप्रिय केली आहेत. लताजी आणि आशाजी यांनी चित्रपटसृष्टीतील माझ्या कारकिर्दीत मोलाचे योगदान दिले आहे.या दोघींशीही माझे अत्यंत विशेष नाते होते.”

================================

हे देखील वाचा : एक रत्न आज हरपलं…; Asha Bhosle यांच्या आठवणीत मराठी कलाकार झाले भावूक

================================

भारतीय संगीत क्षेत्राच्या तुम्ही कायम क्वीन होतात आणि राहाल

Hrithik Roshan म्हणाला की,”मला तुमची खुप आठवण येईल आशाजी. तुम्ही अमुल्य आठवणी आणि अजरामर गाणी आम्हाला दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भारतीय संगीत क्षेत्राच्या तुम्ही कायम क्वीन होतात आणि राहाल”. तर Vicky Kaushalने म्हटलंय की,  “तुमचा सुमधुर स्वर, तुमची दयाळूपणा, शालीनता आणि मायेचा ओलावा सदैव जिवंत राहील. आशाजी, तुमच्या शांती लाभो.”असं भावुक कॅप्शन त्याने या स्टोरीला दिलं आहे. Ranveer Singh याने “Irreplaceable, incomparable.” असं म्हणत आशाताईंसोबतचा फोटो शेअर केला आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!