Skip to content Skip to sidebar Skip to footer

दुसरं बाळ येण्याआधीच Bharti Singh आणि हर्षची तिसऱ्या बाळासाठी तयारी? हर्ष म्हणाला, “मुलगा झाला तर…”  

कॉमेडी क्वीन भारती सिंह (Bharti Singh) आणि टीव्ही होस्ट हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiya) पुन्हा एकदा आनंदाच्या बातमीमुळे चर्चेत आले आहेत. दुसऱ्यांदा आई-वडील होण्याची तयारी करत असलेल्या या जोडप्याने नुकताच त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबाबत एक मजेशीर खुलासा केला आहे. आधीच एका मुलाचे पालक असलेले भारती आणि हर्ष यावेळी मुलगी होण्याची मनापासून इच्छा व्यक्त करत आहेत. अलीकडेच त्यांच्या ‘भारती टीव्ही’ या यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्टमध्ये हा विषय चर्चेला आला. अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) या खास पाहुण्या म्हणून या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. मातृत्वाच्या अनुभवावर बोलताना सोनाली यांनी आपल्याला एकच मूल असल्याचं सांगितलं. यावेळी भारतीने दुसऱ्या प्रेग्नंसीबाबतच्या मनातील भीती आणि शंका व्यक्त केल्या. त्यावर सोनाली यांनी भारती आधीपासूनच अनुभवी आई असल्याचं सांगत तिला आत्मविश्वास दिला.(Bharti Singh)

Bharti Singh
Bharti Singh Pregnancy

संभाषणात रंग भरताना हर्षने अचानक “आपण इथेच थांबणार नाही” असं वक्तव्य केलं. हे ऐकून सोनाली थक्क झाल्या. त्यावर हर्षने तीन हा आपला लकी नंबर असल्याचं सांगितलं. पुढे भारतीने हसत सांगितलं की, मुलगी होईपर्यंत हर्ष प्रयत्न सुरू ठेवण्याच्या विचारात आहे. दुसऱ्यांदा देखील मुलगा झाला, तर तिसऱ्यांदा प्रयत्न करूया, असं त्याचं ठाम मत आहे.

Bharti Singh
Bharti Singh Pregnancy

हर्षचं म्हणणं स्पष्ट आहे की, मुलगा असो वा मुलगी, पण मुलगी व्हावी ही त्याची मनापासून इच्छा आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला दोघांनीही एकच मूल असावं असं ठरवलं होतं, पण आयुष्याने वेगळंच वळण घेतलं.भारती आणि हर्ष यांनी 2017 मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केलं. 3 एप्रिल 2022 रोजी त्यांनी त्यांच्या मुलाचं लक्ष उर्फ ‘गोला’चं स्वागत केलं. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात या जोडप्याने सोशल मीडियावर दुसऱ्या प्रेग्नंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. (Bharti Singh)

====================================

हे देखील वाचा: Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

====================================

कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं, तर भारती सध्या ‘लाफ्टर शेफ्स’ या लोकप्रिय कुकिंग शोच्या तिसऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. तर हर्ष ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या 11व्या सीझनचा होस्ट असून हा शो SonyLIV वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!