Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6 चा सदस्य दिव्या शिंदेनंतर Roshan Bhajankar पोहोचला पोलिसात; व्हिडिओत सांगितलं खरं कारण

लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) चा सहावा सीझन सध्या शेवटच्या टप्प्यात असून, घरात घडणाऱ्या घटनांमुळे आणि बाहेर पडलेल्या स्पर्धकांच्या हालचालींमुळे ही चर्चेत आहे. प्रत्येक आठवड्यात नवीन ट्विस्ट पाहायला मिळत असताना, काही स्पर्धक घराबाहेर पडल्यानंतरही चर्चेचा विषय ठरत आहेत. अलीकडेच सागर कारंडेच्या (Sagar Karande) एलिमिनेशननंतर तन्वीने ‘टिकीट टू फिनाले’ जिंकत थेट फायनलमध्ये स्थान मिळवलं. त्यानंतर आता घरातून बाहेर पडलेला आणखी एक स्पर्धक चर्चेत आला आहे. कारण तो थेट पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्याचं समोर आलं. हा स्पर्धक म्हणजे रोशन भजनकर (Roshan Bhajankar). शांत, संयमी आणि साध्या स्वभावामुळे ओळखला जाणारा रोशन अचानक पोलिसात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.(Roshan Bhajankar Bigg Boss Marathi)

Roshan Bhajankar Social Media
Roshan Bhajankar Bigg Boss Marathi

रोशनने स्वतः आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तो पोलिस स्टेशनमध्ये असल्याचं दाखवलं. त्यामुळे काही वेळातच विविध चर्चांना उधाण आलं. मात्र, त्याने लगेचच या गोष्टीचं कारण स्पष्ट केलं. तो कोणतीही तक्रार करण्यासाठी नव्हे, तर पासपोर्टच्या कामासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेला असल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे निर्माण झालेला गैरसमज दूर झाला.

Roshan Bhajankar Social Media
Roshan Bhajankar Bigg Boss Marathi

दरम्यान, घराबाहेर आल्यानंतर रोशनने सचिन कुमावत (Sachin Kumavat) याची भेट घेतली. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये एक वेगळंच नातं तयार झालं होतं. सचिनमध्ये रोशनला त्याच्या भावाची झलक दिसत होती, त्यामुळे त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. पुन्हा भेट झाल्यावर दोघांनीही आनंद व्यक्त केला. या भेटीदरम्यान सचिनच्या कुटुंबाने रोशन आणि त्याच्या कुटुंबाचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केल्याचंही पाहायला मिळालं. शाल, पुष्पगुच्छ आणि आरतीने केलेलं स्वागत या नात्याची घट्ट बांधिलकी दाखवून देत होतं. रोशननेही या खास क्षणांचा व्हिडिओ शेअर करत मैत्रीचं महत्त्व अधोरेखित केलं.“रक्ताच्या नात्यापेक्षा ही मोठं एक नातं असतं, ते म्हणजे मैत्री! सचिन भाऊसोबतच्या या प्रवासाचे काही खास क्षण.” (Roshan Bhajankar Bigg Boss Marathi)

============================

हे देखील वाचा: Gharoghari Matichya Chuli मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री स्मिता शेवाळेची दमदार एन्ट्री !

============================

एकंदरीत, बिग बॉसच्या घरात निर्माण झालेली काही नाती बाहेर आल्यावरही तितकीच घट्ट राहतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोशन आणि सचिन यांची मैत्री. शो संपत आला असला तरी अशा भावनिक गोष्टी प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण करत आहेत.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!