Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6: विशालने दिला रुचिताला धोका? आता रुचिताने घेतला मोठा निर्णय…

Bigg Boss Marathi 6  च्या घरात सध्या प्रेम आणि गेममुळे तणाव पाहायला मिळत आहे. रुचिता ( Ruchita Jamdar) आणि विशाल (Vishal Kotian) यांच्यातील नातं प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. सुरुवातीला हे दोघे जवळीक दाखवत होते, आणि रुचिताने स्पष्ट केले होते की विशालबरोबर तिला अटॅचमेंट तयार झाला आहे. तिने म्हटले होते, “मला तो आवडतो, त्याची प्रेझेन्स मला आवडते,” ज्यामुळे दोघांमध्ये चांगली चर्चा रंगली. पुढच्या टास्कदरम्यान विशालनेही त्याची भावना स्पष्ट केली आणि म्हटले, “मला रुचिता आवडते. आमच्या वयात किती अंतर आहे याने मला फरक पडत नाही.” या खुलास्यानंतर प्रेक्षकांच्या मनात त्यांच्यातील प्रेमाची चर्चा जोर धरली.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6 Vishal Ruchita

मात्र, आता चित्र बदललेले दिसत आहे. रुचिता टोळीच्या गेममध्ये स्वतः स्वतंत्र होण्याचा निर्णय घेत आहे. विशाल आणि रुचिता बसलेले असताना रुचिता त्याला सांगते की उद्यापासून ती इंडिविज्युअल प्लेअर असेल. तिच्या या निर्णयाने विशाल नाराज होतो आणि म्हणतो, “तुम्ही फक्त टोळी टोळी करता. टोळीची सर्वात जास्त गरज तुम्हा तिघांना आहे, मला नाही.” रुचिताने मात्र ठाम राहून उत्तर दिले की टोळी हा शब्द सोडूनही तिला स्वतःसाठी अस्तित्व निर्माण करायचं आहे.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Vishal Ruchita

संभाषणादरम्यान विशाल तिने केलेल्या निर्णयावर थोडा राग व्यक्त करतो आणि म्हणतो, “तुमच्या डोक्यात घातलं लोकांनी. रुल्सच्या अगेस्ट सगळं डिस्कस करत होते.” त्यावर रुचिता शांतपणे म्हणते की, “हो, सगळे डिस्कशन करत होते पण मला त्यात नाही यायचं. माझ्या डोक्यात एवढंच होतं की नॉमिनेशन डिस्कशनमुळे उठवलंय. मला ती गोष्ट रिपीट करायची नव्हती.” अखेर विशाल म्हणतो, “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा, मी माझं खेळतो,” ज्यामुळे स्पष्ट दिसते की त्यांच्यात आता काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे.(Bigg Boss Marathi 6)

================================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण; प्राजक्ताचा आडमुठेपणा घरातील सदस्यांना भोवणार?

================================

या संवादातून प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशालने प्रेमाचे संकेत दाखवून गेममध्ये खेळ केला की हा दोघांचा स्ट्रॅटेजिक निर्णय होता? तसेच, टोळीशिवाय रुचिता आता कशी खेळणार हे पाहणं आता इंट्रेस्टिंग ठरणार आहे. बिग बॉस मराठी ६ चा पुढचा भाग प्रेक्षकांसाठी रोमांचक ट्विस्ट आणि भावनिक टर्न्सने भरलेला दिसणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!