Skip to content Skip to sidebar Skip to footer

Ramayana सोडा, मराठीतल्या पहिल्या बोलपटाने रचलाय इतिहास!

रणवीर सिंग याच्या Dhurandhar : The Revenge चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असताना रणबीर कपूर याचा Ramayana चित्रपट रिलीज होण्याच्या वाटेवर आहे… एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६०० कोटींचा टप्पा पार केला आहे, तर दुसऱ्या चित्रपटाचं केवळ बजेटचं ४००० कोटी इतकं आहे… बॉलिवूडमध्ये या दोन्ही चित्रपटांनी आपल्या नावे रेकॉर्ड केले आहेत… पण तुम्हाला माहित आहे का बॉलिवूडला तोडीस तोड टक्कर देणाऱ्या आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला बोलपट हा प्रभू श्रीराम यांच्या जीवनावरच आधारित होता आणि आजही १०० वर्ष उलटून गेली असली तरी या चित्रपटाची चर्चा कायम सिनेवर्तृळात असते… (Entertainment News)

तर, गौरवशाली इतिहास लाभलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला बोलपट होता ‘अयोध्येचा राजा’... V. Shantaram यांनी डिरेक्ट केलेल्या या चित्रपटाची निर्मिती ‘प्रभात फिल्म कंपनी’ने केली होती. खरं तर चित्रपट म्हणजे काय? तो कसा तयार केला जातो? ते एक मनोरंजनाचं माध्यम आहे हेच मुळात आपल्याला सांगणारा एक मराठी माणूस होता आणि ते म्हणजे Dadasaheb Phalke… आधुनिक तर सोडाच पण बेसिक टॅक्नॉलॉजी नसतानाही अगदी तुटपुंज्या रिसोर्सेसमध्ये फाळकेंनी १९१३ मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या मूक मराठी चित्रपटाची निर्मिती केली. (First Marathi sound Movie)

परंतु, पहिला बोलपट तयार करण्यासाठी तब्बल १९ वर्षांचा काळ गेला… व्ही. शांताराम यांनी मराठीत टॅक्नॉलॉजी आणत पहिला बोलपट तयार करण्याचं धाडस केलं आणि ते ६ फेब्रुवारी १९३२ साली पूर्ण करुन दाखवलं… प्रेक्षकांना कायमच पौराणिक कथांवर आधारित चित्रपट पाहायला आवडतात हे प्रत्येक डिरेक्टरने हेरुन ठेवलं होतं आणि आजही तो वारसा सुरुच आहे… रामायणावर आधारित कुठलीच कलाकृती आजवर फेल ठरली नाही (एक अपवाद वगळता). तर, ज्या काळी चित्रपट म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर अजूनही शोधलं जात होतं त्या काळात पहिला बोलपट शांताराम बापूंनी आणला… Ayodhyecha Raja चित्रपटात गोविंदराव टेंबे यांनी हरिश्चंद्र, दुर्गा खोटे यांनी तारामती, विनायक यांनी नारद, निबांळकरांनी विश्वमित्र अशा महत्वपूर्ण भूमिका कलाकारांनी साकारल्या होत्या.. (Indian Cinema)

जरा आता ‘अयोध्येचा राजा’च्या कथेकडे वळूयात… चित्रपटाची कथा राजा हरिश्चंद्र, तारामती आणि त्यांचा मुलगा रोहिदास यांच्या पुराणकथेवर आधारित होती. पौराणिक गोष्ट असल्यामुळे बराचसा कथाभाग हा गाण्यांमधून पुढे सरकतो. चित्रपटात संवाद कमी आणि गाणीच अधिक होती… गाण्यांमुळे बोलपटाची कथा पुढे सरकते हे लक्षात आल्यानंतर कथा पुढे नेण्यासाठी गाणं हा फार महत्वाचा फॅक्टर असल्याचं लक्षात घेत चित्रपटांमध्ये हा प्रयोग करण्याची सुरुवात झाली… (Mythological Movies)

आता पहिल्या बोलपटाबद्दल जर आपण जाणून घेतलं आता जरा रामायणावर आधारित कलाकृतींवर एक नजर टाकूयात… भरत मिलाप (१९४२ Animated Series), संपूर्ण रामायणा (१९६१), Ramayana : The Legend Of Price Rama (1983), रामायणा : द एपिक (२०१०), रामानंद सागर यांची आयकॉनिक मालिका रामायण (१९८७-१९८८), रामायण (२००८), सीया के राम (२०१५-१६), श्रीमद रामायण (२०२४). आणि आता येणारा नितेश तिवारी दिग्दर्शित Ramayana चित्रपट. ..(Movies Based On Ramayana)

================================

हे देखील वाचा : 1000 Cr चा Dhurandhar ‘या’ चित्रपटापुढेही फिका

================================

रणबीर कपूरचा Ramayana चित्रपटातील प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेतील पहिला लूक नुकताच रिलीज करण्यात आला. प्रेक्षकांनी त्याला या भूमिकेत स्वीकारलं असून आता सीता मातेच्या भूमिकेतील साई पल्लवीला पाहण्यासाठी लोकं आतुर आहेत… चित्रपटात Yash (रावण), Sunny Deol (हनुमान), Ravi Dubey (लक्ष्मण) अशा भूमिका साकारणार असल्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस शिगेला पोहोचली आहे… नमित मल्होत्रा यांची निर्मिती असलेला हा चित्रपट दिवाळी २०२६ आणि दिवाळी २०२७ मध्ये जगभरात रिलीज होणार आहे… बरं, Ranbir Kapoor याला प्रभू राम म्हणून लोकांनी स्वीकारलं असलं तरी सगळ्यांचे ऑल टाईम फेव्हरेट प्रभू रामाच्या भूमिकेतील अभिनेते Arun Govil असतील यात शंकाच नाही…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!