Skip to content Skip to sidebar Skip to footer

Chinmay Mandlekar : “नॅचरल अॅक्टिंग कशी असावी हे…”; ‘सनई चौघडे’च्या कलाकाराने शेअर केला अनुभव

‘तु तिथे मी’ या मालिकेतून १२ वर्षांपूर्वी सत्यजित ही अजराम भूमिका देणाऱा अभिनेता Chinmay Mandlekar आता पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला चिन्मय आता ‘सनई चौघडे’ या मालिकेत पुन्हा एकदा सत्यजित हे पात्र साकारता दिसणार आहे. प्रेक्षक त्याच्या या भूमिकेसाठी उत्सुक आहेतच, परंतु, त्याच्यासोबत काम करणारे कलाकारही त्याच्या कामाचं विशेष कौतुक करत आहेत. मालिकेत राज हंचनाळे हा देखील असून त्याने चिन्मयसोबत काम करण्याच आपला अनुभव शेअर केला आहे. चिन्मय मांडलेकर याचं अभिनेता म्हणून कौतुक आहेच पण त्याच्यासोबत काम करताना मला Fan Moment Enjoy करायला मिळते याचा विशेष आनंद आहे अशा भावना राजने व्यक्त केल्या आहेत. जाणून घेऊयात राज नेमकं काय म्हणाला… (Entertainment News)

दरम्यान, ‘सनई चौघडे’ मालिकेत सध्या कथानकात शर्वरी नोकरीसाठी मुलाखती देत असते. योगायोगानेती एका कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजीतचीच असते. आणि त्याचवेळी जय खानोलकरही एका बिझनेस डीलसाठी सत्यजीतला भेटायला येतो आणि याच भेटीतून कथानकाला नवं वळण मिळतं. याच सगळ्या कथानकाला घेऊन आपल्या अनुभवाबद्दल बोलताना राज म्हणाला, ‘चिन्मय सरांसोबत शूट करण्याचा अनुभव माझ्यासाठी खरोखरच खूप समृद्ध करणारा आणि प्रेरणादायी होता. ते माझे आवडते कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. खरं सांगायचं तर, त्यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत एका फ्रेममध्ये उभं राहणं ही देखील फार मोठी गोष्ट असून माझ्यातील ती एका अर्थाने ‘fan moment’आहे.’ (Sanai Chaughade serial)

पुढे राज असं म्हणाला की, “सगळ्यात आधी त्यांची कामाची शिस्त कडक आहे. सेटवर आल्यावर ते ज्या प्रकारे स्वतःला कॅरेक्टरमध्ये झोकून देतात, ते पाहून खरंच आम्हा कलाकारांना खूप प्रेरणा मिळते. सीन करताना डायलॉग डिलिव्हरीमध्ये सहजता आणि नॅचरल ॲक्टिंग कशी असावी हे त्यांना पाहून शिकता येतं”. सनई चौघडे या मालिकेच्या कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर राज हंचनाळे, मेघना एरंडे, सुहास शिरसाट, चिन्मयी साळवी आणि आदिती सारंगधर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

================================

हे देखील वाचा : Zakir Khan : ‘मित्रा निगेटिव्हिटी पसरवणं थांबव’; बॉलिवूडकरांची वादात उडी

================================

चिन्मय मांडलेकर आणि Aditi Sanrangadhar यांनी यापूर्वी देखील स्क्रिन शेअर केली आहे आणि ती मालिका होती ‘वादळवाट’… मालिकाविश्वात ‘वादळवाट’ हे नाव अजरामर आहे… ज्या मालिकेमूळे आज इंडस्ट्रीला टॅलेंटेड कलाकार भेटले आहेत ती विस्मरणात जाणं शक्यच नाही… वादळवाट व्यतिरिक्त ‘स्वामी पब्लिक लि’. ‘तुझ्याविना’, ‘तुमची मुलगी काय करते?’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘अग्निहोत्र’, ‘तु माझा सांगाती’ या मराठी मालिकांमधून चिन्मयने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच, ‘काला पानी’, ‘एक थी बेगम’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘धारावी बॅंक’ अशा बऱ्याच हिंदी सीरीजमध्येही त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. (Chinmay Mandlekar serials)

….म्हणून छत्रपतींची भूमिका कधीच न साकारण्याचा चिन्मयने घेतलेला निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका कुणी साकारावी? असा प्रशन विचारला तर आपसूकच चंद्रकांत मांढरे, शरद केळकर आणि चिन्मय मांडलेकर ही नावं डोक्यात येतात. दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टकातील प्रत्येक चित्रपटात शिवराय यशस्वीपणे साकारल्यानंतर त्यांनी एका वैयक्तिक कारणामुळे पुढे कधीच छत्रपतींची भूमिका न साकरण्याचा निर्णय घेतला होता.

झालं असं की चिन्मयच्या मुलाचं नाव जहांगीर… त्यामुळे प्रेक्षकांनी चिन्मयला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोस आणि मुलाचं नाव जहांगीर आहे असं म्हणत ट्रोल केलं होतं. आता जोवर ट्रोलिंग स्वत:वर होत असते तोवर प्रत्येक कलाकार शांत बसतो आणि मायबाप रसिक प्रेक्षकांच्या रागाचाही सामना करतो. मात्र, ज्यावेळी ती हद्द पार होऊन कुटुंबावर ताशेरे ओढले जातात त्यावेळी कुठलाही कलाकार गप्प बसत नाही आणि चिन्मयच्या बाबतीतही तेच झालं. बायको आणि मुलाला लोकांनी नावावरुन ट्रोल केल्यामुळे चिन्मयने यापूढे कधीच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही असा कठोर निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाला चाहत्यांना धक्का बसला आहे, पण तरीही नाईलाजास्तव चिन्मय आपल्या निर्णयावर आजही ठाम आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!