Skip to content Skip to sidebar Skip to footer

Nirmiti Sawant : ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित; आता रंगणार कौटुंबिक महासोहळा

पल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा  एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद देतो. प्रेक्षकांना आवडेल, रुचेल आणि मनापासून भावेल अशीच गोष्ट असणारा ‘ सुपर डुपर ‘ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  समीर आशा पाटील यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

कौटुंबिक महासोहळा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प्रदर्शित होणार असून टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सकुता वाढली आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, “आपण एका कुटुंबाची फिल्म घेऊन येत आहोत कुटुंबासाठी. माणसाच्या जडणघडणीमध्ये नेहमीच एका कुटुंबाचा हात असतो. कुटुंबामुळे अनेक भावना आपल्याला जगता येतात, अनुभवता येतात. अशाच अनेक भावनांची मेजवानी या चित्रपटात असणार आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपलासा वाटेल असा हा चित्रपट आहे..”

================================

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 6 च्या घरातून Omkar Raut बाहेर; आता घरात होणार मोठे बदल

================================

निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते आणि मुख्य नायक नायिकेच्या भूमिकेत असलेले ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले अशी भलीमोठी स्टारकास्ट यामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
तुमचे मत आमच्यापर्यंत पोहोचले. आम्ही नक्कीच सुधारणा करू!
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!