Skip to content Skip to sidebar Skip to footer

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लग्नानंतर होईलच प्रेम (Lagnanantar Hoilach Prem) सध्या प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करत आहे. कथानकातील भावनिक वळणं, नात्यांमधील गुंतागुंत आणि सणासुदीच्या रंगतदार प्रसंगांमुळे मालिकेने घराघरात विशेष स्थान निर्माण केलं आहे. सध्या मालिकेत सुरू असलेल्या भव्य विवाहसोहळ्याने या लोकप्रियतेला चारचाँद लावले आहेत. जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक जल्लोषात आणि चाहत्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत निघाली. मराठी मालिका विश्वात प्रथमच असा थेट प्रेक्षकांसोबत साजरा करण्यात आलेला विवाहसोहळा पाहायला मिळाला. (Lagnanantar Hoilach Prem)

Lagnanantar Hoilach Prem Serial
Lagnanantar Hoilach Prem Serial wedding

विंटेज कारची शान, पारंपरिक लग्नगीतांचा नाद, वऱ्हाडी मंडळींचा उत्साह आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी या सगळ्यामुळे हा क्षण अविस्मरणीय ठरला. कलाकारांनीही चाहत्यांसोबत फोटो, संवाद आणि जल्लोष करत हा सोहळा संस्मरणीय केला. या मंगल प्रसंगाचा समारोप सर्वांनी मिळून लालबागचा राजा याच्या चरणी आशीर्वाद घेऊन केला. जीवाची भूमिका साकारणारा विवेक सांगळे (Vivek Sangale) म्हणाला की, लालबागचा रहिवासी असल्यामुळे मालिकेतील इतक्या महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने होणं त्याच्यासाठी अत्यंत खास आहे. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील, असं त्याने भावनिक शब्दांत सांगितलं.

Lagnanantar Hoilach Prem Serial
Lagnanantar Hoilach Prem Serial Wedding

नंदिनीची भूमिका साकारणारी मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) हिनेही हा क्षण आपल्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर अनुभवांपैकी एक असल्याचं नमूद केलं. प्रेक्षकांसोबत प्रत्यक्ष लग्नसोहळा साजरा करण्याची संधी मिळणं ही मोठी गोष्ट असल्याचं तिने सांगितलं. पार्थची भूमिका करणारा विजय आंदळकर (VIjay Aadalkar)याने ढोल-ताशांच्या निनादात, चाहत्यांच्या प्रेमात आणि बाप्पाच्या आशीर्वादात न्हाऊन निघालेला हा सोहळा स्वप्नवत असल्याची भावना व्यक्त केली. तर काव्याची भूमिका साकारणारी ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar)हिने इतकं भरभरून प्रेम मिळेल असं कधी वाटलं नव्हतं, असं सांगत हा अनुभव अविस्मरणीय असल्याचं म्हटलं.(Lagnanantar Hoilach Prem)

============================

हे देखील वाचा: हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली; ७ कोटींचा लिलाव, घरात रंगला भन्नाट खेळ

============================

मनोरंजनाच्या या रंगतदार प्रवासात प्रेम, परंपरा आणि प्रेक्षकांचं नातं अधिक घट्ट झालं आहे.तेव्हा हा खास विवाहसोहळा आणि पुढील उत्कंठावर्धक घडामोडी  ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत दररोज सायंकाळी ७ वाजता, फक्त स्टार प्रवाह वर पाहता येईल.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!