Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

एकीकडे थिएटर्स आणि नाट्यगृहांमध्ये बॅक टू बॅक नव्या कलाकृती रिलीज होत आहेत. तर दुसरीकडे मालिकाविश्वातही नव्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशातच आता कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार असून हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेतून भारती आचरेकर आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी येणार आहेत. (Bharti Achrekar)

भारती आचरेकर यांची प्रमुख भूमिका असणारी ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका ‘कलर्स मराठी’वर येत्या १६ मार्चपासून प्रसारित करण्यात येणार आहे. ही मालिका सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर त्यांना पाहण्यासाठी चाहते उस्तुक आहेत. एकीकडे त्यांची ही नवी मालिका सुरु होणार आहे तर दुसरीकडे तिघी हा त्यांचा नवा कोरा मराठी चित्रपट ६ मार्च २०२६ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात भारती यांच्यासह सोनाली कुवकर्णी आणि नेहा पेंडसे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. (Mi Jinkun Ghein Sara)

================================

हे देखील वाचा : Big Boss Marathi 6 :  रितेश देशमुखने तन्वीला दाखवला आरसा!

================================

दरम्यान, हिंदी चित्रपटसृष्टीत छोटेखानी परंतु, अधोरेखित करणाऱ्या भूमिका आजवर भारती यांनी साकारल्या आहेत. तसेच, हिंदी मालिकविश्व त्यांनी गाजवलं आहे. ‘वागळे की दुनिया’, ‘जिया जले’, ‘मे कब सास बनूंगी’, ‘चिडिया घर’, ‘सुमित संभाल लेगा’ अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी कामं केली आहेत. (Hindi Daily Soaps)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!