Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bigg Boss Marathi 6 च्या घरात स्पर्धकांना बसणार नॉमिनेशनचा धक्का; रुचिता जामदारला दाखवला जाणार बाहेरचा रस्ता !

Bigg Boss Marathi 6 मधील घरात दररोज वाद, टास्क आणि स्पर्धकांमधील भांडणं चर्चेचा विषय ठरतात. मागील आठवड्यात घरात तीन वाईल्ड कार्ड सदस्य आले आणि त्यामुळे घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. याच आठवड्यात प्रेक्षकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण घरातून बाहेर पडणारी स्पर्धक रुचिता जामदार (Ruchita Jamdar) असल्याचे सूत्रांकडून समोर आले आहे. आठ आठवड्यांनंतर रुचिता बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर येत आहे, आणि या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6 Update
Bigg Boss Marathi 6 Ruchita Jamdar Exit

रुचिता जामदारने घरात एन्ट्री घेतल्यापासून तिच्या आक्रमक आणि थेट स्वभावामुळे सतत लक्ष वेधलं. अनेक टास्कमध्ये ती इतर स्पर्धकांशी वाद करताना दिसली आणि तिच्या आवाजामुळे घरातील वातावरण अनेकदा तणावपूर्ण झाले. तिच्या बोलण्याच्या शैलीमुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. घरातील इतर स्पर्धकांनीही अनेकदा तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली. काही प्रेक्षक तर तिच्या घराबाहेर जाण्याची अपेक्षा व्यक्त करत होते, तर काहींनी तिच्या गेमबद्दल मिश्र प्रतिक्रिया दिल्या.

Bigg Boss Marathi 6 Update
Bigg Boss Marathi 6 Ruchita Jamdar Exit

शोचे होस्ट रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी देखील रुचिता आणि तिच्या वागण्यावर अनेकदा नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर रुचिता आणि विशाल यांच्यातील नात्याची बाहेरही मोठी चर्चा सुरु होती. नुकत्याच प्रदर्शित प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांना एलिमिनेशनचा धक्का बसल्याचे दिसते. प्रोमोमध्ये विशाल आणि रुचिता दोघेही भावूक होताना दिसतात, तर सागर रुचिताला मिठी मारत सांत्वन देताना दिसतो. रितेश देशमुखही म्हणतात, “जेव्हा घरातील खेळ हलकं घेतला जातो, तेव्हा बिग बॉस अ‍ॅक्शन घेतो. या क्षणी घरातील एलिमिनेशन होणार आहे.” तसेच प्रोमोमध्ये घरातील वातावरण खूप भावनिक दिसत आहे. रुचिता रडताना, विशाल देखील भावूक होऊन रडताना आणि घरातील इतर सदस्य त्यांना धीर देताना दिसतात. या सीनमुळे प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता वाढली आहे. (Bigg Boss Marathi 6)

=============================

हे देखील वाचा: Tu Anolakhi Tari Sobti मालिकेत मोठा ट्विस्ट; कुटुंबासाठी अर्पिताचा मोठा निर्णय!

=============================

दरम्यान, रुचिता जामदार खरंच घरातून बाहेर पडली आहे का, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये तिच्या एलिमिनेशनचा दावा केला जात आहे. काही प्रेक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काहींनी रुचिता आणि तिच्या गेमबद्दल मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. आगामी भागात रुचिताचा घराबाहेर जाण्याचा निर्णय आणि घरातील नवीन घटनाक्रम प्रेक्षकांसाठी मनोरंजक ठरणार आहेत. बिग बॉस मराठी 6 मध्ये अजून काय घडणार आहे, कोणत्या स्पर्धकाचा गेम बदलणार आहे, हे पाहणे उत्सुकतेस ठरणार आहे.

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!